पावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पावसाळ्यात भिजण्याचा आनंद काही औरच असतो. भर पावसात बाईकवरुन आपल्या पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्हला जाणे असो किंवा आपल्या फोर व्हिलरमधून मित्रपरिवार, घरच्यांसोबत फिरणे असो, या गोष्टी सर्वांनाच आवडतात.

मनाला ताजतवानं करून जातात. पावसातील हे आनंदाचे क्षण आपण भरभरून जगत असतो.

पण हे जगताना आपल्या जिवाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.

वादळी वातावरणात रस्त्यावरील इतर वाहने, रस्त्यावरील चिन्हे आणि रस्ताही दिसणे अवघड होऊन बसते. अशा पावसाळी वातावरणात गाडीने फिरताना पुढील काळजी घ्याल.

 

picnic-inmarathi
imdb.com

१. पावसाळ्यात रस्त्यावर ओलाव्यामुळे गाड्या घसरण्याची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे वेगाने गाडी चालविण्याचा मोह टाळावा.

वाहनाचा वेग ताशी ६०-७० किमी असेल तर अचानक ब्रेक मारण्याची परिस्थिती उद्भवल्यास वेग कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता कमी होते.

२. गाडी रस्त्याच्या मध्यभागी चालवा, कारण पाणी रस्त्याच्या बाहेरील बाजूस साचते. ऑफ रोड ड्रायव्हिंग टाळा. रस्त्याबाहेरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज करणे अवघड असते.

३. पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा. तुमची गाडी ही पुढच्या वाहनापासून पुरेशी दूर असेल तर ती तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या मागच्या गाडीला पावसाळी धुरकट रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये योग्य तेवढा reaction time देऊ शकते.

 

Driving-Distance-inmarathi
Autoxpat.com

४. पावसात गाड्यांचा अंदाज येत नसल्याने सिग्नल फॉलो करुन गाडी चालवा. शक्यतोवर तुमच्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा. यामुळे समोरची गाडी मार्गातील पाणी सारत पुढे जात असल्याने तुम्हाला पुढच्या पाण्याचा अंदाज घेऊन चालवणे सोपे होते.

तसेच गाडीची लेन चेंज करायची झाली तर सिग्नल द्यायचा लक्षात ठेवा.

५. गाडीचे ब्रेक, टायर, हेडलाईट आधीच चेक करुन घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात होणारी फसगत यामुळे टळू शकते.

६. मोठी वाहने जसे ट्रक अथवा बसेस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका. ह्या वाहनांची चाके मोठी असल्याने रस्त्यावरील खड्डे चाकाखाली आल्यावर मोठे फवारे उडतात, चिखल उडतो. यामुळे रस्त्यावरील इतर गोष्टी दृष्टीस पडणे अवघड होते.

 

highway-inmarathi
dnaindia.com

७. पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.

८. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे. ब्रेकचा वापर करण्यापेक्षा, तुमच्या गाडीचा वेग हळू ठेवावा. तसेच, अचानक वळू नये.

यामुळे वाहन पल्टी होऊ शकते. वळणा-वळणाच्या रस्त्यावर अधिक सावधान राहावे आणि वाहन हळू चालवावे. तसेच, स्टिअरिंग हळूहळू फिरवावे.

९. जरी तुम्ही गाडी दिवसा चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाईट चालू ठेवा. ते तुम्हाला तर रस्त्यावर दिसण्यास मदत करतीलच, शिवाय इतर वाहनांनाही तुमच्या वाहनाची जाणीव करून देईल.

कित्येक राज्यांमध्ये दिवसासुद्धा गाड्यांचे हेड लाईट्स चालू ठेवणे बंधनकारक आहे.

 

DrivingInRain-inmarathi
blog.mercuryinsurance.com

१०. तुमच्या गाडीचे windshield wipers हे उत्तम अवस्थेत असू द्या. ते वेळीच तपासून पहा. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जीर्ण झालेले ठिसूळ वायपर्स बदलून टाका.

