“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही?” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


तुम्हाला आठवते आहे का तुमची पहिली क्रश? तुम्हाला जर आठवत असेल तर चला आठवूया तो काळ जेव्हा आपण आपल्या क्रशला बघायचो आणि आपल्या वर्तनात अचानक काही बदल व्हायचा. मुलगा असो वा मुलगी क्रशला बघितल्यावर एक वेगळाच चेंज आपल्यात व्हायचा. एक वेगळीच फिलिंग मनातून यायची, भान एकदम हरपून जायचं!

आठवतोय ना तो काळ, नेमकं अस काय व्हायचं तेव्हा तेच आपण जाणून घेणार आहोत की मुलांना त्यांच्या प्रेयसीला बघितल्यावर काय होतं..

तिला बघितल्यावर सिनेमातल्या हिरोच्या भवती अचानक व्हायोलिन वादक संगीत वाजवू लागतात. अथवा हिरोईनला अचानक चंद्राचा आकार नेहमीपेक्षा जास्त मोठा वाटू लागतो. अचानक कुठूनतरी वाऱ्याची मंद झुळूक येऊ लागते. जणू ऋतू बदलतो आणि वसंत ऋतू आवतरतो.

पण हे सर्व काल्पनिक असतं. खऱ्या आयुष्यात अस काही घडतं का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे- ‘नाही’. मग नेमकं काय घडतं ते बघुयात.

 

Couple Enjoying Evening Drinks In Bar

जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडू लागते तेव्हा त्याचात खूप जास्त बदल होतो. त्याचा आत्मविश्वास बळावतो. तो तिच्यासाठी पुर्णपणे वेडा होतो. त्या मुलीची प्रत्येक गोष्ट त्या मुलाला जाणून घ्यायची असते. मुलगा त्या मुलीसाठी ड्रिंक्स घेण सुद्धा थांबवतो. त्याला असलेली सर्व व्यसनं आपोआप नाहीशी होतात.

मुलगा घरी लवकर यायला लागतो कारण त्याला बाहेर मुलांसोबत हिंड्ण्यापेक्षा तिच्यासोबत मोबईलवर तासनतास गप्पा मारायच्या असतात.

मुलं प्रसन्न होतात. ते खूप टापटीप राहू लागतात. त्यांचा रुममध्ये महागडे स्प्रे, परफ्युम यांची रेलचेल होत असते. मुलगा त्याचा भविष्याचा विचार करू लागतो. तिला बघितल्यावर याचा अंगावर शाहारे येऊ लागतात. मुलीचा क्लास बघून मुलगा स्वतःमध्ये बदल करतो.

जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती विशेष असल्याची भावना हळूहळू जोर धरू लागते. ही भावना माणसाच्या मेंदूत असलेल्या ‘डोपामाईन’ नावाच्या एका विशिष्ट रसायनामुळे आकार घेत असते. आणि विशेष म्हणजे असं मुलगा आणि मुलगी, दोन्हींच्या बाबतीत होत असतं.


 


masaan-inmarathi
youtube.com

एक हमखास जाणवणारी गोष्ट म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सकारात्मक बाजू आपल्याला जास्त ठळकपणे दिसत असतात. नकारात्मक गोष्टी दिसत नाहीत, किंबहुना त्या आपल्याला पहायच्या नसतात. त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या वस्तू, प्रसंग, ठिकाण यांपासून दूर जायला आपण कचरू लागतो.

नवीन व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर आणि ती आपल्याला प्रिय असेल तर तिच्याबद्दलच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे, वारंवार आठवणे हे सगळं नियंत्रित करणारे ‘नोरेपिनेफ्राईन’ नावाचे एक रसायन हे काम व्यवस्थित पार पडत असते.

जेव्हा मुलीला एखादा मुलगा आवडू लागतो तेव्हा तिच्या स्वभावता पण खूप बदल होतो.

मुलगी मुलगा जवळ येऊन बोलू लागला तर त्याचाशी लाजून बोलते. मुलीला त्याचाशी संवाद हवाहवासा वाटतो. ती धाडस करू लागते. रात्री त्याचसोबत बिनधास्त राहू लागते. त्याचा समोर आउटडेटेड नको वाटायला म्हणून क्वचित ड्रिंक्स पण घेऊ लागते. तिला सतत भीती वाटते की हा आपल्याला सोडून जाणार नाही ना, आपलं रिलेशन टिकेल ना?

 

live-in-relationship-inmarathi
telegraphindia.com

उत्तरोतर हि असुरक्षितता वाढत जाते. पण मुलगी प्रेमात समजूतदार होते. तिला नवीन काही ट्राय करायला आवडायला लागतं. त्याच्या वेळेनुसार स्वतची वेळ ठरवते. त्याच्या वेळेअनुरूप स्वताची दिनचर्या बनवते. ती तो काळ खऱ्या अर्थाने जगू लागते.

अशा प्रकारे प्रेमात पडल्यावर मुलगा आणि मुलगी एका वेगळ्याच दुनियेची अनुभूती करत असतात.

ते शरीराने जरी वेगळे असले तरी मनाने नेहमी एकत्र असतात. तरुणाईतलं प्रेम आयुष्याचा एक सुंदर भाग असतं. त्याची शाश्वती नसते पण ते आयुष्याला एक वेगळाच रंग देऊन जात असतं.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
4 thoughts on ““ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही?” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर !

 • June 17, 2018 at 8:28 pm
  Permalink

  its Real fact No doubtलेख मस्तच फारच छान

  Reply
 • November 17, 2018 at 4:44 pm
  Permalink

  वो दौर कब का गूजर गया , जब मकान कच्चे और दिल सच्चे हूआ करते थे…..

  Reply
 • December 6, 2018 at 12:35 pm
  Permalink

  mast

  Reply
 • September 29, 2019 at 9:42 am
  Permalink

  मला अजुन काही माहिती मिळू शकेल का?

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?