' फोटोग्राफी हा छंद असो वा व्यवसाय: कॅमेराचे हे २ प्रकार आणि त्याचे फायदे-तोटे माहीत असायलाच हवेत..! – InMarathi

फोटोग्राफी हा छंद असो वा व्यवसाय: कॅमेराचे हे २ प्रकार आणि त्याचे फायदे-तोटे माहीत असायलाच हवेत..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कॅमेरा हा माणसाचा जिवाभावाचा सखा मानला जातो. हल्ली घराघरात फोटोग्राफीची आवड असणारे लोक पाहायला मिळतात. काही जण मोबाईलवर फोटोग्राफी करतात, तर काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचा आधार घेतात.

अनेकदा एखाद्या ट्रिपला जाताना नवीन कॅमेरा विकत घेतला जातो किंवा बऱ्याचदा कॉलेज प्रोजेक्ट्स, असाइनमेंट किंवा कामांसाठी कॅमेरा घेण्याचा विचार असतो, पण नवीन कॅमेरा म्हटलं  की १०० फीचर्स, ब्रँडस आणि इतर तांत्रिक गोष्टी बघून आपण संभ्रमात पडतो.

 

ranbir kappor 1 inmarathi
rediff.com

 

साधारणतः नवीन कॅमेरा घेताना लोक संभ्रमात पडतात की, नक्की कोणता कॅमेरा घ्यावा.. पॉईंट-टू-शूट की प्रोफेशनल डी-एसएलआर? हल्लीच्या काळात एसएलआर कॅम्स स्वस्त होत असल्याचं दिसून येत आहे.

पण त्या बरोबरच पॉइंट-टू-शूटची नवनवीन मॉडेल्स बाजारात येत आहेत. त्यामुळे नेमका कोणता कॅमरा घ्यायचा, दोन्ही प्रकारांचे फायदे तोटे काय आणि त्यातून उत्तम निवड कशी करावी यासाठी काही खास टिप्स..

 

पॉइंट-टू-शूटचे फायदे :

आकाराने लहान आणि कॅरी करण्यास सोप्पा –

 

camera inmarathi

 

मुळात पॉइंट-टू-शूटचे कॅमेरे कॅरी करायला सर्वात सोपे असतात. काही कॅमेरे तर आपण अगदी आपल्या खिशात पण ठेवू शकतो.  हे कॅम्स आपल्या बॅगेत अगदी सहज मावू शकतात.

त्यामुळे कुठेही गेलं की आपल्या आठवणी चटकन कॅमेऱ्यात साठवणं सोपं होतं.

 

वजनाने हलके –

सर्वसाधारणपणे पॉइंट-टू-शूट कॅम्स वजनाने हलके असतात. त्यासाठी इतर कोणत्याही अॅक्सेसरीज घेऊन जाव्या लागत नसल्यामुळे सामानाचं ओझं होत नाही आणि बऱ्याच प्रमाणात त्रास वाचतो.

 

फिक्स लेन्स –

 

camera 1 inmarathi
toms guide

 

या कॅम्सच्या लेन्स फिक्स असल्याने ते हाताळताना कमी काळजी घ्यावी लागते. तसंच लेन्स पुन्हा पुन्हा काढून लावण्याचा त्रास वाचतो.

 

उत्तम व्हिडीओ रेकॉर्डिंग –

 

camera 2 inmarathi

 

पॉइंट-टू-शूट कॅमेऱ्यांमध्ये हल्ली उत्तम दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग हल्ली होतं. ज्यामध्ये १०८० पिक्सल, ७२०पिक्सल रेकॉर्डिंगचा समावेश होतो.

 

किंमत –

सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत पॉइंट-टू-शूट कॅम्स उपलब्ध असल्याने अधिक लोक याच कॅमेऱ्यांचा वापर करताना दिसून येतात. कमी किमतीत जास्त फीचर्स या कॅमेऱ्यांमध्ये मिळतात.

 

पॉइंट-टू-शूटचे तोटे : 

 

कॅमेरा क्वालिटी :

 

dslr 3 inmarathi
quora

 

कमी किमतीत जास्त फीचर्स मिळत असले तरी, लो-कॅमेरा सेन्सरमुळे कॅमेराच्या दर्जामध्ये फरक पडतो. एसएलआरच्या तुलनेत इमेज क्वालिटी, कॅमेरा मेगापिक्सल यात फरक असतो.

 

फोकस डिफरन्स :

 

dslr 4 inmarathi
youtube

 

एका डीएसएलआर कॅममध्ये ऑटो फोकस फीचर असतं, ज्यामुळे आपल्याला फोटोमधील मुख्य ऑब्जेक्ट फोकस करता येतो; परंतु पॉइंट-टू-शूटमध्ये अशा प्रकारचं फोकसिंग करता येत नाही, ज्यामुळे फोटोला नंतर मॅन्यूअल एडिटिंग करावं लागतं व त्यासाठी अधिक वेळ खर्च होतो.

 

नॉन अपग्रेडेबल :

फिक्स लेन्समुळे पॉइंट-टू-शूट कॅमेरे अपग्रेड करता येत नाहीत. त्यामुळे अपग्रेड करायचे झाल्यास नवीन कॅमेरा घेण्याशिवाय पर्याय नाही.