११. वाहत्या पाण्याखाली जमीन दिसत नसल्यास त्यातून गाडी चालवू नका.पावसामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन लागू शकत नाही. रस्त्याचा अंदाज नसेल तर अतिउत्साहात गाडी चालवू नका.

१२. अनिश्चित खोलीच्या डबक्यांमधून वाहन चालवितांना सावकाश जा. डबक्याची खोली जर तुमच्या वाहनाच्या दरवाजाच्या तळापेक्षा जास्त असेल, तर दुसरा मार्ग शोधा. डबकी वा साठलेल्या पाण्यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्यता अधिक वाढते.

गाड्या पावसात खूप वेगाने जात असतात त्यावेळी हायड्रोप्लेनिंगची समस्या उद्भवते.

जेव्हा गाड्या खूप वेगाने जात असतात तेव्हा गाड्यांचे टायर्स आणि रस्ता यांच्या मध्ये पाण्याचा एक thin layer तयार होतो. यामुळे गाडी रस्त्यालगत चालत नसते.

अशा परिस्थितीत, गाडीवर नियंत्रण मिळवणे अधिकच अवघड जाते. जर तुमच्या कारला हायड्रोप्लेनिंगचा धोका निर्माण झाला तर abruptly ब्रेक मारू नका किंवा गोंधळून जाऊन steering wheel फिरवू नकायामुळे तुमची गाडी पलटी होण्याची शक्यता असते.

 

floods-bow-wave-inmarathi
heaa.com

गाडीचा वेग कमी करून तिचा रस्त्याशी संपर्क होईल असं बघा. मग वाटल्यास ब्रेक मारा. हायड्रोप्लेनिंगची समस्या उद्भवू नये म्हणून पाऊस पडायला लागल्यावर निर्माण होणाऱ्या डबक्यांपासून सावधान रहा.

त्याचप्रमाणे साचलेले पाणी हे कित्येक खड्डे आणि डबक्यातील चिखल आपल्याला दिसू देत नाही.

अशा चिखलातून गाडी चालवली तर ती आपल्या वाहनांच्या ब्रेकची परिणामकारकता कमी करते.

१३. आपल्या कारचे वा वाहनाचे सर्व टायर चांगले आहेत ना म्हणजे टायर ट्रेड वा त्यावरील नक्षी झिजलेली नाही ना, हे तपासून घ्या. चांगल्या टायर कंपन्यांचे उच्च दर्जाचे टायर वापरण्यावर भर द्या. कारण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.

१४. पावसात गाडीच्या काचा बंद केल्यावर काचेवर बाष्प जमा होते, त्यामुळे कोणत्याच काचेतून स्पष्ट दिसत नाही. अशावेळी मोठ्याप्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी घाबरुन न जाता गाडीची पार्किंग लाईट सुरु करुन गाडी एका बाजूला घ्यावी.

काच बंद करुन एसी किंवा फॅन सुरु केल्यास काचेवरील बाष्प निघून जाते.

 

car-inmarathi
br.freepik.com

१५. एखाद्याशी स्पर्धा करणे, दोन गाड्यांमधून कट मारण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी जिवावर बेतू शकतात. हे टाळावे.

१६. पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो.

१७. गाडीवर योग्य प्रकारे ताबा मिळविण्यासाठी गाडीचं steering wheel दोन्ही हातांनी धरा. याचाच दुसरा अर्थ की तुमचा मोबाईल खाली ठेवा. लक्षात ठेवा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणं हे ३५ राज्यांमध्ये बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. असे करून तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

वरील गोष्टी लक्षात घेऊन गाडी चालवलीत तर पुढे येणारी संकटे मोठ्या प्रमाणावर टाळू शकतात आणि तुमचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि चांगल्या अर्थाने संस्मरणीय होऊ शकतो. त्यामुळे एवढं कराच !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?