अजितदादांच्या ‘सत्ता द्या, भूमिपुत्रांना नोकऱ्या देऊ’ वचनाची जनता अशी खिल्ली उडवतेय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या जनसंपर्क यात्रा, दौरे, सभा यांनी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सध्याच्या सरकारवर विरोधक ताशेरे ओढत आहेत.

या सर्व गदारोळात अनेक वक्तव्ये अशी आहेत की ज्यावरून लोकच नेत्यांना धारेवर धरतात आणि प्रश्न विचारतात.

नुकत्याच एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यानंतरही जनतेने दिलेल्या दिलखुलास प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. अजितदादा म्हणाले, “पुन्हा सत्ता दिली तर ७५ % भूमिपुत्रांना नोकऱ्या देऊ.”

 

ajit pawar inmarathi

 

वास्तविक अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रात भाजवचे सरकार येण्याआधी अनेक वर्ष सत्तेत होते.

इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही त्यांना विरोधात असताना भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून दिल्या पाहिजेत याची उपरती होते या विसंगतीवर लोकांनी बोट ठेवत अनेक टिप्पण्या केल्या आहेत.

एके ठिकाणी वाचक इंद्रजित कुंटे म्हणतात,

“१० वर्षे सत्ता उपभोगून उपरती झाल्याबद्दल अभिनंदन.”

 

comment inmarathi

 

त्यावर प्रतिक्रिया देताना एक वाचक म्हणतात, “सुरुवात बारामतीतून करा.”

राजेश भोसले यांनी आघाडी सरकारच्या काळातल्या कारभारावर निशाणा साधत म्हटलं आहे,

“विधानसभेत एखादा प्रश्न मांडायला सुद्धा थैली द्यावी लागत होती त्यावेळी… आणि यांना आता भूमिपुत्र आठवले. जरंडेश्र्वर कारखाना कावडीच्या किमतीने घेतला, त्यावेळेस भूमिपुत्र नाही आठवले.”

 

comment inmarathi

 

अशोक जाधव यांनी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत कुरघोडी आणि गटातटाच्या राजकारणावर बोलताना म्हटलं आहे,

“यापुर्वी वृंदाने शिताफीने मोक्याच्या जागी वर्णी लावण्याची अभेद्य व्यवस्था केलेली आहे. आजही तेच धोरण ठरवतात, तुमच्यात तळमळ असेलही पण अपल्याच फंद फितूरांमुळे एकूण चित्र अवघड आहे.”

comment inmarathi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या घराणेशाहीवर अनेकांनी खुमासदार भाष्य केलं आहे. अजितदादा आज भूमिपुत्रांना मोक्र्या देण्याच्या गोष्टी करत असले तरी त्यांना पार्थ, रोहित, सुप्रिया इत्यादी पवारपुत्रच प्रिय असल्याच्या कमेंट्सना चांगला प्रतिसाद मिळालाय!

भागवत जाधव म्हणतात,

भूमी पुत्र म्हणजे नेमके कोण? #रोहित पवार,#पार्थ पवार यांच्या सारखे #कष्टाळू,#होतकरू आणि #अभ्यासू मुल का?

 

 

विश्वास कपूर यांनी इतकी वर्षे सत्ता उपभोगुनही अजिदादांना आज भूमिपुत्रांची आठवण का आली? असा सवाल केला आहे. ते म्हणतात,

“इतकी वर्ष होती ना मग कशाला गप्प बसले होते काय तर उगीच बकवास करता? आत्ता वाट बघत बसा! तुमची सत्ता येईल असे वाटतं का? स्वप्नं बघत बसा.”

 

comment inmarathi

सचिन कांबळे यांनी तर अजितदादांना “सत्ता हवी असेल तर भाजपात या” असे आव्हान केले आहे. ते म्हणतात,

“हे पहिलेच करून दाखवायचं होतं, आता तुमचं कोण ऐकणार आहे, आणि विश्वास तरी कोण ठेवणार, जर तुम्हाला सत्ताच पाहीजे आसेल तर या मग बी.जे.पी. मध्ये.”

 

comment inmarathi

रणजित क्षीरसागर यांनी आघाडी सरकारच्या काळात मावळ तालुक्यात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा संदर्भ देत अजित पवार यांना जाब विचारला आहे. ते म्हणतात,

“उशिरा सुचलेले शहाणपण. दहा वर्ष सत्ता होती तेंव्हा काय धरणात पाणी पुरवठा करु लालतो, तुमच्या काळात दोन पोते युरियासाठी शेतकऱ्यांना काठ्या खाव्या लागल्या, मालक विहीरीवर आणि नोकर दारावर होता. लाईट देता आली नाही. म्हणे नोकरी देतोय. कितीही करा तुमच संपलं आता.”

 

comment inmarathi

प्रकाश पवार यांनी तेव्हाच्या आघाडी सरकारच्या अकार्यक्षम कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, अनेक समस्यांचा पाढा वाचताना ते म्हणतात,

“पाटबंधारे खात्यात नोक-या देणार की साखर कारखान्यांमध्ये रोजगार देणार की जिल्हा सहकारी बँकांमधून देणार? महाराष्ट्राची वाट लावली. बिलकूल येाजना नाहीत की त्यांची अंमलबजावणी नाही. यशवंतरावांचे नांव घेऊन राजकिर्द सुरु केली पण त्यांची vision साक्षात कृतीत उतरविली नाही. आता मतांची भीक मागून गेलेले दिवस परत येणार नाहीत.”

 

comments inmarathi

 

अनेकांनी अजित पवार यांना आधी काम करून दाखवण्याचा आणि मग सत्ता मागण्याचा सल्ला दिला आहे. योगेश शिंगटे म्हणतात,

 

comment inmarathi

 

अशा प्रकारे अजित पवार यांच्या “सत्तेत आल्यास ७५ टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देईन” या आश्वासनावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आघाडी सरकारचा काळ आणि तेव्हा सामना कराव्या लागलेल्या समस्या याबद्दल जनतेच्या मनात असलेली अढी या प्रतिक्रियांचा दिसून येते.

थोडक्यात, येत्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारात अशी किती वक्तव्ये आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात हे [वाहने औत्सुक्याचे ठरणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “अजितदादांच्या ‘सत्ता द्या, भूमिपुत्रांना नोकऱ्या देऊ’ वचनाची जनता अशी खिल्ली उडवतेय!

 • August 22, 2019 at 12:18 am
  Permalink

  murkh mansanchya nadi lagayla Janta vedi nahi aata!!

  Reply
 • October 12, 2019 at 11:46 am
  Permalink

  चुत्या समजतो हा अजित पवार जनतेला, साला एवढं लुटून खाल्लं जनतेला तरी मन नाही भरले याच

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?