गुन्हेगारांचीच ‘सिरीयल किलिंग’ करणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

पेड्रो राँड्रीजीयस फिल्हो याला आपण “डेक्स्टर” तर नाही म्हणू शकत पण, या व्यक्तीने गुन्हेगारांची अत्यंत क्रूरपणे सिरीयल किलिंग केलेली आहे. त्यामुळेच कदाचित याला त्यातल्या त्यात चांगला सिरियल किलर म्हणत असावीत.

आपण खूप वेळेस ऐकतो की गुन्हेगार हा खऱ्या अर्थाने गुन्हेगार नसतो तर त्याला गुन्हेगार करणारी परिस्थिती गुन्हेगार असते.

असेच काहीसे घडले आहे का या पेड्रो सोबत? काय आहे याची कथा? जी ऐकल्यानंतर सर्वसामान्यांच्या अंगावर अगदी काटाच येतो. जाणून घेऊयात या लेखामध्ये.

पेड्रो रेड्रोजियस फिल्हो याने कमीत कमी ७० खुन केलेले आहेत. त्यातील १० खून तर त्याने वयाच्या १८ व्या वर्षाच्या आधीच केलेले आहेत असं बोललं जातं.

 

pedro-inmarathi
brazil.com

ज्यावेळी त्याच्याबद्दल बोललं जातं त्यावेळी असे सांगतात की चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी खडतर प्रसंगच लिहिलेले असतात.

पेड्रोने अनेक अत्याचार ग्रस्त व्यक्तींचा मागोवा घेतला आणि त्यांच्या अपराध्यांचा पाठलाग केला आणि ज्यांच्या मुळे त्याला त्रास झाला असं त्याला वाटलं त्या सर्वांना त्याने त्याच्या पद्धतीने न्याय दिला.

थोडसं वेडसर वाटेल पण हीच सत्य परिस्थिती आहे आणि त्याला आपण यावरून “न्याय वेडा” म्हणू शकतो.

त्याच्या आयुष्याची सुरुवातच अत्यंत खडतर परिस्थितीमधे झाली. त्याचा जन्म १९५४ ला ब्राझील देशातील मीना नेरवेस या शहरांमध्ये झाला. यावेळी त्याचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या मेंदूला दुखापत झालेली डॉक्टरांना आढळून आली.

त्याची आई गरोदर होती तेव्हा त्याच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

वयाच्या १४ व्या वर्षी फिल्होने त्याच्या आयुष्यातील पहिला खून केला. ज्याचा खून केला तो त्याच्या शहराचा उपमहापौर होता.

 

felho-inmarathi
rebelcircus.com

कारण त्या उपमहापौराने त्याच्या वडिलांना शाळेतील कामावरून काढून टाकले होते, त्यांच्यावर शाळेतील अन्न चोरल्याचा आरोप होता आणि त्यामुळेच फिल्होने त्याला संपूर्ण शहराच्या समोर गोळी घालून मारून टाकले.

त्यानंतर तो थांबलाच नाही. दुसऱ्या खुनामध्येही जास्त अंतर नव्हते. ज्याने खरच अन्न चोरले होते त्या शाळेतील कर्मचाऱ्याला पेड्रोने मारून टाकले.

त्यानंतर मात्र फिल्हो तिथून पळून गेला आणि “सँवो पावलो” राज्यातील मोगी दास क्रुझेस या शहरात तो वास्तव्य करू लागला.

तिथे त्याने मादक द्रव्याची हेराफेरी करणाऱ्या एका व्यावसायिकाचा खून केला आणि त्याच्याच टोळीमध्ये तो काम करू लागला. याच दरम्यान तो प्रेमातही पडला. तिचं नाव मारिया ओलंपीया होते.

काही टोळीतील सदस्यांनी काही दिवसांनी तिला मारून टाकले, तोपर्यंत मात्र ते दोघे आनंदाने सोबत राहत होते.

