रेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा रेल्वे एक महत्वपूर्ण भाग आहे.

या रेल्वेतून प्रवास करताना सहज कधीतरी नजर जाते रेल्वे रुळांवर आणि त्याच्यामध्ये पडलेल्या असंख्य लहान लहान दगडांवर…

 

Pic-1

 

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना या रुळांच्या मध्ये खडी ओतताना देखील पाहिलं असेल. मनात विचार येतो – असं का? काय उपयोग होतो या दगडांचा?

 

track-inspection-car-179231_640

 

जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा जमीन आणि रेल्वे रुळांमध्ये कंपन निर्माण होते. उष्ण तापमानात रूळ प्रसरण पावतात आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. वातारणातील बदलामुळे रेल्वे रुळाच्या आसपास रानटी गावात उगवते.

या सर्व गोष्टींना उपाय म्हणून रेल्वे रुळांमध्ये दगडी खडी टाकली जाते.

 

iStock_000006858448Small

 

ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…!

खडी टोकदार असल्याकारणाने लाकडाच्या पट्ट्या यांवरून घसरत देखील नाही. (सध्या सिमेंटच्या आणि अधिक टिकाऊ सामग्रीपासून बनवलेल्या पट्ट्या वापरल्या जातात. परंतु बहुतांश रेल्वे रुळांमध्ये अजूनही लाकडाच्या पट्ट्यांचाच वापर केल्याचे आढळून येते.)

 

maxresdefault (1)

 

रेल्वेचा संपूर्ण जोर प्रथम लाकडाच्या पट्ट्यांवर येतो आणि हाच जोर पुढे या दगडी खडींवर टाकला जातो. यामुळे कंपन, रुळांचे आकुंचन आणि रेल्वेचा जोर सर्वच गोष्टी सहजगत्या पेलल्या जातात.

सामान्यत: रेल्वे रूळ हे जमिनीपासून काही अंतरावर बसवले जातात त्यामुळे पावसाचे पाणी देखील थांबत नाही. कधीकधी रेल्वे रुळांमधील ही खडी जोराच्या पावसात वाहून जातात. त्यामुळे सर्वप्रथम दगडी खडी टाकण्याचे काम तत्परतेने केले जाते.

 

hqdefault (1)

 

रेल्वे रूळ टाकताना भक्कम पायाच्या रुपात सर्वप्रथम ही दगडी खडी टाकली जाते आणि नंतर त्यावर लाकडाच्या पट्ट्या बसवल्या जातात.

या दगडी खडीमुळेच कित्येक रेल्वेच्या दुर्घटना टाळल्या जातात.

Untitled

याला म्हणतात मूर्ती लहान पण काम महान!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 66 posts and counting.See all posts by vishal

2 thoughts on “रेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?