क्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. कसोटी  मालिका २- १ ने हरल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेसाठी जोरदार तयारी केली. त्यानंतर जे झाले ते भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले गेले. भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरात नमवून एकदिवसीय मालिका ५ – १ या फरकाने आपल्या खिशात घातली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील अव्वल स्थान पटकावले.

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी – २० मालिका खेळत आहे. पहिला सामना जिकल्यानंतर असे वाटतच होते की, भारत ही मालिका ३ – ० ने आपल्या खिशात घालेल, पण तसे झाले नाही. परवा झालेल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट खेळ दाखवत, तो सामना जिंकला आणि परत एकदा या मालिकेमध्ये रंगत आणली आहे.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi
ndtv.com

या सामन्यामध्ये भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा खूप मार खाल्ला आणि एक वेगळाच रेकॉर्ड बनवला, जो कदाचित कोणत्याही गोलंदाजाला आवडणार नाही.


या सामन्यामध्ये चहलने ४ ओव्हरमध्ये ६४  धावा दिल्या.

भारताकडून एका   टी – २० सामन्यात सर्वात जास्त धावा देण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. याआधी हा रेकॉर्ड जोगिंदर शर्माच्या नावावर होता. पण मजेशीर गोष्ट ही देखील आहे की, एका सामन्यामध्ये सर्वात जास्त विकेट काढण्याचा रेकॉर्ड देखील चहलकडेच आहे, त्याने श्रीलंकेबरोबर झालेल्या एका सामन्यामध्ये सहा गाडी बाद केले होते.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi1
mid-day.com

एखाद्या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय टी – २० मध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट काढणाऱ्यांमध्ये फक्त जगातील दोनच फिरकीपटू आहेत आणि हे आतापर्यंत तीनदाच झाले आहे. त्यातील एक म्हणजे चहल आणि दुसरा म्हणजे श्रीलंकेचा अजंता मेंडिस. मेंडिसने हा पराक्रम दोनदा करून दाखवला आहे. आज आपण क्रिकेट इतिहासातील काहीच अशाच रिकॉर्डविषयी जाणून घेऊयात, जे कदाचित कधीही कुणी मोडू शकणार नाहीत.

१. रोहित शर्माची एकदिवसीय सामन्यामधील द्विशतके 

एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे काही मोजकेच फलंदाज आहेत. पण भारताच्या रोहित शर्माने हा पराक्रम एकदा – दोनदा नाहीतर तीनदा केला आहे.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi2
india.com

त्याची श्रीलंकेविरुद्ध खेळलेली २६४ धावांची इनिंग तर अफलातून होती. एकेकाळी ५० षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाजाला १०० धावा करणे देखील कठीण होते, पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कदाचित हा त्याचा रेकॉर्ड तोडणे कुणालाही शक्य होणार नाही.

२. ब्रायन लाराच्या कसोटीमधील ४०० धावा 

ब्रायन लारा हा वेस्ट इंडिजचा एक महान खेळाडू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi3
crickethighlights.com

त्याने २००४ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एक डावामध्ये ४०० धाव ठोकल्या होत्या. हा त्याचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे आणि तो तोडणे खूपच कठीण आहे. यावेळी त्याने मॅथ्यू हेडनचा ३८० धावांचा विश्व रेकॉर्ड तोडला होता.

३. मुरलीधरनचे विकेट्स

जगातील काही महान फिरकीपटूंचा विचार केला तर, श्रीलंकेच्या मुथिया मुरलीधरनचे नाव सर्वात अव्वल स्थानी येते. मुरलीधरनने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कितीतरी रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi4
wahcricket.com

मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीमध्ये १३३ कसोटी सामन्यांमध्ये ८०० विकेट्स घेतले आहेत आणि ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३४ विकेट्स घेतले आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण १३४७ विकेट्स घेतले आहेत, जे आजपर्यंतचे एखाद्या खेळाडूचे सर्वात जास्त विकेट्स आहेत. त्याचा हा विकेट्सचे रेकॉर्ड तोडणे खूप कठीण आहे.

