जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपली भारतीय संकृती ती पुरुष प्रधान संस्कृती आहे. जिथे आपण कितीही प्रगती केली तरी महिलांना स्त्रियांना नेहेमी दुय्यम स्थानच दिले जाते.

आपण नेहेमी हे ऐकतो की या ठिकाणी स्त्रियांना जाण्यास मनाई आहे, येथे स्त्रियांचे जाने चांगले नाही, एवढचं काय तर काही मंदिरांत देखील स्त्रियांना प्रवेश निषेध असतो.

याचे ताजे उदाहरण म्हणजे शनी मंदिर. मागील वर्षी शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर येथे एका महिलेने शनी देवाच्या मूर्तीला हात लावला यावरून बराच वाद पेटला होता. ज्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आंदोलन तसेच कायदेशीररीत्या लढून स्त्रियांना निषेध असणाऱ्या शनी मंदिरात प्रवेश मिळविला.

यावेळी स्त्रियांच्या हक्का संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

असो… पण आपल्या या पुरुष प्रधान देशात आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना जाण्यास मनाई आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे…

नेमकी अशी कुठली ठिकाणं आहेत हे जाणून घेण्यास तुम्ही देखील उत्सुक झाले असणार…

चला तर मग जाणून घेऊ या भारतातील तसेच जगातील त्या ठिकाणांविषयी जिथे पुरुषांना ‘नो एण्ट्री’ आहे.

Ima Keithal/Mother’s Market

 

women-inmarathi08

 

Ima keithal हा मणिपूर येथील एक बाजार आहे. इतर बाजारांप्रमाणे येथे देखील गरजेच्या वस्तूंची खरेदी विक्री होताना दिसते.

पण या बाजाराची विशेषता म्हणजे येथे केवळ स्त्रियाच दुकानं लावतात. एवढचं नाही तर केवळ विवाहित स्त्रियाच या बाजारात दुकान लावू शकतात.

असे म्हणतात की, ब्रिटीश साम्राज्यात पुरुषांनी या बाजाराला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा येथील स्त्रियांनी एकत्र येऊन या बाजाराला वाचवले, तेव्हापासून येथे केवळ स्त्रियाच दुकानं लावतात आणि हा जगातील सर्वात मोठा स्त्रियांचा बाजार मानल्या जातो.

उमोजा गांव, केनिया

 

women-inmarathi09

 

केनिया येथील उमोजा गाव, हे एक असे गाव आहे हिथे पुरुषांना गावाच्या सीमारेषेच्या जवळपास भटकण्यास देखील मनाई आहे. असे यामुळे कारण या गावात केवळ स्त्रियाच राहतात.

या गावात राहणाऱ्या स्त्रिया या त्या स्त्रिया आहेत ज्यांना बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर कुठ्याही प्रकारचा अत्याचार सहन करावा लागला आहे.

२०१५ साली झालेल्या एका स्टडीनुसार येथे ४५ स्त्रिया आणि २०० लहान मुले आहेत. यामध्ये त्या लहान मुली देखील आहेत ज्यांचा बाल विवाह झाला होता.

ब्रह्मा मंदिर, पुष्कर

 

women-inmarathi07

 

ब्रह्मा यांना मिळालेल्या श्रापामुळे त्यांची कुठेही पूजा केली जात नाही. जगात त्यांचे केवळ एकच मंदिर आहे जे राजस्थानच्या पुष्कर येथे आहे. या मंदिरात विवाहित पुरुषांना जाण्यास मनाई आहे असे मानतात.

Chakkulathukavu Temple, Kerala

 

women-inmarathi06

 

केरळ येथील या मंदिरात पुरुषांच्या प्रवेशाला केवळ एका विशिष्ट वेळेत मनाई करण्यात येते.

मकर संक्रांतीवेळी नारी पूजा दरम्यान आणि धनुर मास मध्ये धनु पूजे वेळी या मंदिरात पुरुषांना जाण्यास मनाई आहे. यावेळी येथील सर्व काम स्त्रियाच सांभाळतात.

कन्याकुमारी मंदिर, तमिलनाडु

 

women-inmarathi05

 

जेव्हा भगवान विष्णूने मत सती च्या शरीराला खंडित केले तेव्हा देवी सतीच्या पाठीचा कण्याचे हाड येथे येऊन पडले. म्हणून या स्थानाला शक्ती पीठ मानल्या जाते.

या मंदिरात देवी सती निवास करते असे मानल्या जाते, देवी सती या संन्यासी होत्या म्हणून या मंदिरात अविवाहित पुरुषांना जाण्यास मनाई आहे.

अट्टुकल मंदिर, केरल

 

women-inmarathi04

 

देवी भद्रकालीच्या मंदिरात पोंगल सणाचे खूप मोठे आयोजन करण्यात येते, यात ३० लाखाहून अधिक स्त्रिया सहभागी होतात.

१० दिवस चालणाऱ्या या आयोजनाचे संपूर्ण काम स्त्रिया सांभाळतात, या दरम्यान पुरुषांना या मंदिरात जाण्यास मनाई आहे.

लिंग भैरवी मंदिर

 

women-inmarathi02

कोयंबतूरच्या या मंदिराच्या गर्भागृहात पुरुषांना जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच जेव्हा केव्हा येथे कुठल्या धार्मिक संमेलनाचे आयोजन करण्यात येते तेव्हा त्यातील काही विधींपासून पुरुषांना दूर सरले जाते.

तर अशी आहेत हि जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना नो एण्ट्री आहे.

स्त्रोत : wittyfeed

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’

  • December 3, 2018 at 4:48 am
    Permalink

    khupch chaan mahiti

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?