भगवान विष्णूंच्या दशावतारामागे आहे एका शापाची कथा, कोणी दिलेला हा शाप?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या देशात पौराणिक ग्रंथ, त्यातल्या कथा, दंतकथा तसेच अनेक धार्मिक कथा किंवा दृष्टान्त या गोष्टी अतिशय आवडीने सांगितल्या जातात आणि ऐकल्या देखील जातात, आणि या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं लहानपण गेलं आहे!

भले त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असोत किंवा काही काल्पनिक असो किंवा काही अगदीच भंपक वाटोत पण त्या गोष्टी आजही तितक्याच रंजक वाटतात!

याचा अर्थ असा नाही की सगळेच पौराणिक संदर्भ ही काल्पनिक आहेत, काही काही गोष्टी खरोखर घडून गेल्याचे पुरावे देखील आहेत त्यामुळे अशा गोष्टींकडे कानाडोळा करून चालायच नाही!

कारण एक अर्थाने त्या गोष्टी आपला धर्म संस्कृति आणि परंपरा यांच्याशी जोडलेल्या असतात!

आपल्याला माहित आहे विष्णू भगवानने वेगवेगळ्या रूपांत या पृथ्वीवर जन्म घेतले. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अन्याय, अत्याचार वाढतो तेव्हा भगवान वेगवेगळे रुप घेऊन हे अत्याचार थांबविण्यासाठी येतात.

याच्या अनेक आख्यायिका देखील आपल्याला माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, विष्णू भगवान यांच्या दशावतारामागे देखील एक कहाणी आहे? विष्णूंच्या एवढ्या रुपांमागे एक शाप कारणीभूत आहे.

 

Vishnu inmarathi
patrika

 

आपण ऋषी दुर्वासा यांच्याबद्दल तर एकलेच असेल. ते त्यांच्या क्रोधासाठी ओळखले जातात. ते नेहेमी रागात येऊन कोणाला ना कोणाला शाप देत असायचे.

या शापांपासून खुद्द भगवान देखील वाचू शकलेले नाही. तसे तर शापित जीवन हे नेहेमी त्रासदायक असते असाच आपला समज पण काय कोणाच्या शापाने संपूर्ण मानव जातीचे कल्याण होऊ शकते का? तर हो… असे झाले आहे.

आज अश्याच एका शापाबद्दल आम्ही आपल्याला सांगणार आहोत, जर विष्णूंना तो शाप देण्यात आला नसता तर कदाचित विष्णू कधीच मानव जातीचे कल्याण करू शकले नसते.

 

dashavtar inmarathi
daily horoscope

 

एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीवर वेगवेगळे दशावतार घेतले. पण त्यांचे हे अवतार त्यांना मिळालेल्या शापाचा परिणाम होते.

असुर गुरु शुक्राचार्य यांचे पिता महाऋषी भृगु यांनी भगवान विष्णू यांना पृथ्वीवर अनेक वेळा जन्म घेण्याचा शाप दिला होता आणि म्हणूनच भगवान विष्णू यांनी राम, कृष्ण, नरसिंह, परशुराम इत्यादी मनुष्य रुपात जन्म घेतला.

ही कथा मत्स्य ची आहे, ज्यानुसार शुक्राचार्य हे बृहस्पति पेक्षा जास्त ज्ञानी होते, तरी देखील देवराज इंद्राने त्यांच्या एवजी बृहस्पति यांना आपले गुरु मनाले. याला आपला अपमान समजून शुक्राचार्य यांनी असुरांचा गुरु होणे स्वीकारले. जेणेकरून असुरांच्या माध्यमातून ते इंद्राला धडा शिकवू शकतील.

 

shukracharya inmarathi
panjab kesari

 

पण देवांना अमरत्वाचे वरदान होते आणि असुरांना असे कुठलेही वरदान नव्हते. त्यामुळे शुक्राचार्य यांना माहिती होते की असुर हे कधीही देवांना हरवू शकत नाही. यावर उपाय म्हणून शुक्राचार्यांनी भगवान शंकर यांना प्रसन्न करून मृत-संजीवनी वरदान मिळविण्याची युक्ती केली.

मृत-संजीवनीने मृत व्यक्तीलाही जिवंत केल्या जाऊ शकते.

शुक्राचार्य भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी कठीण तपस्या करण्याकरिता निघाले, पण जाण्याआधी त्यांनी असुरांना त्यांचे आई-वडील महाऋषी भृगु आणि आई काव्यमाता यांच्या झोपडीतच राहण्याचे निर्देश दिले, जेणेकरून त्यांच्या अनुपस्थितीत देवता त्यांच्या आई-वडिलांना नुकसान पोहोचवू शकणार नाही.

जेव्हा इंद्राला याची माहिती मिळाली तेव्हा त्याला वाटले की, असुरांवर विजय मिळविण्याची ही चांगली संधी आहे. एके दिवशी त्याने महाऋषी भृगु झोपडीत नसताना आक्रमण केले. पण काव्यमाता यांना आपल्या तेजाने एक सुरक्षा कवच तयार केले, ज्यामुळे देव असुरांना नुकसान पोहोचवू शकले नाही. ज्यामुळे देवता हरले.

 

vihsnu shukra inmarathi
samachar jagat

 

भगवान विष्णू यांना जेव्हा याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना देवतांच्या रक्षणासाठी धाव घेतली. ते इंद्राचे रूप घेऊन परत एकदा त्या झोपडीत गेले आणि जेव्हा काव्यमाता देवांना पराभूत करू लागली तेव्हा त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्यांचे शीर कापले.

महाऋषी भृगु यांना जेव्हा त्यांचं पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा त्यांनी क्रोधात भगवान विष्णू यांना शाप दिला की,

त्यांना पृथ्वीवर परत परत जन्म घेऊन जन्म-मरणाचे कष्ट सहन करावे लागेल.

 

vishnu curse inmarathi
detchter

 

तसे तर महाऋषी भृगु यांनी त्यांच्या पत्नी काव्यमाता यांना कामधेनु गायीच्या मदतीने पुन्हा जिवंत केले. पण त्यांनी भगवान विष्णू यांना दिलेला शाप परत घेतला नाही.

 

dashavatar last inmarathi
dolls of india

 

याप्रकारे पृथ्वीवर वारंवार विष्णू भगवानला जन्म घ्यावा लागला, कधी राम तर कधी कृष्णाच्या रुपात. याव्यतिरिक्त नरसिंह, परशुराम इत्यादी रुपात देखील त्यांनी दहा अवतार घेतले. रामाच्या जन्माने ‘रामायणा’ची रचना झाली तर कृष्णाच्या जन्माने ‘महाभारताची’ ज्यातून आपल्याला रामायण आणि भगवतगीता हे ग्रंथ मिळाले.

स्त्रोत : स्पिकिंग ट्री

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भगवान विष्णूंच्या दशावतारामागे आहे एका शापाची कथा, कोणी दिलेला हा शाप?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?