कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्यापैकी कित्येक लोक काम करत असतील आणि जे नाहीत, अशा बहुतेकांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा देखील असेल. कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचा पेहराव, त्यांचा रुबाब पाहून आपल्याला हे सेक्टर हवेहवेसे वाटते.

या लोकांसारखे स्टेटस आपले देखील असावे, ही इच्छा मनात येणे साहजिक आहे. पण या कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य काय आहे, हे तिथे काम करणाऱ्या लोकांनाच ठाऊक असते.

या कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांना कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. जेवढे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणे सोपे समजता, तेवढे ते नसते.

या सर्वांची कल्पना देखील तुम्हाला आधी दिली जात नाही, ते तुम्हाला हळूहळू समजते. चला तर जाणून घेऊया, या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कॉर्पोरेट सेक्टरचे नेमके सत्य आज समजून घेऊया…

 

Truth behind corporate.marathipizza
nerdwallet.com

१. तुम्ही तुमच्या कामामध्ये जेवढे जास्त कार्यक्षम असाल. तेवढा जास्त कामाचा बोजा तुमच्यावर टाकला जातो.

२. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुमच्या वैयक्तिक प्रगतीकडे कधीही लक्ष दिले जात नाही, त्याचे कोणालाही काही पडलेले नसते. तुम्ही कंपनीसाठी किती योगदान देताय, एवढेच त्यांना फक्त महत्त्वाचे असते.

३. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना एकवेळ अशी येईल, जेव्हा तुम्हाला समजेल की, तुम्ही फक्त पैशासाठी काम करत आहात बाकी काही उरलेले नाही.


४. डेस्क जॉब्स तुमच्या कल्पकतेला मारतात आणि हेच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये घडते.

५. बऱ्याचदा आपल्याला आपली जबाबदारी नसलेल्या कामासाठी जबाबदार ठरवले जाते.

corporate-employee-marathipizza
humanresourcesonline.net

६. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला ज्या कामासाठी निवडले जाते, त्याव्यतिरिक्त इतर अनेक डझनभर कामे दिली जातात. त्यामुळे तुमच्या कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढतच जातो.

७. आपल्याला सतत वाटत असते की, आपल्याला या कंपनीची जास्त गरज आहे, कंपनीला आपली नाही. पण हे प्रत्येकवेळी सत्य नसते.

८. कॉर्पोरेट सेक्टरमधील मिटींग या फक्त वेळ वाया घालवण्यासाठी असतात, त्यातून कधीही चांगले निष्कर्ष निघत नाही. कारण, समोर बोलणाऱ्या व्यक्तीचे बहुतेक लोक ऐकतच नसतात आणि बोलणाऱ्या व्यक्तिला वास्तवात काय चालू आहे, हे माहीतच नसते.

९. तुम्ही जर आळशी असाल, तर तुमचा बॉस तुमची थट्टा उडवेल आणि जर तुम्ही कामामध्ये सक्रीय असाल, तर तुमचे सह कर्मचारी तुमचा तिरस्कार करतील.

१०. एक कर्मचारी म्हणून असलेल्या तुमच्या गरजा येथे पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जातात. कधी-कधी जोपर्यंत तुम्ही आवाज वाढवून बोलत नाही आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलत तोपर्यंत त्या गरजा पूर्ण होत नाहीत.

Truth behind corporate.marathipizza2
hrinasia.com

११. तुम्हाला स्वस्थ आणि कंटाळवाण्या लोकांबरोबर काम करण्यासाठी सांगितले जाईल आणि हे सर्वात कठीण काम असेल. अशावेळी आपले टीम मेट्स कोणत्याही प्रकारची योग्य ती मदत करण्यास असमर्थ असतात. तुम्ही सर्व काही स्वतःच्या हातामध्ये घेणेदेखील शक्य नसत, कारण असे केल्यास तुमची त्या कामामधील आवडच निघून जाईल.

१२. तुमच्या आजूबाजूला असणारी माणसे नेहमी तुमच्या चुका काढण्यासाठी तयार असणार आणि प्रत्येक गोष्टीला टोकत असतात, कारण ते तुमच्यामध्ये किती सहन करण्याची क्षमता आहे, हे तपासात असतात.

१३. तुम्ही प्रत्येक दिवशी कितीही अतिरिक्त तास राहून काम करत असाल, तरीदेखील कोणीही तुमची प्रशंसा करणार नाही. पण एकेदिवशी थोडा वेळ जरी उशिरा गेलात, तर सर्व तुम्हाला त्याचा जाब विचारण्यासाठी तयारच असतात.


१४. कुठेही गेलात तरी कॉर्पोरेट सेक्टरमधील एच. आर डिपार्टमेंट हे निरुपयोगी असते. ते कधीही आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसतात.

१५. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालते, हे खरे आहे. त्यांना एखाद्याच्या थापा समजून दुर्लक्षित करू नका.

Truth behind corporate.marathipizza3
static.oprah.com

१६. काहीवेळा असे देखील होते की, आपण केलेल्या कामाचे श्रेय कोणी दुसराच घेऊन जातो आणि आपण काहीही करू शकत नाही, कारण ते आपल्यापेक्षा उच्च पदावर असतात.

१७. तुमच्या कामातील अर्धा वेळ गरज नसलेल्या लोकांना मेल पाठवण्यातच जाईल, जे ते वाचत देखील नाहीत. प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी अशी अनावश्यक कामे तुमच्यावर थोपवली जातात. त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य त्यामध्येच अडकून राहते.

१८. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनी नियमाच्या नावाखाली आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधने लादण्यात येतात.

असे आहे कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य… तुमच्या आजूबाजूला कोणी या सेक्टरमध्ये काम करत असल्यास त्यांना याबद्दल नक्की विचारा. मग आता तुम्हीच ठरवा कॉर्पोरेट सेक्टर किती चांगले आणि किती वाईट!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?