तासनतास काम करून, थकून देखील झोप येत नसेल तर हे उपाय आवर्जून करून पहा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

झोप न येणं ही आजकाल प्रत्येक वयोगटातील माणसांची तक्रार होवून बसली आहे. अनेक जण रात्र रात्र कामासाठी संगणकावर बसून असतात.

InMarathi Android App

जर काही काम नसेल तर रात्री ३-३ वाजेपर्यंत सोशल मीडिया उघडून मंडळी त्यावर गप्पा ठोकत बसलेली असतात.

सुरुवातीला हे सगळं चांगलं वाटतं. नंतर नंतर आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ यामुळे बिघडायला लागतं.

 

sleeplessness-inmarathi
peaklife.in

रात्री जागरण आणि दिवसा उशिरापर्यंत झोप अशी चक्रे चालू होतात आणि नंतर नंतर अशी वेळ येते की जरी लवकर झोपण्याचा पर्यंत केला तरी झोप येत नाही.

झोपेचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. १० ला जरी अंथरुणाला पाठ टेकली असेल तरी झोप मात्र बिघडलेल्या सवयीनुसार ३ ला येवू शकते.

याचा संपूर्ण परिणाम आपल्या रोजच्या जीवनमाना वर होत राहतो. अपुऱ्या झोपेमुळे पूर्ण दिवसाचं आणि पर्यायाने कामाचं गणित कोलमडत राहतं. हे टाळण्यासाठी वेळेवर झोप घेणे आणि वेळेवर झोप येणे आवश्यक ठरते.

जर तुम्हाला रोज रात्री वेळेवर झोप येत नसेल तर तुम्ही खाली दिलेले उपाय अवश्य करून पाहू शकता ज्यामुळे शांत झोप लागायला मदत होईल.

१. शयनगृहात टीव्ही, संगणक किंवा मोबाईल ठेवू नका:

इलेक्ट्रोनिक वस्तूंमुळे झोपेला खूप मोठा अडथळा निर्माण होतो. शयनगृहात टीव्ही चालू करून तासनतास पहिला जातो. हीच गोष्ट मोबाईल आणि संगणकाबाबत घडते.

 

Internet speed of India.Inmarathi1
gadgetsnow.com

मोबाईलच्या विळख्यात मानसिक समाधान आणि झोप दोन्ही हरवत चालले आहे.

त्यामुळे शयनगृहात कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रोनिक गॅझेट ठेवू नका. झोपताना मोबाईल आपल्यापासून २० फुट लांब ठेवा. टीव्हीचा रिमोट अन्य इलेक्ट्रोनिक वस्तू बिछान्यात राहणार नाहीत याची काळजी घ्या.

२. थंड अथवा गरम पाण्याने पाय धुवून झोपा

झोपेसाठी जुन्या काळापासून केला जाणारा हा हमखास उपाय आहे.

 

Soak-Feet-In-Lukewarm-water-inmarathi
StyleCraze.com

उन्हाळ्यात थंड पाण्याने पाय धुवून आणि इतर ऋतूत गरम पाण्याने पाय धुवून आणि स्वच्छ करून झोपले तर झोप लवकर येते.

रात्री जेवणाअगोदर अंघोळ केल्यास देखील चांगली झोप लागू शकते.

३. गरम दुधात जायफळ टाकून पिणे

गरम दुध पिणे हा रात्री झोप येण्यासाठी केला गेलेला अनुभवसिद्ध उपाय आहे.

खरे पाहता रात्रीची वेळ ही गरम दुध पिण्यासाठी आदर्श वेळ मानली गेलेली आहे.

रात्री पिलेल्या दुधामुळे कफ होत नाही किंवा सर्दी झाली असेल तर ती देखील रात्री गरम दुधात हळद टाकून पिल्याने थांबते. रात्री गरम दुध पिल्याने देखील झोप लवकर यायला मदत होते.

 

nutmeg-inmarathi
tasting-table.com

जर झोप येत नसेल तर गरम दुधात साखर, इलायची आणि जायफळ टाकून पिल्यास हमखास झोप येते असा अनेकांना अनुभव आहे.

४. केळी

केळी हा एक पौष्टिक पदार्थ आहे. त्याच्यात कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. त्याहीपेक्षा केळी हे पोटॅशियम या नैसर्गिक खनिजाचा मोठा स्त्रोत आहे.

पोटॅशियमचा उपयोग शरीरातील रक्ताभिसरण क्रियेचा वेग चांगला ठेवण्यासाठी होतो.

 

youtube.com

तसेच केळ्यामध्ये मेंदूला आराम देणारा Tryptophan नावाचा उपयुक्त घटक देखील आढळतो त्यामुळे रात्री केळी खाल्ल्याने मेंदूला आराम मिळून झोप चांगली येते.

५. मेथीचे दाणे आणि मध

मेथीचे दाणे चवीला अतिशय कडवट लागतात म्हणून कुणीही ते फारसे खत नाहीत. ही मेथी अत्यंत गुणकारी असून अनेक प्रकारच्या त्रासात तिचा औषधी उपयोग केला जातो.

झोप न येण्याच्या त्रासावर रोज रात्री मेथीचे दाणे भिजवून ते मधाबरोबर घेतले जातात.

 

honey-inmarathi
remediesforme.com

जर निद्रानाशाचा विकार जडला असेल तर हमखास मेथी आणि मधाचा वापर केला जातो जेणेकरून रुग्णाला शांत झोप लागेल.

६. रात्रीचे जेवण पौष्टिक आणि हलके ठेवा

रात्रीचे जेवण जर खूप जास्त मसालेदार, तेलकट, पचायला जड असे घेतले असेल तर झोप येत नाही. पित्त वाढते आणि जळजळ सुरु होते.

डोके जड होवून दुखणे, पोटात गरमपणा जाणवणे, करपट ढेकर येणे असे प्रकार नित्याचे होवून बसतात.

जर खूप जास्त पित्त, वात वाढला तर झोप लागत नाही त्यामुळे रात्रीचे जेवण हे हलके आणि साधे असावे.

 

lunch-indi--inmarathi
vipmarathi.me

खूप जास्त जळजळीत आणि मसाले घातलेले पदार्थ टाळून साधा घेतलेला आहार अनेक आरोग्यदायी बदल घडवतो. या उपायामुळे देखील झोप चांगली लागण्यास मदत होते.

७. जिरे

जिरा हा हर एका स्वयंपाक घरात विराजमान असलेला पदार्थ. याशिवाय फोडणी पूर्ण होत नाही आणि पदार्थाला चव देखील येत नाही.

 

Cumin-Seeds-inmarathi
calmlycookingcurry.blogspot.com

जर झोप येत नसेल तर जिरे टाकून उकळलेले गरम पाणी पिले किंवा १ चमचा जिरे चावून खाल्ले तरी रात्री शांत झोप लागू शकते.

८. केशर

केशर हा फार पूर्वीपासून झोपेच्या आजारावर वापरला जाणारा पदार्थ आहे.

 

Saffron-inmarathi
huffingtonpost.com

साखर आणि केशर टाकून तयार केलेले दुध हे चवीला अत्यंत चांगले लागते. असे केशरमिश्रित दुध झोपायला जाण्यापूर्वी पिले तर झोप लवकर लागते.

जर तुम्हाला रोज रात्री झोप लवकर लागत नसेल तर वर दिलेले उपाय नक्की करून पाहा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *