अणवस्त्र हल्ल्याच्या धमक्यांमागचं राजकारण!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कार्नेजी इंटरनॅशनल हे अमेरिकेतील एक थिंक टँक आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या एका सेमिनारमध्ये प्रा.नारंग यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले,

असं तर अणवस्त्रा बाबतीत भारताच घोषित धोरण ‘no first use ‘असं आहे पण जर पाकिस्तानकडून अशा हल्ल्याचा धोका भारताला जाणवला म्हणजे युद्धकाळात जर अशाप्रकारची पक्की गुप्तखबर भारताकडे असेल तर भारत त्यांच्या या अणवस्त्रांच्या जखि-यावर पहिल्यांदा हल्ला करू शकतो.

vipin-narang-marathipizza
southasianvoices.org

मागील महिन्यातच माजी संरक्षण मत्री परिकर यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. पण त्यावरून त्यांना बरीचशी टिका सहन करावी लागल्यानंतर त्यांनी आपले वैयक्तिक मत वगैरे म्हणून नंतर यापासून स्वतःला दुर केले होते. पण पर्रिकर ज्या पदावर आहेत तिथे वैयक्तिक मत वगैरे नसते तर तो institutional view मानला जातो. थोडक्यात भारतीय धोरणकर्ते याविषयावर नेमके काय विचार करत आहेत हे यातून आपल्याला कळते.

manohar-parrikar-marathipizza
http://www.deccanchronicle.com


शिवशंकर मेनन यांच्या पुस्तकातही याविषयावर लिहलंय असे कुठेतरी वाचले होते. भारताच्या पारंपरिक सैन्यबळापुढे आपला निभाव लागत नाही आणि पारंपरिक अणवस्त्रे वापरून स्वतःच्या अस्तित्वावरच संकट आणणे आपल्याला परवडत नाही यातील मधला मार्ग म्हणून पाकिस्तानने ‘टॅक्टिकल न्युक्लिअर अस्त्रे’ काढली. याला भारताचा नवीन सैन्य सिद्धांत ‘कोल्ड स्टार्ट’ याचीही पार्श्वभूमी आहे.

भारतीय संसदेवरील हल्ला झाल्यानंतर तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारने सीमेवर बराच मोठा सैन्य जमावडा केला होता. साधारणपणे एक वर्षभर हे सैन्य तिथे होते. याला प्रत्युत्तर म्हणून समोरून पाकिस्तानी सैन्यही युद्धाला सज्ज झाले होते. वर्षभर कधीही युद्धाला तोंड फुटेल अशा स्थितीत दोन्ही सैन्यदले होती, पण नंतर भारताने आपले सैन्य मागे घेतले. याच सैन्य दबावामुळे मुशर्रफ यांनी तेव्हा पहिल्यांदा लिखितमध्ये सिमेपलीकडून दहशतवाद्यांना मदत मिळत होती आणि यापुढे ती आता मिळणार नाही हे मान्य केले होते.अर्थातच हे आश्वासन त्यांनी पाळले नाही हा भाग वेगळा पण हे मान्य करवून घेण्यात भारताला यश मात्र मिळाले होते.

पण सीमेवर वर्षभर सैन्य युद्धसदृश्य परिस्थिती ठेवून काहीही न करता (म्हणजे पाकिस्तानला धडा न शिकवता) सैन्य माघारी घेतल्याबद्दल तेव्हा सरकारवर बरीचशी टिकाही झाली होती. ही माघार घ्यावी लागली याचीही काही कारणे होती.

indian-army-marathipizza
www.parhlo.com

पहिले युद्धात surprising elements महत्त्वाची भूमिका बजावतात पण भारतीय सैन्यदलांना आपापल्या मोर्चावर पोहचण्यासाठी पार देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाल करावी लागते. देशाच्या पूर्वेकडून निघालेल्या या सैन्य तुकड्यांना सीमेवर पोहचण्यासाठी किमान चोवीस तास तरी लागतात आणि ही एवढी मोठी सैन्य हालचाल दडवूनही ठेवता येत नसते. त्यामुळे भारताने अशी काही सैन्य हालचाल केली की लगेचच भारतातील पाकिस्तानी गुप्तहेर ती बातमी तिकडे पोहचवतात. यामुळे ते आधीच सावध होऊन भक्कम तटबंदी करतात. अशा तयारीत सैन्याशी लढणे फारच कठीण आणि वेळखाऊ काम तर असतेच शिवाय या लढाईत अपेक्षित लक्ष्यही प्राप्त करणे कठीणच ठरते. ‘अॉपरेशन पराक्रम ‘मधून हा सर्प्राईज एलिमेट्स निघून गेल्यामुळे वाजपेयी यांनी सैन्य माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

पण यानंतर भारतीय सैन्य रणनितिकारांना या अशा परिस्थितीत वापरण्यासाठी नवीन सैन्य सिद्धांताची आवश्यकता जाणवली होती. तोच सिद्धान्त म्हणजे हा कोल्ड स्टार्ट हा सैन्य सिद्धांत होय. यात पाकिस्तानने पुन्हा अशी आगळीक केलीच तर सीमेवरील तैनात सैन्याच्या तुकडीनेच विद्युत वेगाने कारवाई करून पाकिस्तानच्या भागावर कब्जा करणे अपेक्षित आहे. यासाठी मग या तुकड्यांना लागणारे आर्मर्ड, दारूगोळा, हत्यारे, सैनिक यांची तयारी करून ठेवायची. मागील काही वर्षे झाली भारत विविध शस्त्रांची खरेदी याच सैन्यसिद्धांतानुसार करत आहे.

india-cold-start-marathipizza
http://www.defencenews.in

यालाच उत्तर म्हणून पाकिस्तानने टॅक्टिकल न्युकलियर वेपन्स निर्माण केली आहेत, म्हणजे छोटया क्षमतेचे अणुबॉम्ब जे पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी जमीनीवर कब्जा करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर टाकून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी म्हणून प्रामुख्याने निर्माण केलेले आहेत. पण भारतीय अणवस्त्र धोरणानुसार जर जगात कुठेही भारतीय सैन्यदलावर हल्ला झालाच तर भारत त्याचे उत्तर अणवस्त्रानेच देईल असे स्पष्ट लिहलेले आहे. त्यामुळे पाकिस्तान जो मागील काही वर्षे झाली आपल्याला या छोटया अणवस्त्रांची भिती घालत आहे त्याची हवा काढण्यासाठीच मागे पर्रिकर आणि आता प्रोफेसर नारंग यांनी अशी सुचक वक्तव्ये केली असावीत.

थोडक्यात भारत पाकिस्तानवरील आपला जो मिलीटरी डॉमिनन्स आहे तो कुठल्याही स्थितीत म्हणजे पारंपारिक असेल नाहीत आण्विक कायमच राखू पाहतोय. नवीन मिसाईल्स भेदी यंत्रणा असेल किंवा पाण्यातून अणवस्त्रे सोडण्यासाठी लागणाऱ्या पाणबुड्या असतील, भारत वेगाने ही क्षमता मिळवत आहे’, जमीनीवर आणि हवेत अशी क्षमता भारताजवळ आहेच. पाण्यातूनही भारत ती मिळविण्याच्या जवळ आहे.

Military-research-and-development-marathipizza
http://topyaps.com

थोडक्यात पाकिस्तानला भारताकडून सतत भयाच्या धोक्याखाली ठेवून त्यांना न झेपणा-या शस्त्रास्त्र स्पर्धेत गुंतवून अंतर्गत दृष्टीने कमकुवत ठेवायचे भारताचे धोरण आहे. हे धोरण आजपर्यंत तरी यशस्वी आहे. या दोन्ही देशातील ही स्पर्धा थोडक्यात शीतयुद्धाच्या कालखंडातील सोव्हिएत रशिया व अमेरिका यांच्यातील शस्त्रास्त्र स्पर्धेसारखी आहे. तिथे अमेरिकेने रशियाला अशाचप्रकारे कमकुवत बनवून विखंडीत केले होते. तोही अणवस्त्र धारी देश असताना आणि न युद्ध करता.. भारतही असच काही करतोय का? दृश्य पुरावे तर याकडेच बोट दर्शवित आहेत..!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 30 posts and counting.See all posts by shivraj

One thought on “अणवस्त्र हल्ल्याच्या धमक्यांमागचं राजकारण!

 • March 28, 2017 at 9:33 pm
  Permalink

  4 Core हि १९६२ च्या चीन युद्धात NEFA( North East frontier area) इथे तैनात होती आणि नेतृत्व अदुरदर्शी आणि हेकेखोर असल्याने. (लष्करी आणि राजकीत दोन्ही) तिने प्रचंड हानी तसेच लज्जास्पद माघार सोसली,
  नोव्हे. १९६२ मध्ये त्यांच्या हेड क्वार्टर-तेजपूर मध्ये 4 Core चे सगळे अधिकारी जमले होते. त्यांचा नवीन कमांडर म्हणून नियुक्त झालेला अधिकारी त्यांना प्रथमच भेटून संबोधित करणार होता. त्या माणसाबद्दल सगळे खूप काही ऐकून होते. आता हे काय बोलणार, कदाचित पराभवाची लांबलचक चिकित्सा असेल, कदाचित सांत्वनाचे शब्द असतील, कदाचित पराभवाकरता शिव्या असतील, काय असेल त्या पहिल्याच भेटीत? सगळेच थोडे टेन्शन मध्ये होते. ते आले, डायस वर उभे राहिले आणि एक वार त्यांनी रोखून सगळ्यांच्या कडे पाहिले. सगळीकडे अगदी पिन ड्रोप शांतता होती, ते शांत पण खंबीर आणि खणखणीत आवाजात फक्त एकच वाक्य बोलले, “Gentlemen, there will be no more withdrawl again from this core.” (ह्या कोअरमधून पुन्हा कधीही कोणीही माघार घेणार नाही.” बास, अन ते निघून गेले. ते आज ह्या जगात हि नाहीत पण 4 Core च काय अजून पर्यंत अक्ख्या भारतीय सैन्याने कधीही कुठेही माघार घेतलेली नाही.
  ते कमांडर होते पुढे भारताचे पुढे सरसेनापती झालेले जनरल, फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *