' कॉर्पोरेट सेक्टरमधील जॉबचे आकर्षण असले तरी ही “वस्तुस्थिती” लक्षात असू द्या… – InMarathi

कॉर्पोरेट सेक्टरमधील जॉबचे आकर्षण असले तरी ही “वस्तुस्थिती” लक्षात असू द्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्यापैकी कित्येक लोक काम करत असतील आणि जे नाहीत, अशा बहुतेकांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा देखील असेल. कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचा पेहराव, त्यांचा रुबाब पाहून आपल्याला हे सेक्टर हवेहवेसे वाटते.

या लोकांसारखे स्टेटस आपले देखील असावे, ही इच्छा मनात येणे साहजिक आहे. पण या कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य काय आहे, हे तिथे काम करणाऱ्या लोकांनाच ठाऊक असते.

या कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांना कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. जेवढे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणे सोपे समजता, तेवढे ते नसते.

या सर्वांची कल्पना देखील तुम्हाला आधी दिली जात नाही, ते तुम्हाला हळूहळू समजते. चला तर जाणून घेऊया, या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कॉर्पोरेट सेक्टरचे नेमके सत्य आज समजून घेऊया…

 

१. तुम्ही तुमच्या कामामध्ये जेवढे जास्त कार्यक्षम असाल. तेवढा जास्त कामाचा बोजा तुमच्यावर टाकला जातो.

२. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुमच्या वैयक्तिक प्रगतीकडे कधीही लक्ष दिले जात नाही, त्याचे कोणालाही काही पडलेले नसते. तुम्ही कंपनीसाठी किती योगदान देताय, एवढेच त्यांना फक्त महत्त्वाचे असते.

 

corporate job pressure Inmarathi

 

३. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना एकवेळ अशी येईल, जेव्हा तुम्हाला समजेल की, तुम्ही फक्त पैशासाठी काम करत आहात बाकी काही उरलेले नाही.

४. डेस्क जॉब्स तुमच्या कल्पकतेला मारतात आणि हेच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये घडते.

५. बऱ्याचदा आपल्याला आपली जबाबदारी नसलेल्या कामासाठी जबाबदार ठरवले जाते. आणि जेव्हा क्वार्टरली टार्गेट चे प्रेशर तुमच्या बॉस ला असह्य होते तेव्हा छोट्याशा चुकीसाठी जोर जोऱ्याने आरडाओरड करणे ही तर अगदी नेहमीची गोष्ट होऊन जाते

Scapegoat Indian corporate jobs InMarathi

६. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला ज्या कामासाठी निवडले जाते, त्याव्यतिरिक्त इतर अनेक डझनभर कामे दिली जातात. त्यामुळे तुमच्या कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढतच जातो.

७. आपल्याला सतत वाटत असते की, आपल्याला या कंपनीची जास्त गरज आहे, कंपनीला आपली नाही. पण हे प्रत्येकवेळी सत्य नसते.

८. कॉर्पोरेट सेक्टरमधील मिटींग बऱ्याच वेळा फक्त वेळ वाया घालवण्यासाठी असतात, त्यातून कधीही चांगले निष्कर्ष निघत नाही. कारण, समोर बोलणाऱ्या व्यक्तीचे बहुतेक लोक ऐकतच नसतात आणि बोलणाऱ्या व्यक्तिला वास्तवात काय चालू आहे, हे माहीतच नसते.

 

yawning Indian meetings Inmarathi

 

९. तुम्ही जर थोडं रिलॅक्स घ्यायला गेलात, आणि थोडा जरी आळस केला, तर तुमचा बॉस तुमची थट्टा उडवेल आणि जर तुम्ही कामामध्ये सक्रीय असाल, तर तुमचे सह कर्मचारी तुमचा तिरस्कार करतील.

१०. एक कर्मचारी म्हणून असलेल्या तुमच्या गरजा येथे पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जातात. कधी-कधी जोपर्यंत तुम्ही आवाज वाढवून बोलत नाही आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलत तोपर्यंत त्या गरजा पूर्ण होत नाहीत.

११. तुम्हाला स्वस्थ आणि कंटाळवाण्या लोकांबरोबर काम करण्यासाठी सांगितले जाईल आणि हे सर्वात कठीण काम असेल. अशावेळी आपले टीम मेट्स कोणत्याही प्रकारची योग्य ती मदत करण्यास असमर्थ असतात. तुम्ही सर्व काही स्वतःच्या हातामध्ये घेणेदेखील शक्य नसत, कारण असे केल्यास तुमची त्या कामामधील आवडच निघून जाईल.

१२. तुमच्या आजूबाजूला असणारी माणसे नेहमी तुमच्या चुका काढण्यासाठी तयार असणार आणि प्रत्येक गोष्टीला टोकत असतात, कारण ते तुमच्यामध्ये किती सहन करण्याची क्षमता आहे, हे तपासात असतात.

१३. तुम्ही प्रत्येक दिवशी कितीही अतिरिक्त तास राहून काम करत असाल, तरीदेखील कोणीही तुमची प्रशंसा करणार नाही. पण एकेदिवशी थोडा वेळ जरी उशिरा गेलात, तर सर्व तुम्हाला त्याचा जाब विचारण्यासाठी तयारच असतात.

 

Late coming scolding Inmarathi

 

१४. कुठेही गेलात तरी कॉर्पोरेट सेक्टरमधील एच. आर डिपार्टमेंट हे निरुपयोगी असते. ते कधीही आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसतात.

१५. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालते, हे खरे आहे. त्यांना एखाद्याच्या थापा समजून दुर्लक्षित करू नका.

 

boss stealing your ideas

१६. काहीवेळा असे देखील होते की, आपण केलेल्या कामाचे श्रेय कोणी दुसराच घेऊन जातो आणि आपण काहीही करू शकत नाही, कारण ते आपल्यापेक्षा उच्च पदावर असतात.

१७. तुमच्या कामातील अर्धा वेळ गरज नसलेल्या लोकांना मेल पाठवण्यातच जाईल, जे ते वाचत देखील नाहीत. प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी अशी अनावश्यक कामे तुमच्यावर थोपवली जातात. त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य त्यामध्येच अडकून राहते.

 

boring emails InMarathi

१८. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनी नियमाच्या नावाखाली आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधने लादण्यात येतात.

अर्थात, प्रत्येक कंपनीमध्ये अशीच परिस्थिती असेल असे नाही, या लेखात आपण नाण्याची एक बाजू पाहिली आहे, आपल्या भारतात अशा कंपन्यादेखील आहेत, जिथे प्रत्येक एम्प्लोयी ला त्याचे उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. दरवर्षी “मोस्ट एम्पलाई फ्रेंडली” कंपनीचा अवॉर्ड देखील जाहीर होत असतात.

देव करो आणि तुम्हाला चांगली कंपनी, चांगले लोक भेटो..

असे आहे कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य… तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? तुम्हाला नसेल तर, तुमच्या  या सेक्टरमध्ये काम करत असलेल्या मित्र-मैत्रिणीला हे पडताळून पाहण्यासाठी विचारा, आणि नक्की शेअर करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?