' उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग – InMarathi

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांपासून आपण वृत्तवाहिन्यांमध्ये किम जोंग उनच्या बातम्या पाहत आलोय. उत्तर कोरियात हा कसा जगावेगळा देश आहे हे वृत्तवाहिन्यां आपापल्या पध्दतीनं माल मसाला वापरून आमच्या माथी मारत आलय. आम्ही अत्यंत आवडीने किम जोंग उनच्या रंजक बातम्या पाहण्यासाठी उत्सुक झालोय. किम जोंग उन हा आम्हा भारतीयांसाठी क्रूरकर्मा नसून शंभर टक्के मनोरंजन करणारं पात्र ठरलंय.

सुरूवातीच्या काळात जगानं किम जोंग उनची खिल्ली उडवली गेली परंतु संपूर्ण जग आज किम जोंग उनच्या उत्तर कोरियामध्ये रस दाखवू लागलंय.

मागील काही दिवसांपासून किमनं बॅलेस्टीक मिसाईलच्या नावाखाली आपली दहशत जगभरात पसरवलीय. अमेरीका आणि इतर महासत्तांना आता अणुयुध्द नकोय, भलेही कोल्ड वॉरच्या नावाखाली एकमेकांवर कुरघोडी केल्या जात असतील. किमनं धाडस दाखवून जगाला आपली दखल घ्यायला लावली, आणि आता तर थेट डोनाल्ड ट्रंपनं किमला चर्चेसाठी आमंत्रण दिलंय.

 

trump-kim-inmarathi
wsj.com

उत्तर कोरिया जरी जगाच्या नकाशावर काही काळ अलिप्त राहीला असला तरी आता तो सेलिब्रेटी देश झाल्याचं जाणवतंय. प्रत्येक देशाला उत्तर कोरियात नेमकं चालतय काय हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आणि कदाचित याच उत्सुकतेपोटी सर्व देश उत्तर कोरियाशी मैत्रीपूर्ण संबंधांसाठी आपला हात पुढे करू लागलेय.

अमेरिकेनं उत्तर कोरियाशी पर्यायानं किम जोंगला मैत्रीची ऑफऱ दिलीय. अमेरिकेचे हे मैत्रीचे हात म्हणजे किमसाठी धोक्याची घंटा देखील असू शकते.

किमशी मैत्री करून अमेरिकेबद्दल असलेला किमचा द्वेष कमी करणे आणि किमान उत्तर कोरियात चंचू प्रवेशसाठीतरी जागा मिळवणे आणि किमच्या रहस्यमय नगरीची माहिती मिळवणे हा देखील अमेरिकेच्या मैत्री प्रस्तावाचा उद्देश असू शकतो. सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असदनंतर सरळ सरळ उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांचा दौरा करण्याची इच्छा बोलून दाखवली. चीनच्या राष्ट्रपतींनी किम सोबत चीनच्या सीमेवर भेटण्यासाठी प्रस्ताव ठेवलाय.

या बातम्या जरी मनोरंजक आणि वेगवेगळ्या देशातील राष्ट्रप्रमुखांच्या इच्छा आणि प्रस्ताव एवढ्याच असल्या तरी त्या त्या देशांसाठी या गोष्टी महत्वाच्या आणि अनन्यासाधारण आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे या महासत्तांना जगभरातल्या प्रत्येक देशातील खडान् खडा माहीती आहे.

जगभरातल्या देशांमध्ये ह्यांचे गुप्तचर काम करतात. उत्तर कोरियाच असा एकमेव देश आहे त्याच्याबद्दल माहिती काढणं या महासत्तांना अवघड होऊन बसलंय. फक्त माहीती नाही ती म्हणजे उत्तर कोरियातील अंतर्गत घडामोडी आणि तंत्रज्ञानाची. पूर्वी उत्तर कोरियाला गांभीर्यानं न घेणारे देशे जेंव्हा उत्तर कोरियाच्या मिसाईल चाचण्यांचे कार्यक्रम समोर घेऊन आला तेंव्हा मात्र सर्वांच्या पायाखालली वाळू घसरली. सोबतच १९९६ पासून सिरीयासारखा देश उत्तर कोरियाचा राजनैतिक मित्र असणं म्हणजे जागतिक शांततेला सुरूंग लागण्यासाठी पुरेशी जागा मिळण्यासमान होय.

