तब्बल १०,००० खोल्या असूनही गेल्या ७० वर्षांत या हॉटेलला एकही ग्राहक लाभलेला नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगात अश्या अनेक वास्तू, ठिकाणे आहेत, ज्या अतिशय भव्य दिव्य, देखण्या आहेत, पण दुर्दैवाने काही घटनांमुळे आज त्या ओसाड आहेत, तेथे जाणे लोक टाळतात. अश्याच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे ‘प्रोरा’ नावाचे हॉटेल.

prora-marathipizza01
lh6.ggpht.com

स्थानिकांच्या मते या हॉटेलशी अनेक रहस्यमयी गोष्टी निगडीत आहेत. तर बऱ्याच जणांच्या मते त्या निव्वळ भाकडकथा आहेत, कारण त्या संबंधित कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. पण असे असूनही लोकांच्या मनात अजूनही या हॉटेलविषयी आकर्षण नाही.

तब्बल १०,००० खोल्या असूनही या हॉटेलमध्ये राहायला कोणीही येत नाही. जणू या हॉटेलला ओसाड राहण्याचा शापच मिळाला आहे.

 

prora-marathipizza02
businessinsider.com

हे हॉटेल जर्मन आयलंड रुगेनमध्ये बाल्टीक समुद्राच्या किनारी वसलेले असून ते इतके भव्य आहे की, त्यात तब्बल १०,००० खोल्या आहेत. मुख्य गोष्ट मात्र ही की हॉटेल सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोणीच या हॉटेलमध्ये राहायला आलेले नाही. असे का? त्याचे ठोस कारण मात्र कोणाकडेही नाही.

या हॉटेलबद्दल अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे जे हॉटेल नाझींनी बनवले होते. त्यांनी १९३६ ते १९३९ दरम्यान या हॉटेलचे निर्माण केले.

 

prora-marathipizza03
ggpht.com

नाझींनी हे हॉटेल आयुष्याचा आनंद घेण्यासोबतच आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बनवले होते. जर्मन कर्मचार्‍यांनी त्यांचा रिकामा वेळ या हॉटेलमध्ये घालवावा आणि या दरम्यान नाझी विचारधारेचा त्यांच्यात प्रचार करता यावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे हॉटेल बनवण्यात आले होते.

या कॉम्प्लेक्समध्ये आठ वेगवेगळ्या इमारती आहेत. ज्यांची रुंदी साडेचार किलोमिटर एवढी आहे, तर समुद्राच्या बीचपासून हे हॉटेल अवघ्या १५० मीटर अंतरावर आहे.

 

prora-marathipizza04
ggpht.com

आठ हाऊसिंग ब्लॉकसोबतच, या हॉटेलमध्ये चित्रपट गृह, स्विमिंगपूल आणि उत्सव साजरा करण्यासाठी मोठे हॉलसुध्दा आहेत. युध्दादरम्यान हॅम्बर्गचे अनेक लोक या हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. युध्दानंतर प्रोराचा वापर पुर्व जर्मनीच्या सैन्याने लश्कर आऊटपोस्टप्रमाणे केला.

१९९० मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर ही इमारत खालीच आहे. या हॉटेलच्या निर्मितीला तब्बल ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. समुद्र किनारी वसलेल्या या हॉटेलच्या सर्वच खोल्यांमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

मात्र तरीही या हॉटेलमध्ये राहाणे कोणीच पसंद केले नाही आणि आता तर हॉटेलची अवस्था इतकी खराब झाली आहे की, जो पर्यंत त्याचे नुतनीकरण होत नाही तोवर कोणी ग्राहक त्यात पाउल ठेवणे अशक्य आहे.

 

prora-marathipizza05
sometimes-interesting.com

या हॉटेलच्या बांधकामात देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचा सहभाग होता.

जवळपास ९ हजार कामगारांनी ही इमारत बनवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. दुसर्‍या जागतिक महायुध्दानंतर प्रोराचे बांधकाम थांबवून सर्व कामगारांना शस्त्र बनवण्याच्या कंपन्यांमध्ये हालवण्यात आले आणि हा प्रकल्प अर्धवटच राहिला. आता या हॉटेलची अवस्था खुपच खराब झाली आहे.

सध्या हे हॉटेल कोणा खासगी रियल इस्टेट गुंतवणूकदाराला देऊन याला सुंदरशा रेसॉर्टमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. समुद्राकिनारी असल्याने अनेक डेव्हलपर येथे हॉलिडे अपार्टमेंट बनवण्याचा विचार करत आहेत.

 

prora-marathipizza06
corriereobjects.it

काय मग….तुम्ही जाणार का या हॉटेलमध्ये??

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?