दुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का असतात?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गाड्या कश्याही असोत, महाग असोत, स्वस्त असोत, ती कार असो, रिक्षा असो व थेट बस असो, त्यांमध्ये एका गोष्टीचे साम्य असते ते म्हणजे त्यांची काळी चाके! तुमच्यापैकी बरेच जण विचार करत असतील गाड्यांची चाके काळी आहेत त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तर मित्रांनो हीच तर बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. चाके काळ्या रंगाचीच का? इतर रंगांनी काय घोडं मारलंय? चला आज या मागचं कारण देखील जाणून घेऊ या.

 

black-tyres-marathipizza01
tyremarket.com

पूर्वी गाडीची चाके लाकडापासून आणि लोखंडी चकत्यांपासून बनवली जाते असत. १८९५ मध्ये पहिल्यांदा बनवण्यात आलेले रबराचे चाक हे पांढऱ्या रंगाचे होते. परंतु तरीही पुढे पांढऱ्या रंगाऐवजी काळ्या रंगाची चाके तयार करण्यात येऊ लागली.

रबराचा मूळ रंग हा दुधासारखा पांढरा शुभ्र असतो. पण चाक दीर्घ काळ टिकावे म्हणून त्याचा टिकाऊपणा वाढवण्याच्या उद्देशाने त्यामध्ये कॉटन थ्रेडचा वापर केला जातो. कॉटन थ्रेडचा वापर केल्यामुळे चाकाच्या उष्णतेमध्ये घट होऊन त्याची स्थिरता वाढवण्यास मदत होते.


तथापि, आज आपण जी काळी चाके बघतो त्यामध्ये, रासायनिक मिश्रणामुळे तयार होणारे ‘ब्लॅक कार्बन’ हे असते. हे ब्लॅक कार्बन रबरामध्ये कायमस्वरूपी स्थिर झाल्यानंतर ते चाकाची ताकद आणि टिकाऊपणा वाढवते, अशी चाके उत्पादकांच्या आणि चालकांच्या दृष्टीनेही उच्च गुणवत्तेची मानली जातात.

black-tyres-marathipizza02
bmw.co.uk

हे कार्बन चाकाचे आयुष्य वाढवते आणि उष्णतेला चाकांपासून दूर ठेवते. त्यामुळे जास्त लांब पल्ल्याला जात असताना आणि जास्त तापमान असलेल्या भागामध्ये ही चाके गरम होत नाहीत. कार्बन सूर्याच्या प्रकाशाने निर्माण होणाऱ्या यूव्ही किरणे आणि ओझोनपासून चाकांचे संरक्षण करून त्यांची गुणवत्ता वाढवते.

काळी चाके फक्त ताकद आणि टिकाऊपणा वाढवत नाहीत तर ते चालकाची सुद्धा चांगल्याप्रकारे मदत करतात. चाके चालकाला योग्य ते संरक्षण देण्यास मदत करतात. चाके हा गाडीचा मुख्य आणि महत्त्वाचा घटक आहे. गाडीमधील प्रत्येक क्रिया हाताळण्यासाठी चाके महत्त्वाची भूमिका बजावतात.

ब्रेकिंगपासून वेग वाढवणाऱ्या पर्यंत सर्वच गोष्टी चाकांवर अवलंबून असतात. ही चाके तुमचा प्रवास सुखकर बनवतात आणि सहसा अपघात होण्यापासून वाचवतात. या सर्व कारणांमुळे काळ्या रंगाची चाके लोकप्रिय आहेत, त्यांना वेगळा पर्याय नाही.

 

black-tyres-marathipizza03
medium.com

याचा अर्थ हा नाही की इतर रंगाच्या चाकांचे उत्पादन होत नाही, रंगीत चाके असलेल्या गाड्या सुद्धा सध्या अस्तित्वात आहेत, परंतु त्या दैनंदिन वापरासाठी योग्य वाटत नाहीत. ती चाके गाडीची शोभा कमी करतात आणि महत्त्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये काळ्या चाकांसारखा टिकाऊपणा आणि सुरक्षा नसते त्यामुळेच आपल्याला सगळीकडे काळ्या रंगाचीच चाके दिसतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *