प्रियांकाच्या “त्या” केसांवर भरपूर विनोद केले ना? आता समजून घ्या त्या लूक मागचं खरं कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकाल सोशल मिडीयावर कोण कधी आणि का ट्रोल होईल याचा काही नेम नाही आणि एकाने ट्रोल केलं कि हळूहळू तो ट्रेंडच होत जातो. या विषयावर बोलताना बरेच जण ‘नदीचं आणि ट्रेंडचं मूळ शोधू नये’ अशी गंमतीशीर कमेंट करतात.

गेले दोन-तीन दिवस प्रियांका चोप्रा अर्थात ‘पिगी चॉप्स’ ला ट्रोल करण्याचा ट्रेंड सोशल मिडीयावर पसरला आहे, याला कारण ठरलेत ते प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले काही फोटो आणि त्या फोटोजमधला तिचा विचित्र लुक!

 

 

पण एरवी स्टाईल आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्या प्रियांकाला तिच्या या अवताराची जाणीव नसेल का? की तिने ‘असा’ अवतार करून घेण्यामागे खरंच काही कारण असेल? असलं तर ते कुठलं कारण आहे ज्यामुळे प्रियांका एवढी ट्रोल होतेय?

सगळ्यात आधी ‘मेट गाला’ म्हणजे काय?

न्यूयॉर्क मधील ‘मेट्रोपोलीटियन म्युझियम ऑफ आर्ट’ हे युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय(म्युझियम) आहे, ज्याला ‘Met’ असेही म्हटले जाते.

या म्युझियमच्या कॉश्च्युम इंस्टिट्यूटतर्फे निधी गोळा करण्यासाठी दर वर्षी ‘Met Gala’ नावाचा उपक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमाने कॉश्युम इंस्टिट्यूटच्या अ‍ॅन्युअल फॅशन एक्झिबिशनचे उद्घाटन होते.

 

Star Tribune

प्रत्येक वर्षी ‘Met Gala’ साठी त्या वर्षाच्या कॉस्ट्यूम इंस्टिट्यूट एक्झिबिशनची थीम ही ऑफिशियल कॉश्च्युम थीम असते आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या कपड्यांशी कार्यक्रमाची थीम जुळावी यासाठी आयोजक त्यांना आपल्याइथून ‘शॉपिंग’ करायला सांगतात.

दरवर्षी बरेच सेलिब्रिटी हे असे प्रदर्शनाच्या थीमला पूरक असणारे कपडे ‘समथिंग हटके’ म्हणून घालतात आणि रेड कार्पेटवर मिरवतात सुद्धा.

२०११साली डिझाईनर अलेक्झांडर मॅकक्वीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवलेली ‘सॅव्हेज ब्युटी’ ही थीम असो; किंवा २०१८च्या ‘फॅशन अँड दि कॅथलिक इमॅजीनेशन’ सारखी विस्तृत थीम असो; दरवर्षीची थीम ही अशीच हटके काहीतरी असते.

चित्रविचित्र कपडे घालण्याची सुसंधी म्हणून जागतिक स्तरावरचे बरेच सेलिब्रिटी या इव्हेंटची आतुरतेने वाट पाहतात.

 

YouTube

यावर्षी नेहमीप्रमाणेच मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिनांक ६ मे २०१९ रोजी ‘मेट गाला’ संपन्न झाला आणि अशा या कार्यक्रमाची या वेळची थीम होती ‘कॅम्प : नोट दी फॅशन’!

‘कॅम्प’ थीम विषयी !

आता ‘कॅम्प’ म्हटलं की आपल्याला एखाद्या नदीकाठी/जंगलात वगैरे निसर्गाच्या सानिध्यात केलेलं कॅम्पिंग आठवून जातं, पण या थीमचा अशा कॅम्पशी काहीच संबंध नाही. मग हा ‘कॅम्प’ कुठला ? तर तो आहे सुसान सोन्टॅग यांच्या १९६४सालच्या ‘नोट्स on कॅम्प्स’ या प्रबंधाशी!

 

Metropolitan Museum of Art

थोडेसे प्रबंधाविषयी !

या प्रबंधाच्या सुरुवातीलाच ‘कॅम्प’ची व्याख्या स्पष्ट करताना सुसान म्हणते, ‘हे आहे कृत्रिम, कलात्मक/कुशल आणि अतिशयोक्तीने भरलेल्या गोष्टींवरचे प्रेम!”.

अशा या कॅम्पबद्दल लक्षात घ्यायची एक गोष्ट म्हणजे ‘कॅम्प’ ही ‘सौंदर्याची व्याख्या’ नाही तर ‘शैली आणि कलात्मकता यांची पातळी’ आहे. या गोष्टीमुळे विचित्र फॅशन सेन्सला ‘कॅम्प’ असं म्हटलं जातं.

थीमविषयी मतमतांतरे

इंस्टिट्यूटचे प्रमुख(क्युरेटर) अँन्ड्र्यू बोल्टन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले कि, “पॉप कॅम्प, क्वियर कॅम्प, हाय कॅम्प किंवा पॉलिटिकल कॅम्प; कुठलाही कॅम्प असो, ट्रम्प हे कॅम्प फिगर आहेत.

त्यामुळे मला वाटते की ही अतिशय समयोचित थीम आहे. विशेषतः हाय कॅम्प ही कुठल्याही घटनेवरची रिअॅक्शन असते. ”

 

Town & Country Magazine

दुसरे कारण असे कि हल्ली डिझाईनर वेगवेगळ्या चित्रविचित्र फॅशनवर म्हणजेच ‘कॅम्प’ वर विचार करण्याची जशी हिंमत दाखवत आहेत तशी या आधी कधीच दाखवली नव्हती.

GUCCIचे क्रिएटीव डिरेक्टर आणि यावर्षीच्या MET GALAचे सहअध्यक्ष अॅलेसॅन्ड्रो मिशेल, विशेषतः त्यांच्या जेन्डर-बेंडिंग सुटांमधून, वेगवेगळ्या पद्धतीने ‘कॅम्प’ थीम सादर करत असतात.

अशा प्रकारे अनेक ब्रँड्स आणि डिझायनर्सची नावं सांगता येतील, जे वेगवेगळ्या प्रकारे या ‘कॅम्प’ थीमला हात घालत आहेत.
म्हणूनच या वर्षीच्या Met Gala साठी ‘camp’ ही थीम ठेवण्यात आली होती.

 

PopSugar

यासाठी भारतातल्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन आणि इशा अंबानी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होतीच.

काय मग मंडळी, आता तुमच्याही मनात पुढच्या वर्षीच्या ‘मेट गाला’च्या थीमविषयी उत्सुकता दाटली असेल ना ?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “प्रियांकाच्या “त्या” केसांवर भरपूर विनोद केले ना? आता समजून घ्या त्या लूक मागचं खरं कारण…

 • October 2, 2019 at 4:41 pm
  Permalink

  हे कॅम्प वगैरे ईव्हेंन्टस लोकांना माहीत नसतात
  कारण वाचन नाही माहीतीचा अभाव आणी
  टिव्हिवर सुद्धा हे दुसरच पाहणार.
  अण ऐड्यावाणी हसत सुटते आण दुसर्र्याला ट्रोल करतात. मुळात हे मोबाईल आती भारी उपकरण यांच्या हातात लवकर पडलेलं.
  यांना मॅच्युर व्हायला भरपूर अवधी आहे अजून.
  यांना काही माहीत नसतं नेटीझन्सना. आली इकडून तिकडून पोस्ट की कर फाॅरवर्‍ड.
  पण जी व्यक्ती तुमच्या देशाचं, राज्याचं,विभागाचं,
  जिल्ह्याचं,तालुक्याचं किंवा गावाचं नाव कुठं तरी नेतंय जिथं तुमच्याकडील कधीचं कोणी गेलं नाही, त्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याची
  टरं उडवण्यातचं यांच सौख्य सामावलेलं आहे.
  असो एक भारतीय !

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?