पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यातील ह्या हुतात्म्यांचा विसर पडू नये म्हणून….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काल १४ फेब्रुवारीला जेव्हा सगळे जग “व्हॅलेन्टाईन्स डे” साजरा करीत होते, आपापल्या प्रेमाच्या माणसांबरोबर हा दिवस घालवत होते.
त्यादिवशी जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामामध्ये मात्र एका माथेफिरू आत्मघाती दहशतवाद्याने ४० कुटुंबे उध्वस्त केली. प्रेमदिनाच्या दिवशीच त्याने ४० कुटुंबापासून त्यांची प्रेमाची माणसे हिरावून घेतली.
ह्या हल्ल्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. ह्या हल्ल्यामुळे प्रत्येक सामान्य भारतीय मनावर एक आघात झाला आहे. आणि जे वीरपुत्र ह्यात हुतात्मा झाले, त्यांच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आता कितीही सांत्वन केले तरीही त्यांचे दु:ख कमी होऊ शकणार नाही. २००४ नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात भयानक दहशतवादी हल्ला आहे.

ह्या हल्ल्यात आपण आपले ४० वीरपुत्र गमावले आहेत आणि आपले वीस सैनिक बंधू जखमी झाले आहेत. आपल्या देशासाठी , भारतातल्या सगळ्या नागरिकांसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
आपले हे सैनिक बंधू म्हणजे कुणाचे तरी पती होते, पुत्र होते, भाऊ होते, वडील होते….खरे तर ते आपल्या सर्वांचेच भाऊ होते. आपल्या भावांना ह्या भ्याड हल्ल्यात आपल्यापासून हिरावून घेतले ते जैश ए महम्मद ह्या दहशतवादी संघटनेने!
तब्बल ३५० किलो स्फोटके भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महंमदच्या दहशतवाद्याने हा आत्मघातकी हल्ला केला. ह्या हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
सुटी संपल्यानंतर सेवेत रुजू होण्यासाठी हे CRPF चे जवान ७० वाहनांतून जात होते. नेहेमीपेक्षा ही संख्या ह्यावेळेला दुप्पट होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा गाड्यांचा ताफा निघाला. सूर्यास्ताच्या आधी हा ताफा श्रीनगरला पोहोचायला हवा होता.
श्रीनगर पासून ३० किमी लांब श्रीनगर -जम्मू महामार्गावर पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे ह्या गाड्या पोहोचल्या तेव्हा हा भीषण हल्ला झाला.
जवानांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. आणि क्षणार्धात स्फोटकांनी भरलेला ट्र्क ह्या ताफ्याला धडकला. ह्या हल्ल्याची भीषणता इतकी होती की ७६व्या बटालियनच्या वाहनाची शकले उडाली. आणि इतर वाहनांची मोठी हानी झाली.

