फ्रीजचा (अति) वापर आणि आपले आरोग्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : डॉक्टर विवेक कुलकर्णी

===

अन्न पदार्थ हे नेहमी ताजे खावे, शक्यतो ज्या दिवशी केलेत त्याच दिवशी ते संपवून टाकावेत. असा अगदी गेल्या पिढी पर्यंत प्रत्येक घराचा शिरस्ता होता. गृहिणी च काम हलक व्हावं म्हणून स्वयंपाक घरात जी क्रांती झाली त्याची बाळे म्हणजे स्वयंपाक घरात विराजमान झालेला फ्रीज आणि मायक्रोवेव्ह. त्यामुळे पूर्वी घरात म्हणून उन्हाळी कामे म्हणून पापड , कुरडया, सांडगे असे तोंडी लावण्याचे पदार्थ करून साठवणीच खाण म्हणून वेगळी ठेवलेली असायची त्याची व्याख्या बदलून आता भांडी घासायला नको आणि सारखा सारखा स्वयंपाक नको म्हणून सगळ्या अन्न पदार्थाची रवानगी फ्रीजमध्ये साठवणीचं खाण म्हणून होत राहते.

 

fridge-inmarathi05
ndtv.com

फ्रीज म्हणजे तसा status symbol च. पूर्वी स्वयंपाक घराच्या ओट्यावर, फडताळात, बाहेर जे काही असेल त्या सगळ्याची रवानगी फ्रीजमध्ये परत तेच पदार्थ फ्रीज मधून काढून गरम करून खायचे. उरलेलं भेंडोळ परत फ्रीज मध्ये परत कधीतरी आठवण आल्यावर परत तोच कार्यक्रम.

कधी विचार केला आहे का की, हे असे गारेगार अन्न सतत गरम करून खाण्यामुळे एका अर्थी आपण आपल्या शरीरावर अत्त्याचार करत असतो.

 

fridge-inmarathi03
jezebel.com

अन्नाची सगळी पोषण मूल्य फ्रीजमध्ये ठेवून ठेवून नाश पावतात. अनेक फ्रीज कंपनी आपल्या फ्रीज च ज्या पद्धतीने मार्केटिंग करत असते त्याची अनेकांना भूल पडत असते. फ्रीज मध्ये ठेवले याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की ते अन्न ताजे राहते. सगळी पोषणमूल्य गेल्यावर राहिलेला गार चोथा फक्त आपण पोटामध्ये ढकलत राहतो.

असे अन्न आयुर्वेदाने “तामसिक” प्रकारात वर्ग केलेले आहे. असे अन्न सतत खावून शरीरातील उत्साह नष्ट होतो. आळशी पणा वाढतो. कुठलेही काम करण्यात रस वाटत नाही. शरीर आणि बुद्धी दोन्ही ला मांद्य येते. सतत चिडचिडेपणा वाढीस लागणे ही याच अन्नाची परिणीती असते. अगदी रात्री चिरून फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी देखील सकाळी आपण काढतो तेव्हा तिच्या मधले vitamin, minerals नाश पावलेले असतात.

 

hotel-food-inmarathi
hilton.com

जेव्हा आपण कुठल्याही हॉटेल मध्ये कधी खाण्यास जातो तेव्हा कधी निरीक्षण केल तर लक्षात येईल की पंजाबी , continental , North Indian च्या नावाखाली ज्या १७६० डिशेश ची यादी दिलेली असते त्या मध्ये वस्तुत: फरक काहीच नसतो. या डिशेश चे मसाले कित्येक दिवस बनवून हॉटेल च्या विशालकाय भटारखाण्यातील महाकाय फ्रीज मध्ये विराजमान झालेले असतात. ऑर्डर दिल्यानंतर हेच मसाले/ करी परतून त्यात पनीर चे तुकडे आणि भाज्या टाकून मखनवाला, हंडी, कोल्हापुरी, कढाई, अशा गोंडस नावाखाली हे पदार्थ समोर येतात.

असे प्रचंड तापमानाला थंड केलेले आणि पुन्हा प्रचंड तपामानला गरम केलेले दर्जाहीन, पोषणमूल्य शून्य असलेले तरीही चटकदार, मसालेदार, पदार्थ भले शरीराला स्थौल्य देत असतील, जठराग्नी मंद करून टाकत असतील, आम्लपित्ता सारखे, आमवाता सारखे त्रास देत असतील पण जिभेच सुख ज्यांना महत्वाच वाटत त्यांना हेच पदार्थ परब्रम्ह प्रतीत होतात आणि – घरच्या अन्नपूर्णे ने प्रेमाने रांधून बनवलेले ताजे, कमी मसालेदार तरीही रुचकर अन्न “So tasteless!” म्हणून घरच्या फ्रीज मध्ये अन तिथून कचऱ्याच्या डब्यात जातात.

 

fridge-inmarathi04
nestle.in

आपल्या मुलांसाठी सगळ सर्वोत्तम हव असा आग्रह धरणारे पालक, सर्वोत्तम कपडे, बूट, चपला, सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जिथे त्या मुलांच्या शारीरिक विकासाचा प्रश्न येतो तेव्हा प्रोसेस केलेले सत्वहीन आणि तळलेले बटाटा चिप्स, कुरकुरे, mac D , पिझ्झा, प्रचंड साखर असलेले कोक, पेप्सी ( लहान मुलांमध्ये सुद्धा आढळून येणारा हाडे ठिसूळ करणारा osteoporosis हा आजार, सांधेदुखी आणि या शीतपेयांचा अति वापर (over consumption) यांचा अगदी जवळचा संबंध आहे.

तरीही मुलाला आवडते म्हणून १.५ -२ लिटर चे कोक पेप्सी घरात आणून ठेवणारे पालक तुमच्या आजूबाजूला सहज सापडतील.) याला विकास कस काय म्हणता येईल?

 

microwave-oven-inmarathi
yesmytime.com

चुलीवर शिजवलेला स्वयंपाक so unhyginic म्हणणारे लोक मायक्रोवेव्ह मध्ये तास तास भर ठेवून मैदा, अंडी आणि ५० प्रकारचे वेगवेगळे चीज घालून बनविलेला काला मुलांना प्रेमाने खावू घालतात त्या वेळी त्यांच्या मनात असा प्रश्न कधीच येत नाही की, हे अन्नाच्या नावाखाली आपण स्वत:वर आणि आपल्या मुलांवर एक प्रकारे अन्याय करत असतो.

 

fresh-vegetables-inmarathi
thecurrycousins.wordpress.com

शरीर ही एक देणगी आहे आणि त्याला स्वस्थ ठेवण्यासाठी फार काही अट्टाहास करण्याची गरज नाही. स्वच्छ, ताजे, आपल्या मातीत उगवणारे आणि कमीत कमी प्रक्रियांचा वापर करून शिजवलेले अन्न शरीर बलवान करण्यास समर्थ असते. त्यासाठी महागडी उपकरणे वापरलीच पाहिजेत अशी अट नाही. अर्थात आधुनिकीकरणाला विरोध असण्याचे काही कारण नाही. परंतु जे अन्न आपण आपल्या शरीराला देतो त्याबाबत तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

उत्तम शारीरिक आरोग्य हे केवळ शरीरच चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवते , भावनिक समतोल (emotional balance ) देखील राखते. आपलं पोट आणि पोटात जाणारे अन्न हे आपल्या रोगांचे प्रमुख कारण असते.

त्यामुळे पोटात अन्न केवळ ढकलण्यापेक्षा जिभेचे चोचले पुरवण्या पेक्षा थोडी शिस्त पळून शरीराचं म्हणण ऐकलंच पाहिजे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?