मनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” आजवर इतक्या ठिकाणी दिसलेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अन आयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणजेच युएफओ चे अस्तित्व असल्याचे अनेकजण मानतात. कित्येकदा हे युएफओ बघितल्या गेल्याचा दावाही करण्यात आला आहे. युएफओचा थेट संबंध हा एलियन्सशी लावला जातो. युएफओ दिसणे म्हणजेच एलियन्सचे अस्तित्व असणे. आज आपण ह्याच युएफओचा इतिहास आणि हे युएफओ कधीकधी कुठेकुठे दिसले हे जाणून घेणारं आहोत.

जर्मनी, १५६१ :

 

ufo history-inmarathi01
universeinsideyou.net

जर्मनीच्या नुरेमबर्गमध्ये एप्रिल १५६१ ला पहिल्यांदा लोकांनी आकाशात ‘ग्लोब्स’, मोठा क्रॉस आणि काही विचित्र प्लेट सारखे गोष्टी दिसल्या. त्या वेळेच्या चित्रांवरून तसेच लाकडांच्या कटिंगवरून त्या घटनेचे पुरावे देखील मिळतात.

टेक्सास १८९७ :

 

ufo history-inmarathi02
youtube

टेक्सास येथे लोकांनी सिगारच्या आकाराची एक मोठी वस्तू आढळून आली आणि विंडमिल ला जाऊन आदळली. टेक्सास येथील हीस्टोरिकल कमिशन ला एक संकेत आला ज्यामध्ये ह्याचा उल्लेख करण्यात आला होता की १८९७ साली येथे एक विमानाचा अपघात झाला होता, ज्याच्यातून एका एलियनचा मृतदेह सापडला होता जो एका अनोळखी ठिकाणी पुरण्यात आला.

अमेरिका १९४७ :

 

ufo history-inmarathi03
syracusenewtimes.com

अमेरिकेत २४ जून १९४७ ला एका प्रायव्हेट विमानाच्या पायलटने आकाशात उडणाऱ्या एका विचित्र गोष्टीचा दावा केला होता. ही घटना Mount Rainier येथे घडली होती. ह्या बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. ह्या घटनेच्या दोन आठवड्या अंतर्गत अश्या अनेक अज्ञात गोष्टी आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता.

दिल्ली १९५१ :

 

ufo history-inmarathi04
catchnews.com

नवी दिल्ली येथे एका फ्लाइंग क्लबच्या २५ सदस्यांनी सिगारच्या आकाराच्या काही गोष्टी बघितल्या ज्या जवळपास १०० फुट एवढ्या लांब होत्या. हे युएफओ अचानक काही काळाने अदृश्य झाले. ही घटना १५ मार्च १९५१ ला सकाळी १०.२० मिनिटांनी घडली असल्याचे सांगितल्या जाते.

शिकागो २००६ :

 

ufo history-inmarathi05
theufochronicles.com

शिकागो येथील ओ’हारे इंटरनॅशनल एयरपोर्टवर गेट C-17 च्यावर एक विचित्र आकृती दिसून आली ज्याला युएफओ म्हटल्या गेलं. ही उडणारी गोष्ट सरकारी नव्हती, त्यामुळे युनायटेड एयरलाईन्सने ह्या घटनेचा तपासही केला.

कोलकाता २००८ :

 

ufo history-inmarathi06
youtube

२९ ऑक्टोबर २००८ साली पूर्व कलकत्ता येथे पहाटे साडे तीन ते साडे सहा दरम्यान आकाशात अतिवेगाने एक विशाल गोष्ट जाताना आढळून आली होती. ही घटना एक कॅमेऱ्यात देखील कैद करण्यात आली होती. ह्या गोष्टीतून वेगेवगळे रंग निघताना दिसून आले होते.

ह्या युएफओला बघण्यासाठी इ.एम. बायपासवर लोकांची गर्दी जमली होती. त्यानंतर मिडीयाने देखील ह्या घटनेचा व्हिडीओ प्रक्षेपित केला होता.

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण, ह्या युएफओसाठी एक दिवस देखील साजरा केला जातो.

दरवर्षी २ जुलैला ‘जागतिक युएफओ दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे एकच उद्धेश असतो तो म्हणजे लोकांना जागरूक करणे. जर कशी आकाशात अशी कुठल्या प्रकारची वस्तू आढळली जी आपल्या परिचयाची नाही तर त्या वस्तूंची माहिती लोकांनी आपल्या ठिकाणच्या स्त्रोतांपर्यंत पोहोचवावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?