ह्या हल्ल्याची आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही. इतकी जास्त स्फोटके भरलेला ट्रक ह्या महामार्गावरून कसा गेला? ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त असताना हा ट्र्क महामार्गावर आलाच कसा? ह्या मार्गावरून जवानांचा ताफा जाणार आहे ही माहिती दहशतवाद्यांना कशी मिळते?
स्थानिक मदतीशिवाय इतका मोठा हल्ला होऊ शकत नाही. ह्या स्थानिक फुटीरतावाद्यांना ,शत्रूला मदत करणाऱ्या ह्या फितुरांना आधी साफ केले पाहिजे.
आपले बाहेरचे शत्रू चहूबाजूंनी हल्ला करीत आहेत पण त्यांना सहकार्य करणारे हे अंतर्गत शत्रू, हे अस्तनीतले विषारी साप जास्त धोकादायक आहेत. ह्या हल्ल्यात जे जवान जखमी झालेत त्यांची प्रकृती लवकर बरी होवो हीच देवाकडे प्रार्थना आहे. सैनिक बांधवांच्या कुटुंबांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे.
कालच्या काळ्या दिवशी आपण ज्या सैनिक बांधवांना गमावले त्या वीर हुतात्म्यांची नावे..
१ . Ct/GD राठोड नितीन शिवाजी
२. Ct/GD भागीरथी सिंग
३. Ct/GD वीरेंद्र सिंग,
४. HC/RO अवधेश कुमार यादव
५. Ct/GD रतन कुमार ठाकूर
६. Ct/Dvr पंकज कुमार त्रिपाठी
७. Ct/GD जीत राम
८. Ct/Wm अमित कुमार
९. Ct/Bug विजय केआर मौर्य
१०. Ct/GD कुलविंदर सिंग
११.HC/GD मानेश्वर बासुमतारी
१२.ASI/GD मोहन लाल
१३. HC /GD नासीर अहमद
१४.HC/DVR जयमल सिंग
१५.Ct/GD सुखजिंदर सिंग
१६.Ct/Bug तिलक राज
१७.Ct/GD रोहिताश लांबा
१८.HC /GD विजय सोरेंग
१९.Ct/GD वसंथ कुमार व्ही.व्ही.
२०.Ct/GD सुब्रमणियन जी.
२१.Ct/GD मनोज कुमार बेहरा
२२. HC /Crypto नारायण लाल गुर्जर
२३. Ct/GD प्रदीप कुमार
२४.HC /GD हेमराज मीना
२६.HC /GD पी के साहू
२७.Ct/GD रमेश यादव
२८. HC/GD संजय राजपूत
२९. Ct /Cook कौशल कुमार रावत
३०. Ct/GD प्रदीप सिंग
३१. Ct/GD गुरु एच
३२. HC /GD संजय कुमार सिन्हा
३३. HC /GD राम वकील
३४. Ct/GD श्याम बाबू
३५. Ct/GD अजित कुमार आझाद
३६. Ct/Wc मणिंदर सिंग अत्री
३७. HC /GD बबलू सांत्रा
३८.Ct/GDअश्वनी कुमार काओची
ह्या बांधवांवर ह्या हल्ल्यात काळाने घाला घातला . तर Ct/GD सुदीप बिस्वास, Ct/GD शिवचंद्रन सी व HC /GD गोपाल सिंग किरूला ह्यांच्या बाबतीत अजूनही काही कळू शकले नाही.

आपल्या ह्या हुतात्मा सैनिक बांधवांना आपण विसरून चालणार नाही. त्यांचे बलिदान विसरलो तर हा त्यांचा मोठा अपमान होईल. उलट ही जखम तोवर भरू द्यायची नाही जोवर ह्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला जात नाही.
जोवर काहीतरी कडक कारवाई केली जात नाही ,तोवर हे दहशतवादी असेच काहीतरी भ्याड हल्ले करून, पाठीमागून वार करून आपल्या वीर सुपुत्रांचे प्राण धोक्यात घालत राहतील. ही समस्या मुळातूनच उपटून टाकण्याची गरज आहे.
अजून किती दिवस आपले सैनिक असल्या दहशतवादी कारवायांना बळी पडत राहतील? अब और नही! आमच्या सैनिक बांधवांचे जीव अनमोल आहेत, त्यांचे रक्त ह्या हल्ल्यात सांडावे इतके स्वस्त नाही.
आपल्या सैनिक बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी ठोस उपाय करणे आवश्यक आहे.

प्रत्येक सामान्य भारतीयाच्या मनात ह्या नीच कृत्याचा संताप आहे आणि आपले सैनिक बंधू आपल्यापासून हिरावून गेल्याचे दुःख आहे. आदिल दार असे त्या नीच दहशतवाद्याचे नाव आहे ज्याने हा आत्मघातकी हल्ला केला.
तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुरा ह्या ठिकाणचा आहे. म्हणजेच तो कोणीही दुसऱ्या देशातला नसून आपल्याच देशातला अस्तनीतला साप आहे.
असेच भारताच्या अस्तनीत अनेक विषारी साप आहेत जे ह्या भीषण घटनेचे सुद्धा राजकारण करून आपली पोळी भाजून घेत आहेत.
बेजबाबदार, बेताल वक्त्यव्ये करून हे साप आपल्या हुतात्मा सैनिकांच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी करत नाहीयेत. त्यांचे बेताल बोलणे म्हणजे ह्या सैनिक बांधवांच्या बलिदानाचा अपमान आहे.
पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सर्व सैनिक बांधवांस विनम्र अभिवादन! बंधूंनो ,तुमचे बलिदान हा देश कधीही विसरणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.