शंभराच्या नव्या नोटेवर झळकणारी भारतातील ‘ही’ अप्रतिम ऐतिहासिक वास्तू कोणती? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच १०० रुपयांची नोट जारी केली. ह्या नव्या नोटेचा रंग हा लॅवेंडर आहे. तर ह्या नोटेच्या मागे ‘Rani Ki Vav’ ‘रानी की वाव’ ला दर्शविण्यात आले आहे.

पण कदाचितच काही लोकांना माहित असेल की, ‘रानी की वाव’ म्हणजेच राणीची बावडी ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आणि ह्याची निर्मिती ११ व्या शतकात करण्यात आली होती.

 

Rani_ki_vav-inmarathi08
livemint.com

‘रानी की वाव’ हे काय आहे आणि त्याचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया…

‘रानी की वाव’ ह्याबाबत अनेक लोकांना कदाचित माहित असेल की, हा भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.

‘रानी की वाव’ ही धरोहर गुजरात येथील पाटण जिल्ह्यातील सरस्वती नादीच्या तिरावर आहे. ह्या ऐतिहासिक वास्तूला २०१४ साली युनेस्को ने विश्व वास्तू स्थळांत सामील केले होते. युनेक्सोने ह्या बावडीला भारतात असलेल्या सर्व बावडीमध्ये राणी हा खिताब दिला आहे.

तसेच ह्या ठिकाणाला २०१६ मध्ये  सर्वात स्वच्छ धरोहर असण्याचा मान देखील मिळाला आहे.

 

Rani_ki_vav-inmarathi02
whc.unesco.org

वास्तुकलेच्या ह्या सुंदर बावडीला सोलंकी साम्राज्या काळी बनविण्यात आलं होतं. ही बावडी सरस्वती नदी जवळ आहे. १०व्या शतकात बनविण्यात आलेली ही बावडी सोलंकी वंशाची भव्यता दर्शविते.

ह्या बावडीचा निर्माण राणी उदयामती ह्यांनी सर्व लोकांच्या विरोधात जात आपल्या पतीच्या स्मरणार्थ करवला होता. गुजराती भाषेत बावडीला ‘बाव’ असे म्हटल्या जाते म्हणून ह्याचे नाव ‘रानी की वाव’ म्हणजेच ‘राणी ची बावडी’ असं पडलं.

 

Rani_ki_vav-inmarathi07
versesofuniverse.blogspot.com

ह्या बावडीची उंची ६४ मीटर, रुंदी २० मीटर आणि खोली २७ मीटर आहे. बावडीच्या खाली एक लहान दरवाजा आहे, ज्याच्याआतून ३० किलोमीटर एवढी लांब एक सुरंग आहे. पण सध्या ह्या सुरंगला माती आणि दगडांनी बंद करण्यात आले आहे.

सनातन धर्मात तहानलेल्याला पाणी पाजणे आणि उपाशी माणसाला जेवण देणे हे सर्वात पवित्र कार्य मानल्या जातं. त्यामुळे आधीपासूनच आपले राजे- महाराजे जागो जागी आश्या बावडींचा निर्माण करत गेले जेणेकरून कुणीही तहानलेलं राहू नये.

 

Rani_ki_vav-inmarathi04
flickr.com

ह्या बावडीमध्ये अनेक कलाकृती तसेच भगवान विष्णू ह्यांच्या अनेक मुर्त्या स्थापित आहेत. ह्या मुर्त्यांचा निर्माण हा भगवान विष्णूंच्या दशावतारच्या रुपात करण्यात आला आहे.

ह्या बावडीच्या भिंतींवर भगवान राम, वामनावतार, महिषासुरमर्दिनी, कल्की अवतार आणि विष्णू भगवान ह्यांच्या विविध अवतारांचे चित्रण आहे.

वास्तुकलेच्या हिशोबाने ह्या बावडीची निरीती ही “मारू-गुर्जरा” आर्किटेक्चर स्टाईलने करण्यात आली आहे. राणीच्या बावडीच्या आत एक मंदिर आणि पायऱ्यांच्या सात लाईन्स बनलेल्या आहेत. ज्यामध्ये १५०० पेक्षा जास्त नक्षीदार मुर्त्या कोरलेल्या आहेत.

२००१ साली ह्या बावडीतून ११व्या आणि १२ व्या शतकात बनविलेल्या दोन मुर्त्या चोरी झाल्या होत्या. ह्यापैकी एक मूर्ती ही गणपतीची तर दुसरी ही ब्रह्मा-ब्रह्माणिची होती. भूज भुकंपा नंतर ह्याच्या सुरक्षेच्या कारणावरून ह्या बावडीतील अनेक भागांना बंद करण्यात आले आहे.

 

Rani_ki_vav-inmarathi01
tourmyindia.com

९०० वर्ष जुन्या ह्या बावडीची सुंदरता आणि भव्यता बघून कुणीही आश्चर्यचकित होऊन जाईल. अशी ही राणी ची बावडी आता लवकरच आपल्याला १०० च्या नव्या नोटेवर दिसणार आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?