' १९०३ च्या दिल्ली दरबारची ही छायाचित्रे तुम्ही कधीही पाहिली नसतील – InMarathi

१९०३ च्या दिल्ली दरबारची ही छायाचित्रे तुम्ही कधीही पाहिली नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१९४७ मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून आज आपण सर्व एका स्वतंत्र भारतामध्ये मुक्तपणे वावरत आहोत.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ पारतंत्र्यात असलेल्यांना अधिक कळतो, असे म्हटले जाते.

आपल्या देशाच्या बाबतीतही हे अगदी ठरे ठरले.

आज आपण आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगत आहोत.

मात्र स्वातंत्र्य मिळवून देणा-यांसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचं बलिदान अत्यंत महत्वाचे आहे.

हे स्वातंत्र्य आपल्या भारताला मिळवून देण्यासाठी खूप मोठमोठ्या महात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचा संघर्ष आठवून आजही आपल्या डोळ्यामध्ये पाणी उभे राहते.

१९४७ च्या पूर्वी आपल्या देशावर ब्रिटीश राजवटीची सत्ता होती, हे आपल्या सर्वाना माहित आहेच.

१८७७, १९०३ आणि १९११ मध्ये ब्रिटीश सरकारने दिल्लीमध्ये एकूण तीन खूप मोठे दरबार लावले होते, ज्यांना ‘दिल्ली दरबार’ या नावाने ओळखले जाते.

१९११ मधील दरबार एकमात्र असा दरबार होता, ज्यामध्ये किंग जॉर्ज पंचम स्वत: आले होते.

 

 

१९०३ च्या दिल्ली दरबाराचे लॉर्ड कर्झन यांच्या तपशीलावार दोन आठवड्यांच्या उत्सवाचे आयोजन केले होते.

दिल्लीमधील हा दरबार पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी खेचून घेण्यासाठी, पोस्ट स्टेश, दूरध्वनी आम्नी टेलीग्राफिक यांच्या सहाय्याने प्रेक्षकांना आकर्षून घेण्यात आले.

येथे विविध प्रकारच्या डिझाईन केलेल्या वस्तू होत्या. स्पेशल मेडल्स, फटाके प्रदर्शन आणि आकर्षक नृत्य यांचे आयोजन करण्यात आले होते.

एडवर्ड सातवा हा कर्झनवर खुश नसल्यामुळे उपस्थित नव्हता, पण त्याने आपल्या भावाला म्हणजेच ड्यूक ऑफ कनॉट या दिल्ली दरबारामध्ये पाठवले होते.

हा दिल्ली दरबार खूपचं मोठा आणि प्रशस्त होता.

या दिल्ली दरबारामधून आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ब्रिटीश सरकारने खूप पैसे खर्च केले होते.

आज त्याच १९०३ मधील दिल्ली दरबारचे काही छायाचित्रे दाखवणार आहोत, जी कदाचित तुम्ही या पूर्वी कधीही पाहिली नसतील.

१९०३ मधील दिल्ली दरबारच्या दरम्यान रीवाचे महाराज हत्तीची  स्वारी करताना 

 

Delhi darbar of 1903.Inmarathi11

 

खूपच वेगळा आहे, दिल्लीचा इतिहास

 

Delhi darbar of 1903.Inmarathi12

 

लॉर्ड कर्झन आणि लेडी कर्झन या दरबारात हत्तीवरून फेरफटका मारताना 

 

Delhi darbar of 1903.Inmarathi10

इतिहासाची साक्ष देणारे हे फोटो तुम्ही यापुर्वी कधीही पाहिली नसतील.

 

Delhi darbar of 1903.Inmarathi9

 

अशाप्रकारे त्यावेळी घोषणा दिली जात असे.

 

Delhi darbar of 1903.Inmarathi8

 

इतिहासामध्ये त्या दरबारातील हे छायाचित्र देखील आहे.

 

Delhi darbar of 1903.Inmarathi7

खूपच भव्य होता, हा दिल्ली दरबार.

Delhi darbar of 1903.Inmarathi6

 

Delhi darbar of 1903.Inmarathi5

 

हा दरबार सुंदरप्रकारे सजवण्यात आला होता.

या दरबाराचा थाट अत्यंत आगळावेगळा होता.

Delhi darbar of 1903.Inmarathi4

 

Delhi darbar of 1903.Inmarathi3

 

यामधून ब्रिटीश सरकारने आपले शक्ती प्रदर्शन केले होते.

 

Delhi darbar of 1903.Inmarathi2

 

या छायाचित्रातून रॉयल सोहळ्याचा अंदाज येतो.

हत्ती, घोडे यांच्यासह दिल्ली दरबार सजला होता.

Delhi darbar of 1903.Inmarathi1

 

असे हे दिल्ली दरबार खूप भव्य आणि सुंदर तयार करण्यात आले होते.

इतिहासामध्ये देखील या दिल्ली दरबारची योग्य ती प्रशंसा करण्यात आली आहे. ब्रिटीश सरकार शक्ती प्रदर्शन करण्याची संधी कधीही वाया घालवत नसे, हे या दरबारावरून दिसून येते.

छायाचित्रांचा स्त्रोत : blogspot.com

माहितीचा स्त्रोत : oldindianphotos.in

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?