रेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय !

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी  वर्ष २०१६-१७ साठी रेल्वे बजेट सादर केलं.

InMarathi Android App

ह्या बजेटमधील काही महत्वाच्या घोषणा :

१) दरांमध्ये वाढ नाही

प्रवासी आणि मालवाहतूक – दोन्हीही प्रकारच्या दरांमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही.

 

२) संपूर्णपणे अनारक्षित जलद रेल्वे सेवा

प्रभूंनी “अंत्योदय” नावाने नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

===
===

 

railway budget marathipizza

 

ह्या सेवेमधील सर्व रेल्वेमधे फक्त अनारक्षित डबे असतील आणि ह्या रेल्वे जलद असतील. ह्या सेवेला “अंत्योदय” हे अत्यंत समर्पक नाव दिलं गेलं आहे.

३) “तात्काल” चा गोंधळ सोडवणार

“तात्काल” तिकिटांच्या सर्व खिडक्यांवरील गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

शिवाय कारभाराचा सतत आढावा घेण्यासाठी थर्ड पार्टी ऑडीटची व्यवस्थासुद्धा सुरु करण्यात येणार आहे.

 

४) “दीन दयालु” डब्बे

रेल्वेंना अनारक्षित विशेष डब्बे जोडण्यात येणार आहेत.

ह्यांच्यामध्ये पिण्याचं पाणी आणि भरपूर मोबाईल चार्जिंग सॉकेट असणार आहेत.

 

५) भारतीय रेल्वेच्या भविष्याची झलक : तेजस

भारतीय रेल्वेचं भविष्य दर्शविणाऱ्या ‘तेजस’ रेल्वे सुरु होणार आहेत.

प्रभूंनी दिलेल्या माहितीनुसार :

ताशी १३० किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या ह्या रेल्वे भारतीय रेल्वेचं भविष्य दर्शवतील. ह्या रेल्वेमधे मनोरंजन, स्थानिक खाद्यपदार्थ आणि Wi-Fi ची सोय उपलब्ध असेल.

 

६) Utkrisht Double-Decker Air-conditioned Yatri (UDAY) Express

भारतीय रेल्वेच्या सर्वात जास्त प्रवासी वाहतुकींच्या मार्गांवर over night प्रवास करणाऱ्यांसाठी ह्या डबल डेकर AC रेल्वे सुरु होणार आहेत.

 

७) ५०० Wi-Fi स्थानकं

ह्या वर्षात १०० स्थानकं Wi-Fi सेवेने सज्ज होतील. पुढील वर्षात आणखी ४०० स्थानकांवर ही सोय उपलब्ध झालेली असेल.

 

८) SMART (Specially Modified Aesthetic Refreshing Travel) कोचेस

 

railway budget 02 marathipizza

 

स्वयंचलित दरवाजे, bio-toilets, कचरा टाकण्यासाठी डस्ट बीन्स, मनोरंजक बोर्ड्स, charging points…असं बरंच काही असणारे नवीन कोचेस लवकरच दाखल होत आहे.

 

९) माहिती दाखवणारे डिजिटल बोर्ड्स

===
===

रेल्वेतील सुविधा दाखवणारे डिजिटल बोर्ड्स बसवले जाणार आहेत. तसंच GPS आधारित announcement सुविधा सुरु होणार आहे – ज्या द्वारे पुढील स्थानकाची माहिती घोषित केल्या जाईल.

 

१०) अपंगांकरिता सोपी स्थानकं

 

railway budget 03 marathipizza

अपंगाना, व्हील-चेअर वापरणाऱ्यांना येणं-जाणं सोपं व्हावं अश्याप्रकारे platforms सुधारले जाणार आहेत.

 

११) Swachh Rail : स्वच्छ रेल्वेसाठी !

भारतभर, प्रत्येक रेव्लेसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ह्याद्वारे, १३९ ह्या क्रमांकावर sms पाठवून आपला डब्बा साफ करून घेता येणार आहे. तसंच, पुढील वर्षभरात ३०,००० bio-toilets लावले जाणार आहेत.

 

भारतीय रेल्वेला गेली अनेक वर्षांपासून आवश्यक असणारा “मेक ओव्हर” द्यायला ‘प्रभू’ सज्ज आहेत असं दिसतंय!

Image source

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *