मनाला भुरळ घालणारा मोती तयार कसा होतो?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

झळाळणाऱ्या मोत्यांचे मनुष्य प्राण्याला प्राचीन काळापासून वेड! हे मोती पाहताक्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो. दागदागिन्यांमध्ये तर मोत्याला अनन्यसाधारण महत्त्व! दागिन्यांमध्ये मोती जडला की त्याला काय ती सुरेख शोभा येते. असे हे मनाला भुरळ घालणारे मोती नेमके बनवले कसे जातात ते तुम्हाला माहिती आहे का? सामान्यत: मोती शिंपल्यातून निर्माण होते एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या निर्माण होण्याची प्रक्रिया बहुधा सर्वांनाच माहिती आहे असे नाही. चला तर मग आज जाणून घेऊया मनाला भुरळ घालणारा हा मोती बनतो कसा?

pearl-marathipizza00

स्रोत

मोत्यांचा उगम हा ऑयस्टरच्या शिंपल्यांमध्ये होतो. ऑयस्टर सुंदर मोती बनवतो. त्याच्या अंगामध्ये एक आगंतुक पदार्थ प्रवेश करतो, तेव्हा त्या पदार्थापासून स्वत:ला कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी तो त्या पदार्थाला ‘नेकर’ (nacre) मध्ये गुंडाळून ठेवतो, यालाच आपण ‘मोती’ म्हणतो. ऑयस्टर हा मॉल्युस्क या प्रकारातील प्राणी आहे, जो मोती निर्माण करू शकतो; पण फक्त ऑयस्टरच मोती बनवू शकतो, असं नाही. क्लॅम व मुस्सेलसारखे मॉल्युस्कसुद्धा मोती तयार करू शकतात. पक्ष्यांचे जसे दोन पंख असतात, तसेच ऑयस्टरच्या दिमतीला दोन फ्लॅप असतात. ज्याची एका बाजूने तो उघडझाप करत असतो. जसजसा हा प्राणी मोठा होत जातो. तसतसा त्याला सुरक्षित ठेवणारा शिंपलाही मोठा होत जातो. ऑयस्टरच्या आंतरिक देहात मँटल हा एक अवयव असतो. जो त्याच्या अन्नातून मिळालेल्या घटकापासून शिंपला बनवतो. मँटल जो पदार्थ बनवतो त्यालाच ‘नेकर’ म्हणतात. शिंपल्याच्या आतील बाजूस ज्या वलयांकित पट्टया दिसतात, त्या नेकरपासूनच तयार झालेल्या असतात.

एखादा बाह्यघटक- वाळूचे कण, सूक्ष्मजीव किंवा इतर पदार्थ, मँटल व शिंपल्यातील पोकळ भागात जाऊन विसावतात, तेव्हा नैसर्गिकरीत्या मोती बनण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा घटकांचा प्रवेश आतमध्ये झाल्यानंतर त्या घटकांना बाहेर काढणं ऑयस्टरला जमत नाही. त्यामुळे आतमध्येच ते ठसठसत राहतात. यामुळे हैराण होऊन तो त्या सूक्ष्मजीवाला नेकरच्या माध्यमात जखडून ठेवतो. तो कालांतराने सुंदर मोत्याचं रूप घेतो.

pearl-marathipizza01

स्रोत

असं म्हणतात की, भारतातील किना-यावर वस्ती करणा-या लोकांना पहिल्यांदा मोती मिळाले. त्यांना या मोत्याची किंमत कळली; कारण ते दुर्मीळ होते. भारतीय तसेच इतर आशियायी संस्कृतींमध्ये मोत्यांचा वापर सर्रासपणे होत होता, याचे त्यांच्या धार्मिक व इतर लेखनामध्ये अनेक उल्लेख आढळतात.आजच्या घटकेला त्या काळाच्या प्राचीन मोत्याची किंमत काही जाणकारांच्या मते, तब्बल नऊ करोड डॉलरच्या आसपास आहे.

नैसर्गिक मोती तसे दुर्मीळ असतात किंवा आहेत. नैसर्गिक मोती मुख्यत: पर्शियन गल्फ, भारत तसेच श्रीलंकेच्या समुद्रात आणि रेड सी या ठिकाणी आढळतात. एकोणीसाव्या शतकात व त्यापूर्वीही ते फारच दुर्मीळ होते. त्यामुळेच यांचा वापर राजघराण्यातील व्यक्तीपुरताच मर्यादित होता. इतर सामान्य जनतेला मोत्यांचा खर्च झेपण्यासारखा नव्हता. त्यामुळेच या अलंकारिक घटकाशी अनेक व कथा जोडल्या गेल्या आहेत. असं सांगितलं जातं की, रोमन साम्राज्याच्या उत्थापनाच्या काळात विटेलियस नामक एका सेनापतीने एका मोठय़ा युद्धाचा खर्च आपल्या आईच्या कानातील फक्त एक इअरिंग विकून भागवला होता.

pearl-marathipizza02

स्रोत

अशी ही दुर्मिळ मोत्याची दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रिया !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?