ओलंपियाच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेल्या फिल्होला अपराध करण्याची खुली मुभाच मिळाली. त्याने तिच्या मृत्यूबद्दल बरीच चिकित्सा केली आणि तो त्या सर्वांवर पाळत ठेवू लागला जे तिच्या मृत्यूमध्ये सहभागी होते. आणि मग त्यांना पकडून अत्यंत निर्दयीपणे त्यांचा खून करणं हेच त्याच्या आयुष्याचं लक्ष बनलं.

 

pedro-filho-inmarathi
killerpedia.com.

त्यानंतर त्याच्या अपराधांमध्ये मात्र वाढ होत गेली आणि पुढच्या वेळी त्याने स्वतःच्या वडिलांनाच यमसदनी धाडले, ज्यांच्यासाठी त्याने पहिला खून केला होता त्यांनाच त्याने मारून टाकले.

त्याचे वडील त्याच्या आईला सारखेच कुठल्याही लहान-सहान कारणामुळे मारझोड करत असत आणि त्यामुळेच त्यांना कारागृहातही ठेवण्यात आले होते.

पेड्रो त्यांना कारागृहात भेटण्याच्या बहाण्याने गेला होता आणि तो त्यांना निर्दयीपणे संपवुनच बाहेर आला. यावेळी त्याने एवढं निर्दयीपणा दाखवला की त्याने वडिलांना मारण्याच्या आधी त्यांच ह्र्दय काढून ते खाऊन टाकले.

यावेळी मात्र त्याने सर्व सीमा गाठल्या होत्या. आणि मग शेवटी त्याला २४ मे १९७९ रोजी अटक करण्यात आली.

त्याला कारागृहात नेण्यासाठी पोलिसांच्या गाडीत अजून दोन अपराध्यांसहित बसवण्यात आलं होतं. त्यातील एक अपराधी बलात्कारी होता.

ज्यावेळी कारागृहात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचे दरवाजे उघडले त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की फिल्होने त्या बलात्कारी गुन्हेगाराचा गाडीतच खात्मा केलेला होता.

 

lazy-inmarathi
killer.com

येथूनच त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. त्याला जेरबंद केल्यानंतर जिथे अनेक गुन्हेगार त्याच्या सोबत राहत होते त्यांना मारणे हा त्याचा रोजचा उद्योग बनलेला होता. याच ठिकाणी त्याने कमीतकमी ४७ गुन्हेगारांचा सफाया केला असेल.

असं म्हटलं जातं की फिल्होने फक्त त्यांनाच मारलं जे खऱ्या अर्थाने गुन्हेगारच होते.

एका मुलाखतीदरम्यान त्याने असे सांगितले की गुन्हेगारांना निर्दयीपणे मारून टाकण्यात त्याला एकात्मिक सुख मिळते, त्याला त्याच्या या कृत्याचा खूप आनंद होतो.

याच मुलाखती

दरम्यान त्याने असेही सांगितले होते की चाकूने गळा चिरणे ही पद्धत त्याला सगळ्यात जास्त आवडते. यामुळे समोरची व्यक्ती तडपून तडपून जीव सोडते.

त्याला सुरुवातीला १२८ वर्षांची कैद न्यायालयाने सुनावली होती पण कैदेत असताना त्याच्या गुन्ह्यांमध्ये जी वाढ झाली त्यामुळे त्याची शिक्षाही जवळपास ४०० वर्षांपर्यंत वाढत गेली होती.

 

pedro-rodrigues-inmarathi
Killer.Cloud

ब्राझील देशातील कायद्यानुसार एखाद्या अपराध्याला फक्त तीस वर्षच कैदेत ठेवता येते. सरतेशेवटी त्याला ३४ वर्षांची शिक्षा देण्यात आली.

ही शिक्षा भोगून तो २००७ मध्ये कारागृहातून दैनंदिन जीवनात परत आला.

पेड्रो रेड्रोजियस फिल्हाे ब्राझील देशातील अपराधांना मारणारा एक हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची ही चक्रावून टाकणारी कहाणी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “गुन्हेगारांचीच ‘सिरीयल किलिंग’ करणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते

  • February 10, 2019 at 1:37 pm
    Permalink

    to

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?