कॅन्सर टाळण्याचा “आल्हाददायक” मार्ग : रेड वाईन प्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

शीर्षक वाचून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की रेड वाईन सारखं एक अल्कोहोलयुक्त पेय तुम्हाला कॅन्सरच्या धोक्यापासून कसं वाचवू शकतं? पण हो, हे खरंय. हे मी नुसतं सांगत नाहीये तर अभ्यासकांच्या एका गटाने सिद्ध केलंय.

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ दि जनेरिओ येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, रेड वाईनमध्ये Resveratrol, हे एक अँटी-ऑक्सिडेंट असते, जे कॅन्सरच्या पेशींच्या निर्मितीत साहाय्य करणाऱ्या P53 protein clumps चे उत्परिवर्तन (mutation) नियंत्रित करतात.

कॅन्सर हे WHO च्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर मृत्यूचे नंबर दोनचे कारण आहे. सहापैकी एका व्यक्तीचा मृत्यू कॅन्सरने होतो आहे. अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन हे कॅन्सरच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.

 

cancer-inmarathi
d2v4vjmuxdiocn.cloudfront.net

तर मग रेड वाईन या मद्याचा कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण वास्तविक पाहता रेड वाईन ही अल्कोहॉलिक असली तरी ती प्यायल्याने खूप फायदे होतात. श्वासोच्छवासाच्या विकारांवर ही गुणकारी आहे आणि ती मेंदूला शांतता मिळवून देते.

पण यात महत्त्वाचा मंत्र म्हणजे ती योग्य तेवढीच घ्यायला हवी. अगदीच प्रमाणात नसेल तरी शक्य तेवढी कमी. अजून खोलात शिरण्यापूर्वी रेड वाईन बद्दल काही मूलभूत माहिती जाणून घेऊयात.

रेड वाईन कशी बनवितात?

रेड वाईन ही लाल किंवा काळ्या द्राक्षाच्या रसापासून बनवली जाते. प्रथम द्राक्षं ही चुरडली जातात आणि नंतर ती सालासकट बाजूला ठेऊन सामान्य वातावरणात आंबवली जातात. या वाईन तयार होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत द्राक्षांत मुळातच अस्तित्वात असलेलं यीस्ट किंवा बाहेरून घातलेलं यीस्ट हे द्राक्षांवर प्रतिक्रिया करतं आणि अल्कोहोल निर्माण होते. सामान्यपणे यातील अल्कोहोलचे प्रमाण १४.५% असते.

 

red-wine-inmarathi
youtube.com

रेड वाईन ही स्वास्थ्यासाठी चांगली का असते?

रेड वाईन ही resveratrol आणि catechin यांसारख्या ऑक्सिडेंटसची साठवणीची जागा असते. ते शरीरासाठी चांगले असतात. मात्र ऑक्सिडंंट्सचे प्रमाण हे रेड वाईनच्या प्रकारावर अवलंबून असते. रेड वाईन जेव्हा प्रमाणात घेतली जाते तेव्हा ती अल्झायमर, डिमेन्शिया, तणाव, हृदयविकार, आणि डायबिटीसचा धोका सुद्धा कमी करते असे मानले जाते.

मात्र वैज्ञानिकांनी याला अजून १००% अनुमोदन दिलेले नाही.

रेड वाईन आरोग्यासाठी घातक का ठरू शकते?

रेड वाईन हा अँटीऑक्सिडेंटसचा एक प्रभावी स्रोत आहे. पण तरीही हे नाकारता येणार नाही की ती अल्कोहोलयुक्त आहे आणि त्यामुळे तिचे अतिरिक्त सेवन केले तर तिच्या सेवनाचे बरोबर याच्या उलट तोटे सुद्धा होऊ शकतात.

अतिरिक्त मद्यपानामुळे लिव्हर सिरॉसिसचा धोका वाढतो. डिप्रेशन आणि डायबेटीसची रिस्क वाढते, किंवा अतिरिक्त मद्यपानामुळे त्या व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन लागू शकते.

ब्राझिलियन शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन काय सांगते?

वैज्ञानिकांनी Resveratrol चा, म्हणजेच रेड वाईन मधील अँटीऑक्सिडेंटसचा स्तनाच्या कॅन्सरच्या पेशींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.

P53 ही जीन सामान्य परिस्थितीत कॅन्सरस पेशी मारून टाकून ट्युमर सप्रेसर म्हणून काम करते. पण जेव्हा ह्या जीनच्या आकृतिबंधात किंवा रचनेत काही बदल होतात तेव्हा प्रोटीन क्लम्प्स निर्माण होतात, ज्यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

 

woman-holding-glass-inmarathi
dnaindia.com

संशोधनाचा निष्कर्ष:

त्यांच्या अभ्यासाअंती असे लक्षात आले की Resveratrol, हे P53 चे पुंजके बनणे (clumping) रोखते आणि शिवाय स्तनाच्या कॅन्सरच्या पेशी पसरण्यापासून आणि त्या अजून वाढत जाण्यापासून रोखते. मात्र resveratrol मधील नेमके कोणते घटक यासाठी कारणीभूत ठरतात हे अजून निश्चितपणे कळलेले नाही.

याआधी करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, रेड वाईन ही काही विशिष्ट जीवाणूंची वाढ होण्यापासून रोखते. हे जीवाणू periodontal diseases चा परिणाम म्हणून रक्तप्रवाहात शिरतात आणि कॅन्सरची शक्यता वाढवतात. त्यामुळे रेड वाईन ही कॅन्सर रोखण्यात सहाय्यभूत ठरू शकते याला पुष्टी मिळते.

याचा अर्थ मी अधिक प्रमाणात रेड वाईन चं सेवन करायला हवे असा होतो का?

जर तुम्ही नियमितपणे रेड वाईन चे सेवन करत असाल तर तुम्ही तुमचे सेवन वाढविण्याची अजिबातच गरज नाही करण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण जर तुम्ही अगदीच क्वचित रेड वाईन घेत असाल तर तुम्ही काही प्रमाणात त्याचे प्रमाण वाढवायला हरकत नाही. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे योग्य ठरेल.

 

chemotherapy-inmarathi02
cancer.gov

अभ्यासातून रेड वाईन ही कॅन्सर रोखू शकते हे समोर आले असले तरीही तिच्यात अल्कोहोलचे प्रमाण Resveratrol, जो अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक आहे. त्यामुळे केवळ त्याच घटकांचे सेवन करता आले तर ते भविष्यात अधिक उपयुक्त ठरू शकेल.

तसेच वाईनऐवजी तुम्ही अँटी ऑक्सिडेंटसने परिपूर्ण असलेली ब्लू बेरी, करवंद, डार्क चॉकलेट, शेंगदाणे असे पदार्थ खाऊ शकता.

शेवटी सांगायचं तर, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाला कारणीभूत ठरतो. तसंच रेड वाईन आणि इतर अल्कोहॉलिक पदार्थांचं आहे. त्यामुळे आवश्यक तेव्हा स्वतःवर ताबा ठेवणं हे गरजेचे आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे हेच खरे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?