 

नाईट फोटोग्राफी :

 

night shoot inmarathi

 

पॉइंट-टू-शूट कॅमेऱ्यामध्ये काळोखात फोटोग्राफीसाठी वाव नाही. पॉइंट-टू-शूट कॅमेरे हे स्पोर्ट्स फोटोग्राफीसाठी किंवा जलद फोटोग्राफीसाठी पोषक नाहीत.

 

डीएसएलआरचे फायदे – 

उत्तम इमेज क्वालिटी –

 

dslr inmarathi
know your dslr

 

उत्तम इमेज सेन्सर आणि मेगा पिक्सल यामुळे डीएसएलआर कॅम्स नेहमीच छान रिझल्ट देतात. हल्लीच्या डीएसएलआरमध्ये एचडी फोटो व्हिडीओजचा ऑप्शन तर असतोच शिवाय इतर आधुनिक फीचर्समुळे तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो मिळतात जे पॉईंट टू शूटमध्ये मिळतीलच असं नाही.

 

लो लाइट सेन्सिटीव –

low light photo inmarathi
expertphotography

 

कमी प्रकाशात काही वेळा फोटो काढण्यास अडचणी येतात, परंतु डीएसएलआर कॅम्सच्या लो लाइट सेन्सिटीव टेक्नोलॉजीमुळे सुरेख फोटोज काढता येतात.

 

शटर स्पीड आणि फोकस स्पीड-

 

shutter speed inmarathi
digital photography school

 

एखादा छोट्यात छोटा किडा असो वा उडणारं फुलपाखरू डीएसएलआरच्या उत्तम फोकस स्पीडमुळे ते चटकन टिपले जातात आणि आपल्याला कमीतकमी वेळात छान फोटोज मिळू शकतात.

 

उत्तम गुंतवणूक –

तुम्ही असा कॅमेरा शोधत असाल, जो ७-८ वर्षं टिकेल आणि नंतर अपग्रेडसुद्धा करता येईल, तर त्यासाठी डीएसएलआर हा उत्तम पर्याय आहे. लेन्स किट आणि बाय बॅक यामुळे डीएसएलआरला आयुष्य जास्त असतं , शिवाय त्यामध्ये तुम्हाला पर्यायही वेगवेगळे उपलब्ध होतात.

 

मजबूत आणि टिकाऊ –

डीएसएलआर कॅम्सची लाइफ मोठी असते, तसंच उत्तम प्रकारे डेव्हलप केल्यामुळे हे कॅम्स सर्व प्रकारच्या हवामानात साथ देतात आणि छान रिझल्टसही देतात.

 

इंटरचेंजेबल लेन्स –

 

lens inmarathi
new atlas

 

डीएसएलआरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लेन्स. आपल्या बजेटप्रमाणे आणि गरजेप्रमाणे या लेन्स उपलब्ध असतात आणि अपग्रेडेशनच्या दृष्टीने हे फीचर फायद्याचं ठरतं.

 

डीएसएलआरचे तोटे :

 

हाय प्राइज टॅग –

 

dslr 1 inmarathi

 

आपल्याला नुसतीच आवड म्हणून कॅमेरा घ्यायचा असेल आणि त्यातही बजेट हा ऑप्शन असेल, तर डीएसएलआर हा पर्याय योग्य ठरत नाही. याला कारण म्हणजे लेन्स किट आणि कॅमेरा या सगळ्यामुळे कॅमे‍ऱ्याची किंमत वाढते.

 

किचकट ऑपरेशन्स –

डीएसएलआरमध्ये जरी अनेक फीचर्स असले, तरी वापरण्यास डीएसएलआर अत्यंत किचकट आहे. सामान्य माणसाला किंवा लहान मुलांना वापरायला देण्यास तो योग्य नाही.

 

हाय मेंटनन्स –

डीएसएलआर कॅम्सचा वापर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं करावा लागतो. काही वेळा सेन्सर खराब होतो, लेन्सवर धूळ साचते, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. डीएसएलआर कॅम्सच्या दुरुस्तीचा खर्चसुद्धा खूप जास्त येतो.

 

आकारमान आणि वजन –

 

dslr 2 inmarathi
facebook

 

डीएसएलआर कॅम्स वजनाने जड असतात, त्यांना लेन्ससुद्धा वेगळ्या कॅरी कराव्या लागत असल्यामुळे सामानात वाढ होते. एकूणच डीएसएलआर कॅम्स आकारानेही मोठे असल्यामुळे ते अधिक जागादेखील व्यापतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर डीएसएलआर काय किंवा पॉईंट टू शूट काय दोन्हीमध्ये उत्तम कॅमेरे उपलब्ध आहेतच मात्र तुमच्या वापरानुसार तुम्ही त्यातील योग्य कॅमेऱ्याची निवड करावी.

फोटोग्राफी ही एक कला असल्याने कॅमेरा कोणताही असो ज्याला योग्य फ्रेम कळते आणि ज्याला नजर कळते तो उत्तम फोटोग्राफर होऊ शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचे बजेट, त्याचा वापर आणि त्याशिवाय कामाचे स्वरूप यानुसार कॅमेऱ्याची निवड केली पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?