प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दिवसेंदिवस दुषित होत असलेलं पर्यावरण आज आपल्या समोरील सर्वात मोठं संकट आहे. पृथ्वीवरील जीवन हे एका चक्रानुसार चालत, जोवर त्या चक्रातील सर्व कड्या जोडलेल्या आहेत तोवर सर्व ठीक राहील पण जेव्हा ह्यातील एक ही कडी तुटली तर संपूर्ण जनजीवन विस्कळित होईल. आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी आपण म्हणजेच मनुष्य प्राणी असणार आहोत.

ह्याचं कारण म्हणजे आधुनिकतेच्या आहारी गेलेलो आपण, ज्यांना निव्वळ ह्या जगात आधुनिकता घडवून आणायची आहे आणि त्यासाठी ते कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, जसे की आपले पर्यावरण.

पण एक-ना-एक दिवस पर्यावरणाच्या सहनशक्ती चा अंत होईल आणि तेव्हा हा निसर्ग रौद्र रूप धारण करेल ज्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. असं कित्येकदा पर्यावरण प्रेमी, भू शास्त्रज्ञ, जीववैज्ञानिकांनी वेळोवेळी सांगितले आहे.

 

pollution-inmarathi
fastread.in

सध्या सगळ्यांनाच ही बाब पटली आहे, आणि ते आपापल्या परीने पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रकारे प्रयत्न करून कुठेतरी पर्यावरणाचे रक्षण व्हावे ह्यासाठी आज आपल्याच नाही तर सर्वच देशातील सरकार तसेच अनेक स्वयंसेवी संथा कार्यरत आहेत.

वैश्विक स्तरावर ह्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आपल्या आजूबाजूला देखील अनेक असे लोक असतात ज्यांच्यापासून प्रेरणा घेत आपणही पर्यावरणाच्या सृजनशीलतेसाठी काही पाउले उचलायला हवी.

आज आपण आपल्या देशातल्या अश्याच काही पर्यावरण प्रेमींना जाणून घेणार आहोत जे खऱ्या आयुष्यात हिरो ठरत आहेत.

१. प्रोफेसर राजगोपालन वासुदेवन – इंजीनियरिंग कॉलेज चे प्रोफेसर :

 

plasticman-inmarathi
theflourishingindia.com

प्रोफेसर राजगोपालन वासुदेवन हे प्लास्टिक मॅन ऑफ इंडियाच्या नावानी देखील प्रसिद्ध आहेत. ते एका इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक असून त्यांनी आपल्या इनोवेशनच्या जोरावर कचरा आणि प्लास्टिकचा वापर करून चक्क रस्ते बनविले आहेत.

त्यांच्या ह्या आयडियाचे पेटेंट विकत घेण्यासाठी अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांना मोठमोठे ऑफर्स दिले पण त्यांना पैश्यांचा मोह नव्हता तर त्यांना भारतासाठी आपल्या देशासाठी काहीतरी करायचे होते.

म्हणून त्यांनी भारता सरकारला ही टेक्नोलॉजी मोफत दिली. आता ह्या टेक्नोलॉजीने हजारो किलोमीटर पर्यंतचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या ह्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

२. एंजलिना अरोडा – युवा वैज्ञानिक :

 

Angelina-Arora-inmarathi
indianlink.com

१५ वर्षांच्या एंजलिना अरोडाने इको-फ्रेंडली प्लास्टिक बनविण्याचा एक चांगली पद्धत इनोव्हेट केली आहे. एंजलिना अरोडा हिने मासे आणि कोळंबी ह्यांच्यापासून निघालेला कचरा तसेच खेकडा, कोलंबीची शेपटी, मास्यांचे डोकं हे सर्व ती सिडनी येथील गर्ल्स हायस्कूलच्या सायन्स लॅबमध्ये घेऊन गेली, आणि त्यावर तिने रीसर्च करण्यास सुरवात केली.

तिच्या रिसर्चचा परिणाम म्हणजे एक मजबूत तसेच हलके आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार झाले.

३. सतीश कुमार – कचऱ्यातील प्लास्टिकचे इंधनात परिवर्तन :

 

satish-kumar-inmarathi
yourstory.com

सतीश कुमार ह्यांनी एक अशी टेक्नोलॉजी तयार केली ज्याद्वारे आपण प्लस्तिक्चे इंधनात परिवर्तन घडवू शकतो. इंधन बनविण्याच्या ह्या प्रक्रियेत पाण्याचा कुठेही वापर केला जात नाही. ह्या टेक्नोलॉजीमध्ये कचऱ्यातील प्लास्टिकला व्ह्यॅक्युमने इंधनात परिवर्तीत केल्या जाते.

४. अनुराग आणि सत्येंद्र मीना – ‘स्वच्छ मशीन’ :

 

Swachh-Machine-inmarathi
indianeagle.com

आयआयटीच्या दोन विद्यार्थी अनुराग आणि सत्येंद्र ह्यांनी एक अशी मह्सीन तयार केली ज्यात तुम्ही रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि अल्युमिनियमच्या कॅन टाकू शकता. ह्या मशीनचे नाव ‘स्वच्छ मशीन’ असे ठेवण्यात आले. प्रत्येक वेळी कचर्याच्या बदल्यात ह्या मशीनमधून ३०० मिली शुध्द पाणी येतं.

५. नारायण पीसापटी – एडीबल चमचा :

 

narayan-edible spoons-inmarathi
theweekendleader.com

नारायण पीसापटी ह्यांनी एडीबल कटलरी तयार केली, म्हणजेच प्लास्टिकच्या कटलरी एवजी आता तुम्ही एडीबल कटलरीचा वापर करू शकता. म्हणजेच अशी भांडी-चमचे जे वापरल्यावर खाता येथील. ह्याचा विचार नारायण पीसापटी ह्यांना एका फ्लाईटच्या प्रवासादरम्यान आला. जेव्हा त्यांनी एका गुजराती सहयात्रेकरूला खाकरा ह्या पदार्थाचा चमच्यासारखा वापर करताना बघितले.

६. बाबा बलबीर सिंह सींचेवाल – बिन नदीचा उद्धार

 

baba balbir singh sinnchewal-inmarathi
deccanchronicle.com

बाबा बलबीर सिंह सींचेवाल हे पंजाब येथील एक पर्यावरण कार्यकर्ता आहेत. त्यांना ‘इको बाबा’ म्हणून देखील ओळखले जाते. २००० साली बाबा बलबीर सिंह सींचेवाल ह्यांनी एकट्याने कुणाचीही मदत न घेता १६० किलोमीटरच्या काळी बिन नदीला स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता, त्यानंतर हळूहळू लोक तसेच सरकारनेही त्यांनी ह्या कामात मदत करण्यास सुरवात केली.

आणि ४० नगरांच्या कचऱ्याने नाला बनलेली ही नदी स्वच्छ झाली. जिथून जाताना लोकांना नाकावर रुमाल धरावा लागायचा आज त्याच नदीकाठी लोक पिकनिक साठी जातात.

हे आणि ह्यांसारखे अनेक पर्यावरण प्रेमी, निसर्गाचे आपल्यावर जे उपकार आहेत ते न विसरता पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. तुम्ही देखील ह्यांच्यापैकी एक होऊ शकता. गरज आहे ती केवळ आपल्या परीने प्रयत्न करायची.

जर भारतातील सर्व नागरिकांनी हा संकल्प केला की मी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कुठलही कृत्य करणार नाही, तर निश्चितच आपले पर्यावरण सुरक्षित होईल आणि निसर्गाचे ह्या पृथ्वीचे ऋण आपल्याला काही अंशी नक्कीच फेडता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?