अमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बॉलीवूड हे भारतीय लोकांच्या मनात वसत. मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या त्या कलाकारांना आपण अक्षरशः डोक्यावर घेतो. त्यांना स्टार बनवतो. त्यात त्यांच्या अभिनयाचाही तेव्हढाच हात असतो. त्यासाठी त्या कलाकारांना खूप कष्ट करावे लागतात. रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन एक सामान्य अभिनेता सुपरस्टार होतो.

तसेच त्यांना एवढं यशस्वी बनविण्यात आणि लोकांच्या लक्षात आणून देण्यात त्याचं नावही तेवढीच मोठी भूमिका निभावते. अमिताभ बच्चन ते शाहरुख खान आणि आता रणबीर कपूर यांना त्यांच्या अभिनयाने नक्कीच यशस्वी बनविलं पण त्यासोबतच त्यांच्या नावानेही आपली जादू दाखविली आणि आज देशातीलच नव्हे तर जगातील कित्येक लोकं त्यांच्या नावाचे दिवाने आहेत.

आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीचे नाव एकले की डोळे आनंदाने विस्फारून जातात. जर त्यांना कोणी काही वाईट बोलले की आपण लगेच भांडायला देखील तयार होतो. त्यांनी आपल्या मनावर एवढी त्यांची छाप सोडलेली असते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे नाव जे तुम्हाला आणि जगाला माहित आहे ते नाहीये. तर त्याचं मूळ नाव काही वेगळचं आहे. चित्रपट जगतात आपले नाव व्हावे म्हणून या कलाकारांनी चक्क आपलं मूळ नाव बदलले आहे.

चला तर मग आज आपण जाणून घेऊया अश्याच ११ सुपरस्टार्स विषयी ज्यांनी सिनेसृष्टीत आल्यावर आपले मूळ नाव बदलले…

१. दिलीप कुमार

 

dilipkumar-inmarathi
news18.com

बॉलीवूडच्या काही महान अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच दिलीप कुमार, याचं खरं नाव युसुफ खान आहे.

२. मधुबाला

 

madhubala-inmarathi
ndtv.com

या अभिनेत्रीच तर केवळ नावच पुरेसं आहे. तिला इतर कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या मधुबालाचं खरं नाव मुमताज जेहन देहलवी होतं.

३. राजेश खन्ना

 

rajesh-khannainmarathi
facts4u.co.in

काकांना कोण नाही ओळखत, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतीन खन्ना होते. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती राजेश खन्ना या नावाने.

४. जितेन्द्र

 

jeetendra-inmarathi
india.com

जितेंद्र म्हणजे भारतीय सिनेमाच्या ७०-८० च्या शतकातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक, याचं मूळ नाव रवी कपूर आहे.

५. अमिताभ बच्‍चन

 

amitabh bachchan-inmarathi
easterneye.eu

महानायक म्हणजेच श्री श्री अमिताभ बच्चन ज्यांनी भारतीय सिनेमाला आपल्या अंदाजाने आणि अभिनयाने एक वेगळे वळण दिले. पण बिग बी याचं देखील मूळ नाव अमिताभ बच्चन नसून इंकलाब श्रीवास्तव हे आहे.

६. रजनीकांत

 

rajnikanth-inmarathi
intoday.in

रजनीकांत म्हणजे साउथ इंडस्ट्रीचे देवताच. त्यांच्या काळातील तर ते सर्वात यशस्वी अभिनेता होतेच पण आजही ते कुठल्याही ३० शीतल्या अभिनेत्याला मागे टाकतात. पण त्यांचही मूळ नाव हे रजनीकांत नसून शिवाजी राव गायकवाड आहे.

७. आमिर खान

 

amir-khan-inmarathi
hindustantimes.com

बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आपले आमिर खान यांचे मूळ नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असे आहे.

८. सलमान खान

 

Salman-Khan-inmarathi
bollywoodhungama.com

बॉलीवुडचे दबंग भाईजान म्हणजेच सलमान खानच मूळ नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे.

९. अजय देवगन

 

ajay-devgn-inmarathi
intoday.in

सिंघम अजय देवगण याचं मूळ नाव विशाल वीरू देवगन आहे.

१०. जॉन अब्राहम

 

john-abraham-inmarathi
bollywoodhungama.com

बॉलीवूडचा मानिया म्हणजेच जॉन अब्राहम याच मूळ नाव फरहान अब्राहम आहे.

११. अक्षय कुमार

 

Akshay-Kumar-inmarathi
firstpost.com

खिलाडी अक्षय कुमार याने त्याच्या जीवनात किती स्ट्रगल केलं हे तर सर्वांनाच माहित आहे. पण काय त्याचे मूळ नाव तुम्हाला माहित आहे. राजीव हरिओम भाटिया असे या आपल्या अक्षय कुमारचे नाव आहे.

असे हे आणि यांसारखे कित्येक आपले आवडते अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांना सिनेसृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी मूळ नाव बदलावं लागलं… तरी आजही त्यांच्या नावाचा जादू आपल्यावर कायम आहे आणि तो असाचं राहील…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?