 

trump-kim-inmarathi
foreignpolicy.com

जगानं या आधीही काही देशांचं धैर्य आणि शक्ती पाहीलीय त्यातलं अग्रणी नाव म्हणजे इस्रायल आणि भारत. भारतानं अटलजींच्या नेतृत्वात केलेली अणुचाचणी हे याचं उत्तम उदाहरण. जगाला आणि शेजारील शत्रूराष्ट्राला न जुमानता भारतान अणुचाचणी केली आणि जगातील अणुराष्ट्रांमध्ये आपलं स्थान बनवलं. इजरायलनं अख्या अरब राष्ट्रांना पळता भुई थोडी केली.

ज्यांना आपलं अस्तित्व जगाच्या नकाशावर टिकवायचं, जगात मान सन्मानाचं स्थान मिळवयाचय, सर्वांगानं आपला देश आणि आपल्या देशातील जनतेला सुरक्षितता प्रदान करायचीय त्यांना आपल्या शक्तीची चुणूक ही जगभराला दाखवावीच लागतेय. आणि नेमकं तेच उत्तर कोरियानं केलं असं म्हणायला हरकत नाही.

२०१० पर्यंत उत्तर कोरिया फार चर्चेतला देश नव्हता परंतु २०१० च्या नंतर किम जोंग उनची उत्तर कोरियाचा उत्तराधिकारी म्हणून निवड होणं ही घटना चर्चेचा विषय ठरली.

बऱ्याच जागतिक राजकारणातील विश्लेषकांनी किम जोंग म्हणजे बच्चा असल्याची आणि त्याच्या हातून उत्तर कोरियाच्या विकासाची शक्यता कमी असल्याची मतं व्यक्त केली होती. परंतु किमनं आपली आक्रमकता आक्रस्ताळेपणाचं दर्शन जगाला दिलं आणि सर्वांच्या नजरा उत्तर कोरियाकडे वळल्या.

पूर्वी युध्द हिटलरच्या सैन्यामध्ये गोबेल्स नावाचा अधिकारी होता, युध्दावेळी खोट्या बातम्या पेरून समोरच्या शत्रूराष्ट्राच्या धैर्याचं खच्चीकरण करण्याचं काम तो करत असे. पुढे हीच पध्दती गोबेल्स थेअरी या नावानं वापरली जाऊ लागली. या थेअरीच्या माध्यमातून समोरील पक्षाच्या मनात भीती भरवली जायची आणि भीतीपोटी अर्धमेला झालेला शत्रू हरायचा. हीच गोबेल्स थेअरी या शीतयुध्दाच्या काळात किमनं वापरली, २०१२ ते २०१७ या काळात उत्तर कोरियानं काही रसायनिक आणि खतरनाक स्वरूपाची हत्यारं आणि रसायनं सिरीयाला पुरवल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या.

 

korea-missile-inmarathi
express.co.uk

या अशा बातम्यांमुळे जगातील महासत्ता राष्ट्रे नेहमीच उत्तर कोरियापासून चार हात लांब राहायला लागली. यावेळीही किमला या थेअरीचा फायदा झाला. याच थेरीच्या माध्यमातून किम जोंग-उननं साऱ्या जगाला भयभीत करण्याचं काम केलं आणि नेमका हाच डाव किमच्या पथ्यावर पडला.

उत्तर कोरियाचे चीनशी वाढते संबंध, रशियानं उत्तर कोरियाप्रती दाखवलेली सहानुभूती आणि पुर्वापार चालत आलेली सिरीयाशी उत्तर कोरियाची मैत्री ही कारणं देखील अमेरिकेला उत्तर कोरियाशी मैत्री स्थापीत करण्यासाठी पुरेशी आहेत.

उत्तर कोरियन लेखक केन गौज आपल्या नॉर्थ कोरियन हाऊस ऑफ कार्डस नावाच्या पुस्तकात लिहीतो की, २०१७ साली प्रचंड वेगानं किमनं मिसाईल चाचण्या घेतल्या, या चाचण्या घेत असताना जगाला हादरवून सोडण्याची आपली ताकद त्यानं जगाला दाखवून दिली. परंतु त्याला या चाचण्यानंतर थेट अमेरिकेच्या राष्ट्रपतींसोबत शिखर संमेलनात सामील होण्याची संधी मिळेल अशी पुसटशीही कल्पना नव्हती.

सिंगापूरमध्ये होणाऱ्या किम आणि डोनाल्डच्या भेटीकडे मात्र साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे. आता एवढचं बघणं बाकी आहे की सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेला धमकावणारा किम डोनाल्डची गळाभेट कशाप्रकारे घेणार. अमेरिकासारख्या महासत्तलेलाच थेट आपल्या रडारवर घेणारा किम जोंग अमेरिकेची डोकेदुखी तर बनलाय परंतु त्यांना आता किमसोबत मैत्रीशिवाय दुसरा पर्याय देखील किमनं शिल्लक ठेवलेला नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?