विदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात? ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध धर्म, पंथ, जातीचे लोक आपल्याला येथे पाहायला मिळतात. विविध परंपरा आणि सण असलेला आपला भारत सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतो.

संस्कृती जपण्यामध्ये भारत कुठेही मागे पडलेला नाही. विदेशातील दरवर्षी कितीतरी लोक भारतामध्ये पर्यटनासाठी येतात.

आपण आपल्याच देशाला कधी – कधी नावे ठेवतो, पण परदेशातील लोक नेहमी भारताची स्तुतीच करताना आपल्याला दिसतात.

पाहुण्यांना देव मानायची रीत, पहिल्यापासूनच आपला देशात चालत आलेली आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला येणारी परदेशी माणसे ही बहुतेकदा चांगलाच अनुभव घेऊन त्यांच्या देशात परततात.

भारतामध्ये मिळणारे पदार्थांमधील वेगळेपण, कदाचितच तुम्हाला दुसऱ्या कोणत्या देशात पाहण्यास मिळेल.

 

culture inmarathi
eSamskriti

सर्व धर्मातील माणसे येथे पाहण्यास मिळतात, त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी आणि भारताला जवळून अनुभवण्यासाठी बहुतेक विदेशी लोक भारतामध्ये येतात.

चला तर मग जाणून घेऊया अश्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या विदेशी लोकांना देखील भारतात पर्यटनासाठी येण्यासाठी आकर्षित करतात..

१. पदार्थांमधील विविधता

indian attraction.marathipizza
wordpress.com

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असलेली विविधता परदेशी पर्यटकांना खासकरून आवडते. शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतामध्ये उत्तम मिळतात.

चटणी, करी आणि भाज्यांचे मोहक वर्गीकरण पर्यटकांना आकर्षित करते. वडापाव आणि चटणी यांसारखे रस्त्यावरील पदार्थ देखील त्यांना आवडतात आणि हे पदार्थ ते मोठ्या आवडीने खातात.

२. भारताचा इतिहास

indian attraction1.marathipizza
blogspot.com

भारताला खूप मोठा इतिहास लाभला आहे. भारताचा इतिहास हा चित्र, शिल्प आणि शिलालेखांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. राजे – राजवाडे, क्रांतिकारी चळवळी यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

३. पर्यटन स्थळे

indian attraction.marathipizza2.jpg
morungexpress.com

विविधतेच्या दृष्टीने भारताचा भूगोल हा अभिमानास्पद आहे. केरळचे बॅकवॉटर असो किंवा लेह – लडाखचा उंचीवरील रोमांचकारी प्रवास असो. अश्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांसाठी भारत प्रसिद्ध आहे. विदेशी पर्यटकांना ही पर्यटन स्थळे खूप भावतात.

४. विधी, परंपरा आणि संस्कृती

indian attraction.marathipizza3
tribune.com

विवाहाच्या परंपरा आणि उत्साहवर्धक धार्मिक विधी अनेक वेळा विदेशी पर्यटकांवर छाप सोडून जातात. भारतामध्ये साजरे करणारे सण पाहण्यासाठी हे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात. काही विदेशी सेलिब्रेटी देखील भारतीय संस्कृतीनुसार विवाह करण्यासाठी उत्सुक आहेत. येथील विवाहाची भव्यता आणि अतिथी पाहून त्यांना येथील विवाह सोहळा खूप आवडतो.

५. भारतीय साहित्य आणि संगीत

indian attraction.marathipizza4
commerceforias.com

भारताने जगाला अमर्त्य सेन आणि रवींद्रनाथ टागोर यांसारखे नोबेल लॉरेट्स दिलेले आहेत. भारताच्या पंडित रविशंकर यांनी वूड्सस्टॉक फेस्टिव्हलमध्ये आपल्या अभिनयाने जगावर विजय मिळवला. त्यामुळे भारतीय साहित्य आणि संगीत विदेशातील पर्यटकांना भुरळ घालते.

६. स्मारके

indian attraction.marathipizza5
vueindiatours.com

भारतातील आग्रामधील ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे आणि त्यानंतर अजिंठा – वेरूळ गुहा आणि खजुराहो मंदिर हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

७. भारतीय प्रजाती

indian attraction.marathipizza6
unc.edu

भारतात काही दुर्मिळ आणि जवळपास नामशेष प्रजाती पाहण्यास मिळतात. रॉयल बंगाल टायगर, उत्तर – पूर्व अभयारण्यांमध्ये असलेला गेंडा इत्यादींसह विविध पर्यावरणातील गोष्टी प्रसिद्ध आहेत. जिम कॉर्बेट यांच्या कादंबरीमध्ये भारताच्या सफारीबद्दल आणि पशुसंवर्धनास देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल सांगण्यात आलेले आहे. या भारतीय प्रजाती पाहण्यासाठी पर्यटक खासकरून भारतात येतात.

८. अतिथी देवो भव

indian attraction.marathipizza7
amazonaws.com

भारतामध्ये भारतीय पर्यटन मंडळाकडून आमीर खान यांच्यामार्फत अतिथी देवो भवो हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे हसतमुखाने स्वागत केले जाते. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन आपल्या भारताचे नाव खराब होऊ नये, असा यामागचा हेतू आहे आणि आज प्रत्येकजण यामध्ये सहभागी झालेले आहेत.

ह्या आणि यांच्यासारख्या कितीतरी गोष्टी विदेशी पर्यटकांना आपल्या भारतात पर्यटनाला येण्यासाठी आकर्षित करतात. तुमचे देखील काही मत असले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “विदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात? ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर !

  • December 16, 2018 at 1:34 pm
    Permalink

    आभिमान वाटावा असा लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?