' मंडळी तयार व्हा, ५०० कोटी मध्ये साकारलं जातंय रामायण! – InMarathi

मंडळी तयार व्हा, ५०० कोटी मध्ये साकारलं जातंय रामायण!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ओल्ड इज गोल्ड हे इंग्रजी शब्द तेव्हा आपसूक तोंडावर येतात जेव्हा एखादी जुनी अविस्मरणीय आठवण डोक्यात येते. अशीच एक आठवण म्हणजे टी.व्ही वर येणारी ९० च्या दशकातील रामायण मालिका. रामायण ही मालिका बघण्यासाठी घरातील सर्व मंडळी सर्व काम बाजूला ठेवून एकत्र यायचो. तेव्हाच्या काळी खूप कमी लोकांकडेच टी.व्ही असयाचे, धार्मिक भावनांशी निगडीत असलेली ही मालिका बघायला परिसरातील सर्व लोक एकत्रित जमा होत असत.

ramayana-marathipizza01
naukrinama.com

रविवारी येणारी हि मालिका बघताना परिसरात सर्वत्र शांतता असे, रविवारी माणसांना ही मालिका बघण्याशिवाय दुसरे कोणतेच महत्त्वाचे काम नसायचे. त्यावेळी सर्वांच्या नजरा फक्त ही मालिका पाहण्यातच गुंग असतं.

रामायण ही ९० च्या दशकातील खूप प्रसिद्ध मालिका होती, तिचा टीआरपी देखील खूप होता. ही प्रसिद्ध मालिका परत येतेय,फरक फक्त एवढाच आहे की, ह्यावेळी ही धार्मिक मालिका छोटया पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावर येत आहे.
‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि नंतर बाहुबली: द कॉनक्ल्यूजन  या चित्रपटांच्या भरघोस कमाईनंतर, ५०० कोटीची रामायणावर फिचर फिल्म बनवावी अशी इच्छा निर्माता अल्लु अरविंद, नमित मल्होत्रा आणि मधु मंतना या तीन निर्मात्यांची होती, आणि त्यासाठीच हे महाकाव्य रुपेरी पडद्यावर उतरवायला ते एकत्रित आले आहेत.

ramayana-marathipizza02
newstrack.com

हा चित्रपट हिंदी, तेलगु आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल, हा चित्रपट भारतातील सर्वात महत्वाकांक्षी फिल्म प्रोजेक्ट असणार आहे. भव्यदिव्य सेटसह चित्रित केला जाणारा हा सिनेमा हॉलीवूडच्या गाजलेल्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’सारखा तीन भागांमध्ये दाखवला जाईल.

PTI शी बोलताना निर्माता मंताना यांनी सांगितले की,

हो, ही गोष्ट खरी आहे आणि आम्ही त्या दिशेने काम सुरु केले आहे.

तर निर्माता अरविंद यांचे म्हणणे आहे की,

ही खूप मोठी जबाबदारी आहे, भव्य दिव्यरामायण निर्माण करायचा आम्ही जो विडा उचलला आहे. तो पूर्ण करताना लोकांच्या अपेक्षा देखील आम्हाला पूर्ण करायच्या आहेत.

ramayana-marathipizza03
relypost.com

तर निर्माता नमित यांनी सांगितले की,

या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर बऱ्याच काळापासून काम सुरु आहे आणि आम्ही पूर्ण वेगळ्या प्रकारची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत.  माझ्या परिवारातील तीन पिढ्या चित्रपट सृष्टीत आहेत आणि अश्या गोष्टी आम्ही चांगल्या व प्रभावीपणे मांडू शकतो, ही महान गाथा जगासमोर आणणे आमच्यासाठी स्वप्न आहे.

१९८७-८८ मध्ये दूरदर्शन वर दाखवल्या जाणाऱ्या रामानंद सागर च्या ‘रामायण’ मध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखल्या यांनी राम आणि सीताचा अभिनय केला होता. तर २००८ मध्ये सागर आर्ट्स ने निर्माण केलेल्या रामायण मध्ये ही पात्रे गुरमीत चौधरी आणि देबिना नेकेला यांनी साकारली होती.

जर हा चित्रपट लोकांच्या अपेक्षेवर तग धरून उभा राहिला तर बॉक्स ऑफिसवर एक अनब्रेकेबल विक्रम तयार होईल हे मात्र नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?