ही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही कधी जादूचा खेळ बघितला आहे, त्यात तो जादुगार आपल्या डोळ्यादेखत एखाद्या गोष्टीला गायब करतो, त्याचं रूप पालटतो एखाद्या व्यक्तीला फळ, चेंडू किंवा कुठल्या प्राण्यात बदलतो. हे असे जादूचे खेळ तर आपण अनेक बघितले असतील. पण तो जादू म्हणजे निव्वळ खेळ असतो, त्यात खर अस काहीही नसत. पण तुम्हाला माहित आहे की जगात असा एक व्यक्ती आहे, जो मृत व्यक्तींपासून डायमंड म्हणजेच हिरा घडवतो… विश्वास होत नाहीये ना.. पण हे खरं आहे…

जर तुम्हाला देखील तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याची आठवण म्हणून हा हिरा आपल्याजवळ ठेवायचा असेल तर तुम्हाला, स्वित्झर्लंडच्या रीनाल्डो विल्ली यांच्याशी संपर्क साधावा लागेल… कारण हाच आहे तो जो मृत व्यक्तींच्या राखेपासून हिरा घडवतो, जेणेकरून ती व्यक्ती एक आठवण म्हणून आपल्यात नेहेमिकरिता राहावी. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे…

 

Algordanza-inmarathi

 

आपल्या प्रीयव्यक्तीच्या मृत्यूने आपण दुखी होतो आता ती आपल्यात नाही ह्या विचारानेच आपण खचून जातो. मग मागे राहतात त्या केवळ आठवणी… पण या हिऱ्याच्या मदतीने तुम्ही नेहेमिकरिता त्या व्यक्तीची आठवण, त्याचा सहवास आपल्याजवळ बाळगू शकता.

तसं तर माणसाच्या मृत्यू नंतर त्याच्या शरीराची किंमत म्हणजे केवळ माती असते. पण त्याच्या आप्तेष्टांसाठी त्याची किंमत त्याच्या मृत्यू नंतरही कमी होत नसते. याच भावनेचा विचार करता, स्वित्झर्लंडच्या रीनाल्डो विल्ली याने ‘Algordanza’ नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तीच्या अंतिम संस्कारानंतर त्याच्या राखेला हिऱ्याचे स्वरूप दिले जाते.

 

Algordanza-inmarathi03

 

Algordanza हा एक स्विश शब्द आहे ज्याचा मराठीत ‘आठवणी’ असा अर्थ होतो. ही कंपनी दरवर्षी जवळपास ८५० मृतदेहांच्या राखेला हिऱ्यात बदलते. आता हिरा म्हटल की तो महाग असणारच… पण या हिऱ्याचा खर्च त्याच्या आकारावर असतो, ज्याची किंमत ३ ते १५ लाखांत असते.

आता तुम्ही विचार कराल की, हा रीनाल्डो विली याच्या डोक्यात असा विचित्र विचार आला तरी कसा… तर यामागील कहाणी देखील अतिशय रंजक आहे.

जवळपास १० वर्षांपूर्वी रीनाल्डोच्या शिक्षकांनी त्याला एक आर्टिकल वाचण्याकरिता दिले. जे की सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिंथेटिक डायमंडच्या उत्पादनावर होतं. त्या आर्टिकलमध्ये असे सांगितल्या गेले होते की, कश्या प्रकारे राखेतून हिरा बनविल्या जाऊ शकतो. पण रीनाल्डो चुकीने त्या राखेला मानवी राख समजला, जेव्हाकी त्यात व्हेजिटेबल राखेबद्द्ल सांगण्यात आले होते.

 

Algordanza-inmarathi01

 

रीनाल्डोला हा आयडिया आवडला आणि त्याने आपल्या शिक्षकांना मानवी राखेला हिऱ्यात बदलण्यासंबंधी आणखी माहिती विचारली. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला समजावले की, तू चुकीचा अर्थ काढतो आहेस, यात ज्या राखेबद्द्ल लिहिले आहे ती मानवी राख नाही तर व्हेजिटेबल राख आहे. तेव्हा रीनाल्डो ने प्रश्न केला की, जर व्हेजिटेबल राखेला हिऱ्यात परावर्तीत केल्या जाऊ शकते तर मग मानवी राखेला का नाही? त्याच्या शिक्षकांनाही त्याचा हा विचार पटला आणि त्यांनी त्या आर्टिकलच्या लेखकाशी संपर्क साधला. जो की, स्वित्झर्लंड मध्ये राहायचा आणि त्याच्याजवळ सिंथेटिक डायमंड बनविण्याच्या मशीन्स होत्या. मग त्यांनी या आयडियावर मिळून काम करण्यास सुरवात केली आणि अखेर Algordanza कंपनी अस्तित्वात आली.

 

Algordanza-inmarathi02

 

मानवी राखेपासून हिरा बनविण्याची प्रक्रिया पूर्णपणे तांत्रिक आहे. यासाठी पहिल्यांदा त्या राखेला एका विशेष प्रक्रियेतून जावे लागते. ज्यात त्या मानवी राखेतून कार्बन पूर्णपणे वेगळे केले जाते. मग या कार्बनला खूप मोठ्या तापमानावर गरम करून त्याला ग्राफाईट मध्ये परावर्तीत केल्या जाते. यानंतर या ग्राफाईटला एका मशिनमध्ये ठेवल्या जाते, जिथे एक अशी स्थिती बनविल्या जाते जशी पृथ्वीच्या खोलात असते, म्हणजेच सर्वोत्तम दबाव आणि सर्वाधिक तापमान. या स्थितीत त्या ग्राफाईटला काही महिने ठेवल्यानंतर त्याचे रुपांतर हिऱ्यात होते.

रासायनिक संरचना आणि गुणांच्या आधारे सिंथेटिक आणि रिअल हिऱ्यात तसा तर काहीच फरक नसतो, फरक असतो तो केवळ किमतीचा… खरा हिरा हा या सिंथेटिक पेक्षा खुप महाग असतो. पण या दोहोंत फरक सांगणे खूप कठीण असते. यातील फरक केवळ केमिकल स्क्रीनिंग करूनच सांगता येतो.

सध्या जगात Algordanza या कंपनीच्या १२ देशांत शाखा आहेत. ज्यापैकी चार आशियातील जपान, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि थायलंडमध्ये आहेत. जिथे तुम्ही तुमचा ऑर्डर देऊ शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?