४. जेसन गिलेस्पीचे नाईट वॉचमन म्हणून दुहेरी शतक

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi5
cricket.com

२००५  मध्ये बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये जेसन गिलेस्पी हा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करण्यासाठी आला होता. या सामन्यामध्ये त्याने दुहेरी शतक ठोकून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजही तसाच कायम आहे.

५. अनिल कुंबळेचे १० विकेट्स

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi6
cricketcountry.com

अनिल कुंबळे हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यामधील एका इनिंगमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम बनवला होता. हा पराक्रम त्याने भारताचा अट्टल प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विरोधात करून दाखवला होता. अनिल कुंबळेचा हा रेकॉर्ड अजूनही कोणताही गोलंदाज तोडू शकलेला नाही आणि तोडणे कदाचित अशक्यच आहे.

६. सर्वात जलद स्टॅम्पिंग

सर्वात जलद स्टॅम्पिंग करण्याचा रेकॉर्ड भारताच्या माजी कर्णधाराच्या म्हणजेच कॅप्टन कूल धोनीच्या नावावर आहे. त्याने एक स्टॅम्पिंग फक्त ०.०९ सेकंदामध्ये केली होती.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi7
playo.co

जी आपल्या पापण्या फडकावण्यापेक्षाही जलद आहे. आपल्याला पापण्या फडकवण्यासाठी ०.३ सेकंद लागतात. धोनीचा हा रेकॉर्ड कदाचित कोणताही विकेटकिपर तोडू शकणार नाही, कारण धोनी फक्त एकच आहे. त्याचा रेकॉर्ड तोच तोडू शकतो.

७. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड

क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावे क्रिकेटचे कितीतरी रेकॉर्ड्स नोंदवलेले आहेत. सचिन सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यांनी एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

 

Sachin-Tendulkar-marathipizza06
rediff.com

सचिन यांची एकदिवसीय क्रिकेटची कारकीर्द देखील खूप मोठी होती. सचिन जवळपास २२ वर्ष ९१ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६ धावा, १५४ विकेट्स आणि १४० झेल देखील घेतले आहेत. जो एक वेगळाच रेकॉर्ड आहे. अजूनही काही रेकॉर्ड्स फक्त त्यांच्याच नावावर आहेत.

८. सर डॉन ब्रॅडमन यांची सरासरी

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi8
cricmatez.com

सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीची सरासरी ९९.९४ आहे. जी आतापर्यंतच्या कोणत्याच खेळाडूची नाही. त्यांनी ९९.९४ च्या सरासरीने ५२ कसोटी सामन्यांमध्ये ६९९६ धावा केल्या होत्या. त्यांचा हा रेकॉर्ड देखील मोडणे कोणत्याही फलंदाजाला कदाचित शक्य होणार नाही.

९. युवराज सिंगच्या १२ चेंडूत ५० धावा

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi9
india.com

युवराज सिंगने २००७ च्या टी – २० विश्व चषकामधे १२ चेंडूंमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली होती. यामध्ये त्याने ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते. त्याचा हा रेकॉर्ड देखील अजूनही कुणी तोडलेला नाही.

१०. एबी डिव्हिलर्सचे  जलद शतक

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi10
ndtv.com

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ए. बी. डिव्हिलर्स याने कोरी अँडरसनचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये ३६ चेंडूंमधील शतकाचा रेकॉर्ड तोडला आहे. एबीने फक्त ३१ चेंडूंमध्ये शतक ठोकले आहे आणि त्याचा हा रेकॉर्ड देखील अजून तसाच कायम आहे.

११. बेस्ट बॉलिंग फिगर

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi11
indianexpress.com

भारताच्या स्टुअर्ट बिनीने एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात कमी धावा देऊन जास्त विकेट्स काढण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने आपल्या ४.४ ओव्हरमध्ये फक्त ४ धाव देऊन बांगलादेशचे सहा गाडी बाद केले होते.

असे हे आणि इतर काही क्रिकेटच्या इतिहासातील रेकॉर्ड्स कदाचित येणाऱ्या क्रिकेटर्सना तोडणे खूप कठीण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *