' “पत्रकार” प्रियकर/ प्रेयसी असेल तर जीवनात “ही” अशी बहार असते! – InMarathi

“पत्रकार” प्रियकर/ प्रेयसी असेल तर जीवनात “ही” अशी बहार असते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पत्रकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात जीव धोक्यात घालून सत्य जनतेसमोर आणण्याचं काम करणारे.. लोकशाही बाळकर करण्यासाठी सदैव कार्यरत असणारे लोक. स्कुटीवर बसून कुठे काही अनुचित प्रकार घडला की लगेच पोहचणाऱ्या पत्रकार स्त्रिया, समाजतल्या वेगवेगळ्या घडामोडींची माहिती देणाऱ्या टीव्ही वरील अँकर्स..

ह्या सर्व महिला पत्रकार फार आक्रमकपणे समाजाचं रूप जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात.

हे काम करत असताना त्या अनुभवातून पत्रकाराचं स्वतःचं आगळंवेगळं व्यक्तिमत्व विकसित होत जातं. त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पत्रकारासोबत राहणाऱ्या लोकांना स्पष्टपणे जाणवतात. शेकडो लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे ‘कुणाशी कसं डील करायचं’ याचे त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात.

 

journalist-inmarathi
thenewsminute.com

सत्याचा शोध घेताना त्या सत्याबद्दल असलेली कळकळ, सत्याशी तडजोड न करण्याची वृत्ती आयुष्याच्या इतर क्षेत्रातही निर्णय घेताना, निष्कर्ष काढताना दिसत असते. 

आणि हेच सगळे गुण पत्रकाराला ‘परफेक्ट पार्टनर’ बनवतात. त्याच्या या गुणांमुळे नात्यातल्या दुसऱ्या व्यक्तीला क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवावा लागत नाही. आणि नात्यात बहार येते.. हे गुण कोणते? पाहूयात..

१ ) क्रियाशील असतात

पत्रकाराचे आयुष्य हे क्रियाशील असते. नव – नवीन बातम्या, सणसणी , लेख या सर्वांनी त्यांचं आयुष्य व्यापलेलं असतं. पण न्यूज रूमच्या बाहेर पत्रकार खूप क्रियाशील असतात.

 

creat-inmarathi
india.com

त्यांच्यातील नवनिर्मितीच्या कलेमुळे ते तुम्हाला इम्प्रेस करण्याची एक संधी सोडत नाही. जर पत्रकार मुलगा असेल तर मात्र तुम्हाला तो लव्ह लेटर्स ने अक्षरश: रडवेल. मुलगी असेल तर तुम्हाला बोलकं करेल.

२) अखंड गप्पा मारू शकतात

 

Madras-inmarathi
youtube.com

पत्रकार म्हटल्यावर जवळ जवळ सर्वच विषयाची माहिती ठेवणारा जणकार व्यक्ती असतो. तो कुठल्याही विषयावर तुमच्या शी गप्पा मारु शकतो व प्रत्येक गोष्टीला काही ना काही तरी लॉजिकल असं उत्तर देऊ शकतो. अत्यंत संयमाने सर्व काही पटवून देऊ शकतो.

३) पैसा मॅटर करत नाही

पत्रकाराला त्याच्या कामाची प्रचंड आवड असते.

 

priti-zinta-inmarathi
koimoi.com

त्यांना मोबदल्याची तेवढी चिंता नसते. फक्त काम करायला आवडतं. ते त्यांच्या जोडीदाराइतकी कमाई करत नसले तरी ते मुक्त व आनंदी जीवन जगतात.

४) ते विश्वसनीय असतात

 

Priya-Desai-inmrathi
india.com

तुम्ही त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीबद्दल मुक्तपणे विश्वास ठेवू शकता कारण ते ती गोष्ट कुठेच बोलत नाहीत, ते मनात गुपीत ठेवतात. कारण त्यांचा पोटात आधीच जगभरच्या गुपितांचा खजिना असतो. कुठे काय बोलायला हवं आणि काय गुपित ठेवायला हवं याची त्यांना योग्य जाण असते.

५) बहुआयामी असतात

एकाच वेळी अनेक काम करण्याचा कलेत पत्रकार पारंगत असतात. त्यांचा मनात अनेक विषय चालू असतात. लोकल पासून ग्लोबल पर्यंत सर्वकाही ते मनात साठवतात.

 

multitalent-inmarathi
humanresourcesonline.net

ते घरातली कामं तर व्यवस्थित करताच सोबत बाहेरची कामं पण शिताफीने सांभाळतात. ते त्यांचा जोडीदारावर प्रेम करण्यापासून कचरत नाहीत. ते मुक्त असतात.

६) तुम्हाला तुमची वेगळी स्पेस देतात

तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा पत्रकार खूप सन्मान करतात. जर तुम्ही एखाद्या पत्रकारासोबत रिलेशन मध्ये असाल तर तो इतर लोकांसारखा तुम्हाला वैयक्तिक बाबतीत निर्णय घेताना कधीच अडवणार नाही.

 

live-in-relationship-inmarathi02
racolblegal.com

त्याला जगाच्या समस्येची चिंता असते त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टीत तो न मागता फुकट सल्ले देऊन लुडबुड करत नाही. तुम्हाला हवा तसा वेळ व प्रेम देतो.

७) पत्रकार प्रचंड मेहनती असतात

पत्रकार होणं सोपं नसतं. प्रत्येक गोष्टीमागे तथ्य तपासताना व प्रत्येक गोष्टीचा संदर्भासहित अभ्यास करताना अनेकदा ते रात्र रात्र जागतात. अनेक वेळा कठीण अश्या परिस्थितीत राहून स्टोरी शोधतात.

 

workaholism-inmarathi
WordPress.com

सीएमपासून तर सरपंचापर्यंत सर्वांशी रिलेशन जपतात. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला देखील जपतात. कधी हि हार मानत नाहीत.

८) उत्कृष्ठ वक्ते आणि श्रोते

पत्रकार आपली भूमिका अत्यंत हिररीने आणि चौकसपणे मांडतात. कसलीच भीती न बाळगता स्पष्ट पणे भूमिका घेतात. मग ती त्यांचा क्षेत्राशी संबंधित असो वा वैयक्तिक आयुष्याशी हे फार महत्त्वाचं नसतं.

 

speaker-inmarathi
tedx.com

ते खूप छान प्रकारे बोलतात. तश्याच प्रकारे तुमचं म्हणणं, तुमची बाजू समंजसपणे ऐकून घेतात. त्यांना गर्भित इशारे पटकन समजतात.

हे झाले काही ठराविक गुण. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, पण हे गुण पत्रकारात ठळकपणे दिसून येतात. असे गुण तुमच्या पार्टनरकडे असतील तर चांगल्या नात्यासाठी आणखी काय हवं असतं?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?