बिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय टीव्ही जगतातील सर्वात चर्चिला जाणारा शो म्हणजे –बिग बॉस! सुरुवातीला या शोची प्रचंड क्रेझ होती, पण हळूहळू नंतर मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा शो अपयशी ठरत गेला, तरीही आज ‘टाईमपास’ म्हणून बऱ्यापैकी प्रेक्षक हा शो आजही पाहतात. सध्या सलमान खान हा शो होस्ट करतोय त्यामुळे त्याचे चाहतेही ‘भाई का शो’ म्हणून हा शो डोक्यावर घेतात.

big-boss-marathipizza01
theindiantalks.com

असो, पण या शो बद्दल सर्वात गूढ गोष्ट म्हणजे बिग बॉसचा आवाज! बिग बॉस म्हणजे घरातील असा चेहरा जो कधीही दिसत नाही, जो केवळ आवाजाच्या माध्यमातून वावरतो. तर मित्रहो तुम्हाला देखील कधी न कधी प्रश्न पडला असेल, कोण आहे हा बिग बॉस! कोणाचा आवाज इतका भारदस्त आहे, ज्याने बिग बॉसला एक वेगळ वलय निर्माण करून दिलंय, चला तर आज या मागचं उत्तर जाणून घेऊया!

big-boss-marathipizza012
indiatimes.in

तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातील या बिग बॉसचं नाव आहे- अतुल कपूर! याच व्यक्तीमुळे बिग बॉसचा आवाज लोकांच्या अगदी मनावर ठसला आहे. जेव्हासून शो सुरु झाला तेव्हापासून आतापर्यंत अतुलच बिग बॉसला आवाज देत आले आहेत. त्यांच्या आवाजातील त्या वजनदारपणामुळे प्रेक्षकांनी देखील त्या आवाजाला डोक्यावर उचलून घेतले होते, त्यामुळे या आवाजाला कधीही पर्याय शोधण्यात आला नाही.

big-boss-marathipizza03
hindihollywood.com

या आवाजामागचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न बिग बॉस सुरु झाल्यापासूनच सुरु झाला होता, पण निर्मात्यांनी अतुल यांच्याबाबत अतिशय गुप्तता पाळली. मात्र म्हणतात ना कोणतीही गोष्ट जास्त काळ लपवता येत नाही, त्यानुसार बिग बॉसचा हा खरा चेहरा प्रकाशझोतात आला. परंतु आजही अतुल हे स्वत:हून कधीही मिडीया समोर येत नाही, त्यांना स्पॉट लाईटमध्ये राहण्यापेक्षा प्रसिद्धीपासून अलिप्त राहणेच जास्त प्रिय आहे.

big-boss-marathipizza04
indiatimes.in

अतुल कपूर यांच्या करीयरची सुरुवात रेडियोपासून झाली. एक वॉईस आर्टिस्ट म्हणून आपण नाव कमवावं अशी त्यांची प्रचंड इच्छा होती आणि त्यांची इच्छा तेव्हा पूर्ण झाली जेव्हा बिग बॉसच्या निर्मात्यांना त्यांचा आवाज प्रचंड आवडला. जेव्हा बिग बॉसचं शुटींग सुरु असतं, तेव्हा मात्र अतुल यांना बिग बॉसचे निर्माते अतिशय गुप्त ठिकाणी ठेवतात, शुटींग पूर्ण होईपर्यंत त्यांना कुठेही जाण्याची परवानगी नसते म्हणे, एकदा का शो पूर्ण संपला मगचं ते मुक्त होतात, तोवर त्यांना बिग बॉस म्हणूनच एकांतवासात राहावे लागते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये.

असं आहे हे बिग बॉसच्या आवाजा मागचं तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेलं गुपित

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?