‘ह्या’ घटना सिद्ध करतात की, २०१७ हे वर्ष एवढेही वाईट नव्हते…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाते. एकेकाळी याच पत्रकारितेने आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याच पत्रकारितेकडे एक ‘Noble Profession’ म्हणून बघितल्या जाते. पण आज ह्याच ‘Noble Profession’ ने एक वेगळेच रूप धारण केले आहे. आजच्या पत्रकारितेवर कोणीही विश्वास ठेवत नाहीत. जर कुठली बातमी पटली नाही तर लगेच आपण बोलून मोकळे होते की, ‘अरे हे न्यूज वाले तर काहीही दाखवतात’… आजची पत्रकारिता म्हणजे केवळ एक व्यवसाय झाला आहे…नाही का?

InMarathi Android App

आज २०१७ या वर्षाचा शेवटचा दिवस… जेव्हापासून नवीन वर्षाची चाहूल लागली आहे, म्हणजेच जेव्हापासून डिसेंबर हा महिना सुरु झाला तेव्हापासूनच २०१७ हे वर्ष कसं गेलं याचं अनेक पायरींवर मुल्यांकन करण्यात येत आहे. यात मुख्यकरून यावर्षी काय वाईट घडलं, यावर्षी कुठल्या अश्या घटना घडल्या ज्याने जगाला हादरवून सोडले. हेच सर्व ऐकायला आणि बघायला मिळालं.

पण काय वाईट घटना आताच घडत आहेत, तर नाही त्या तर आधी देखील घडायच्या. मग का आजकाल सर्वीकडे केवळ नकारात्मक बातम्यांचीच चर्चा का होत असते? का प्रसार माध्यमे केवळ नकारात्मक गोष्टींवर भर देतात? कारण त्याच कारण आपण आहोत… आपल्यातील हत्या, चोरी, बलात्कार, भूत-प्रेत इत्यादींच्या बातम्या बघण्याची रुची वाढत चालत आहे. मग जे दर्शकांना आवडेल तेच नाही का प्रसार माध्यमं दाखवणार..

पण आपल्यातील काही लोकं असे देखील आहेत ज्यांना जगात केवळ नकारात्मक नाही तर सकारत्मक गोष्टी देखील दिसतात. यातीलच एक आहेत Jacob Atkins… ह्या व्यक्तीने यावर्षीच्या त्या काही सकारात्मक घटनांवर प्रकाश टाकला आहे ज्याकडे कदाचितच आपली नजर गेली असावी.

 

jacob-atkins-inmarathi

 

चला मग नजर टाकूयात २०१७ या वर्षात घडलेल्या काही सकारात्मक घटनांवर…

१. वैज्ञानिकांनी Great Barrier Reef च्या Rebreeding ची पद्धत शोधून काढली.

 

jacob-atkins-inmarathi01

 

२. Amazon च्या नव्या मुख्यालयात २०० बेघरांना आश्रय देण्यात येईल…

 

jacob-atkins-inmarathi02

 

३. Snow Leopard आता Endangered प्राण्यांच्या यादीतून बाहेर आहे.

 

jacob-atkins-inmarathi03

 

४. HIV/AIDS हे आफ्रिकेच्या रहवास्यांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण नाही आहे.

 

jacob-atkins-inmarathi04

 

५. यावर्षी मधमाश्यांची जनसंख्येत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संशोधकांनी एक असे कीटनाशक बनवले आहे ज्यामुळे मधमाशीची मृत्यू होत नाही.

 

jacob-atkins-inmarathi05

 

६.अर्जेन्टिना येथे एक अशी बुटांची फॅक्टरी आहे, जिथे रिसायकल टायर्स पासून बूट बनविले जातात आणि या फॅक्टरीत केवळ गावातील स्त्रियाच काम करतात.

 

jacob-atkins-inmarathi06

 

७.Conservationists येणाऱ्या ६ वर्षांत अॅमॅझॉनच्या जंगलात ७३ मिलियन झाडं लावण्यासाठी मंजुरी दिली आहे. तर न्युजीलंडच्या पंतप्रधानांनी पुढील वर्षी १०० मिलियन झाडं लावण्याचा निश्चय केला आहे.

 

jacob-atkins-inmarathi07

 

८.यावर्षी क्राईम रेट २.७ टक्क्यांनी कमी झाला आहे.

 

jacob-atkins-inmarathi08

 

९.बाल मजुरी २००० सालच्या तुलनेत अर्धी झाली आहे.

 

jacob-atkins-inmarathi09

 

१०.Lexington Kentucky मध्ये ज्यांना पार्किंग फाईन द्यावी लागते ते त्याची फाईन Fine Food Bank येथे खाण्याच्या वस्तू दान करून देखील भरू शकतात.

 

jacob-atkins-inmarathi10

 

तर ह्या होत्या २०१७ सालात घडलेल्या काही पण महत्वपूर्ण सकारात्मक घटना…

स्त्रोत : BoredPanda

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *