भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली.

जगाच्या इतिहासामध्ये स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल चला काही रंजक गोष्टी जाणून घेऊया!

 

rakesh-sharma-marathipizza00

स्रोत

१३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! पण त्यांनी आपलं शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केलं.

राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले.

rakesh-sharma-marathipizza01

स्रोत

एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली.

rakesh-sharma-marathipizza02

स्रोत

२ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.

ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले.

rakesh-sharma-marathipizza03

स्रोत

या मोहिमेत त्यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी संशोधन केले.

अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.

 

rakesh-sharma-marathipizza04

स्रोत

या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की

अंतराळातून आपलं भारत कसा दिसतो?

तेव्हा राकेश शर्मा म्हणाले,

सारे जहॉं से अच्छा!

त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

rakesh-sharma-marathipizza05

स्रोत

आज वयाच्या साठीनंतरही राकेश शर्मा अंतराळातील आपली ती अद्भुत सफर विसरलेले नाहीत. त्या आठवणी आजही अंतराळातील त्या अढळ ताऱ्यांप्रमाणे त्यांच्या मनाच्या पटलावर अढळ स्थळ कमावून बसल्या आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?