चर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

धर्माचे ठेकेदार म्हटलं की त्यांनी जे सांगितले ते आंधळेपणाने मानले जाते. ते स्वतः कितीही लबाड का असेना. भले काही डोळस भक्त आपला मार्ग बदलतात. पण हे ठेकेदार गरीब भोळ्या भक्तांना कोणत्याही मार्गाला घेऊन जातात.

कोणतीही दिशा दाखवतात. कोणत्याही कथा खपवतात आणि त्यावर विश्वास ठेवला जावा ह्याचीही तजवीज हे ठेकेदार करतात.

असाच एक मुर्खपणाचा किस्सा ख्रिस्ती बांधवांच्या तीर्थक्षेत्री म्हणजेच पवित्र समजल्या जाणाऱ्या व्हॅटिकन सिटी मध्ये घडलाय. व्हॅटिकन सिटी म्हणजे कॅथलिक ख्रिस्ती समुदायाचे पवित्र पूजा स्थळ.

इथले चर्च आणि इथल्या प्रथा ह्या जगभरातील सगळ्या ख्रिस्ती समाज्याच्या लोकांना मान्य कराव्या लागतात.

 

prayer-in-church-inmarathi
idea.de

जसे हिंदू धर्मात चारधाम किंवा इस्लाम मध्ये मक्का मदिना महत्वाचे धार्मिक स्थान आहे अगदी त्याच प्रमाणे ख्रिस्ती लोकांना व्हॅटिकन सिटी हे महत्वाचे धार्मिक स्थान आहे. हिंदू धर्मातील धर्म संस्थापक जसे शंकराचार्य असतात तसे व्हॅटिकन मध्ये पोप म्हणजे सगळ्यात मोठे फादर किंवा पाद्री असतात.

व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिसनी मात्र एका नवीन वादाला तोंड फोडलं आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा पण त्यांचे असे म्हणणे आहे की,

डेव्हिल म्हणजे सैतान अस्तित्वात आहे आणि रोमन कॅथॉलिक चर्च चे नाव बदनाम करण्याचा विडाच जणू त्यांनी उचलला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा सैतान सगळी काळी कामे करतो त्यामुळे जगभरातील सगळ्याच कॅथॉलिक समुदायाच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात खास प्रार्थना कराव्यात जेणे करून हा सैतान पराभूत होईल.

हे पोप पुढे असेही म्हणाले की पवित्र प्रार्थना स्थळ असलेले हे व्हॅटिकन चे चर्च देखील ह्या वाईट पापी सैतानाकडून त्याच्या वाईट प्रभावातून वाचवले पाहिजे.

आणि त्याला त्याच्या आत्ता पर्यंतच्या अक्षम्य चुका दाखवून देऊन नेस्तनाबूत केले पाहिजे.

 

pope-inmarathi
Telegraph.com

हे असे काही ह्या एकविसाव्या शतकात वाचून तर आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. सर्वसामान्य व्यक्तिच्या मानण्यानुसार सैतान हा दुसरा कोणी नसून आपल्या मागण्या बोलण्यातच असतो. आपणच वाईट वागतो तेव्हा आपण सैतानापेक्षा कमी नसतो. त्यामुळे फ्रान्सिस पोपनी हा सैतान नावाचा बागुलबुवा का बरे उभा केला असेल?

असे मजेशीर आणि तितकेच मूर्खपणाचे विधान ह्या सर्वोच्च पदावरच्या माणसाने का बरे केले असेल? जाणून घेऊयात.

भरपूर कुकर्म करून सुद्धा एखाद्या विषयी चांगले बोलणारे आढळतात. हल्लीच्या काळात असे आपण नेहमीच पाहतो.

आपला डाव साधून घेण्यासाठी किंवा काही काळेबेरे लपवण्यासाठी मनुष्य प्राणी काही खोट्या गोष्टींचा मुलामा लावतो आणि आपलेच कुकर्म सुकर्मा मध्ये बदलून टाकतो. तसेच काहीसे कारण ह्या व्हॅटिकन च्या सैतानाच्या गोष्टींमागे आहे.

ह्या फ्रान्सिस पोपने कायमच म्हणजे अगदी ते स्वतः पोप म्हणून निवडून आल्यापासूनच सैतानाच्या मनोहारी कहाण्या लोकांच्या मनावर ठसवल्या आहेत. इतक्या की पोपला मानणाऱ्या भक्तांना हे सगळे खरेच आहे असे वाटते.

 

fransis-inmarathi
abcnews.com

त्यात चर्च मध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी एक मागून एक घडत गेल्या. स्त्रियांवर अत्याचाराच्या बातम्या जगभर प्रसिद्ध झाल्या. कॅथॉलिक आणि लिबरल ह्यांच्यातल्या दारीची जाणीव सगळ्यांना झाली. अशा पद्धतीने व्हॅटिकन चर्च मधील एकेक बिंग फुटायला लागली.

चर्चच्यास विरोधात बरेच रिपोर्ट बनले, ११ पानी पुस्तिका चर्च मधीलच एका व्यक्तीने छापली.

त्याच्या म्हणण्यानुसार पोप फ्रान्सिसला हे गलिच्छ चाळे सुरू आहेत ह्याची खबर आहे आणि तरीही त्यांनी देखील कोणतीच पाऊले ह्याच्या विरोधात उचलली नाहीत. ह्या सगळ्या पापात कोण कोण सहभागी आहेत, हे पोप जाणून आहेत पण ते ह्याचा थांगपत्ता कोणाला लागू देत नाहीत. उलट काही बाकी कहाण्या सांगून हे सगळे झाकले जात आहे.

आता असे उखळ पांढरे पडायला लागल्यावर पोप फ्रान्सिसनी देखील ह्या सैतानाचा आधार घेतला. जे काही विकृत, अश्लील घडतंय ते सगळे ह्या सैतानाच्यामुळेच..!

जे कोणी ख्रिस्त धर्मावर बोट ठेवतय तेही सैतानाच्या सांगण्यावरूनच.. असाच प्रसार पोपनी सुरू केला आहे. सगळी कुकर्मांमागे फक्त सैतानाचा हात आहे आणि तोच चर्चला आणि ख्रिस्त धर्माला काळिमा फासत आहे असे पोप फ्रान्सिस चे म्हणणे आहे.

 

father-church-inmarathi
catholic-linc.com

तेव्हा पासून ह्या पोप वर आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्या भक्तांनी सैतानाच्या आगळ्या कहाण्या मान्य केल्या.

सैतान आपले आणि चर्च चे नुकसान करतो आहे, विकृत गलिच्छ चाळे करतो आहे आणि त्यावर उतारा म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे असा त्यांचा समज झाला. त्यावर पॉप ने प्रार्थना ही लिहिली ती अशी

St. Michael the Archangel, defend us in battle. Be our defense against the wickedness and snares of the devil. May God rebuke him, we humbly pray, and do thou, O Prince of heavenly hosts, by the power of God, thrust into hell Satan, and all evil spirits, who prowl about the world seeking the ruin of souls.”

ह्या प्रार्थनेला २०१३ पासून ऑक्टोबर महिन्यात म्हटले गेले. रोजच्या प्रार्थनेनंतर ही प्रार्थना भोळ्या भक्तांच्या प्रार्थनेचा अविभाज्य भाग बनुन गेली.

१९६४ पर्यंत ही प्रार्थना ख्रिस्ती नेहमी म्हणत असत आणि इतक्या वर्षांनी दुर्लक्षिलेली ही प्रार्थना पुन्हा सुरू झालीये ती सुद्धा फारच विचित्र कारणासाठी..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?