आपल्याकडे दुध २-३ दिवसांत खराब होतं, पण विदेशात मात्र ते आठवडाभर टिकतं..असं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपल्याकडे दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाशिवाय जशी चहाची कल्पना आपण करू शकत नाही, अगदी तसंच दुधाशिवाय देवाच्या प्रसादाची कल्पना देखील करवत नाही.

पाहायला गेलं तर प्रत्येक महत्त्वाच्या खाद्यपदार्थामध्ये दुध अतिशय महत्वाची भूमिका बजावतं आणि आपल्या जिभेची चव शांत करतं.

 

milk-marathipiza
jagran.com

असं हे दुध आपल्या घरी पोच होतं प्लास्टिकच्या थैल्यांमधून! सकाळी सकाळी पहाटे दुधवाला घराच्या दरवाज्याबाहेर दुध पिशवीची डिलिव्हरी करून जातो आणि जर दुधवाला नसेलच तर सकाळी सकाळी दुध केंद्रांवर, डेअरीवर किंवा दुकानांमध्ये हजेरी लावणं आलंच.

 

milk-marathipizza01
climatechange.thinkaboutit.eu

बरं तर ही दुधाची पिशवी काही जण एका दिवसाला संपवत असतील तर काही जण दोन-तीन दिवस वापरत असतील, पण सगळीकडे एकच सल्ला दिला जातो की दुध लवकर संपवून टाका नाहीतर खराब होईल किंवा नासेल. म्हणजेच काय तर आपल्याला ही खात्री असते की आपल्याकडच दुध २ दिवसांच्यावर टिकणार नाही.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की अमेरिका, युरोप आणि विदेशातील इतर बऱ्याच देशांमध्ये दुध आठवड्यापेक्षा जास्त काळ सहज राहतं. ही गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्हाल देखील प्रश्न पडला असेलच की असं का? चला तर आज जाणून घेऊया या प्रश्नामागचं उत्तर!

 

milk-marathipizza02
edition.cnn.com

यामागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे दुध उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत दुधाला अनेक वेळा उच्च तापमानांमधून जावं लागतं. म्हणजे दुधाच्या प्रक्रियेची सुरुवातच चुकीची होते असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गायीच्या कासेमधून दुध काढल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याकडे सामान्यत: ६ तासांचा कालावधी लागतोच आणि एवढ्या वेळ कोणकोणत्या प्रक्रियांमधून गेलेले आपल्याकडचे हे दुध ते जागतिक स्तरावर घालून दिलेल्या डेअरी मानकनानुसार विक्री करण्यासारखेही नसते.

 

milk-marathipizza03
coldchainindia.files.wordpress.com

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुधात भेसळ करण्याचे नवनवीन फंडे शोधले जातात, ज्यामुळे आपसूकच दुधाची गुणवत्ता ढासळते. आपल्याकडे दुधासोबत अजून एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे जवळपास दिवसातून ४-५ वेळा दुध गरम केले जाते.

पण असं करणं चुकीच आहे, कारण सारखं सारखं दुध गरम केल्याने दुधाचे जीवनमान कमी होते, अर्थात ते लवकर खराब होते. तसेच प्रणामापेक्षा जास्त गरम केल्यास त्यातील तत्वे नष्ट होण्याचा धोका असतो.

 

milk-marathipizza04
oer.nios.ac.in

डेअरीमध्ये Pasteurization प्रक्रीयेवेळी देखील दुधातून Bacterial Spores संपूर्ण नष्ट होत नाही. त्यामुळे पुन्हा दुधामध्ये Bacterial निर्माण होऊ शकतात. यावर उपाय म्हणून Ultra High Temperature पद्धतीचा वापर करत येऊ शकतो, पण समस्या ही आहे की या पद्धतीमुळे दुधाची चव थोडीफार बदलते आणि दुध पूर्णत: सफेद रंगाचं दिसू लागतं.

 

milk-marathipizza05jpg
www.frbiz.com

चव आणि रंग बदलल्यास ग्राहक दुध खरेदी करणार नाहीत या भीतीमुळे दुध उत्पादक ही पद्धती आपल्याकडे वापरत नाहीत. परंतु या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दुध एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकून राहतं.

अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये दुध जास्त काळ टिकून राहण्याचं अजून एक कारण म्हणजे गायीच्या कासेतून दुध काढल्यानंतर ते थंड तापमानामध्ये स्टोअर केले जाते. पुढे त्यावर प्रक्रिया करून झाल्यावर ग्राहकाजवळ पोचेपर्यंत देखील हे दुध थंड तापमानाच्या सानिध्ध्यातच ठेवले जाते.

 

milk-marathipizza06jpg
boxlifemagazine.com

आपल्याकडे मात्र उलट परिस्थिती असल्यामुळे दुध २-३ दिवसांमध्ये खराब होऊन जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?