पाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अजय देवगणचा सिंघम पिक्चर आला आणि त्यात दाखवलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पात्राने सगळ्यांनाच भुरळ घातली. बलदंड शरीरयष्टीचा, गुंड आणि दुष्ट प्रवृत्तींचा कर्दनकाळ असलेला असा सिंघम देशातील प्रत्येक पोलीस ठाण्यात रुजू झाला तर गुन्हेगारी नाहीशी होण्यास किंचितसाही वेळ लागणार नाही असे सगळ्यांना वाटू लागले. असे होणे तसे दुरापास्तचं !

पण बिहारच्या पाटणा जिल्ह्यात एक असा सिंघम होता ज्याने तेथील गुंडांच्या नाकी अगदी दम आणला होता. त्याचे नाव ऐकताच तेथील गुंडांचे हातपाय लटपटायला लागायचे असे म्हणतात.

तुमच्यापैकी बरेचजण या सिंघम पोलीस अधिकाऱ्याबद्दल ऐकून असतील. तर बरेचसे जण असेही असतील ज्यांना या सिंघमबद्दल काही माहिती नसेल.

ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक खास गोष्ट –

हा सिंघम अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे आणि त्याचे नाव आहे- आयपीएस ऑफिसर शिवदीप वामन लांडे

 

shivdeep-lande-marathipizza01

स्रोत

शिवदीप यांचा जन्म २० ऑगस्ट १९७६ रोजी महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पारस गावामध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मधून बी.ई. चे शिक्षण पूर्ण केले. पण पोलीस दलाचे भारी अप्रूप असल्याकारणाने त्यांनी आपला मार्ग बदलला आणि २००६ च्या बॅच मधून आयपीएस अधिकारी होऊन ते बाहेर पडले.

आयपीएस झाल्यावर त्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी टाकण्यात आली. त्यांना बिहारची राजधानी पाटणा इथे शहराचे एसपी म्हणून धाडण्यात आले. हे शहर आधीपासूनच गुन्हेगारीच्या नावाने बदनाम आहे, त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे ध्येय शिवदीप यांच्या समोर होते.

 

shivdeep-lande-marathipizza02

स्रोत

रुजू झाल्यावर लगेचच त्यांनी पाटणाच्या गुन्हेगारी जगतात स्वच्छता मोहीम सुरु केली आणि अल्पावधीतच ते जनतेमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या १० महिन्यांच्या सेवेत चिंधीचोरांपासून थेट माफिया डीलर्सना तुरुंगाची हवा खायला लावली.

मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांतील वाढते प्रमाण बघून ते स्वत: रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सगळ्या टपोरी वर्गाला चांगलीच अद्दल घडवली. ज्यामुळे काही काळातच छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आणि महिला वर्गांमध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला.

कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ते अचूक प्लानिंग करायचे. कारवाई होत असताना तेथे मिडिया उपस्थित असेल याची ते विशेष खबरदारी घ्यायचे. ज्यामुळे त्यांच्या कारवाईवर कोणतेही प्रश्नचिन्ह कधीच उभे राहिले नाही. शिवदीप लांडे हे प्रत्येक तक्रारीकडे जातीने लक्ष द्यायचे. त्यांचा स्वत:च्या तत्वांवर पूर्ण विश्वास होता.

त्यांनी कधीही आपल्या कार्याशी प्रतारणा केली असे दिसून आले नाही.

 

shivdeep-lande-marathipizza03

स्रोत

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वत:च्या पगारातील ६०% हिस्सा हा एका संस्थेला दान द्यायचे. ही संस्था गरीब मुलींची लग्न लावून द्यायची आणि विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे उपलब्ध करून द्यायची.

जेव्हा त्यांचे पाटणावरून अरारिया येथे ट्रान्स्फर करण्यात आले तेव्हा त्यांच्या ट्रान्सफर संदर्भात उलट्या सुलट्या चर्चा लोकंमध्ये रंगू लागल्या आणि तेथील जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरली.

सर्वांनी मिळून सरकारने शिवदीप यांची बदली करू नये अशी विनंती केली. शिवदीप लांडे यांना जनतेच मिळालेलं प्रेम त्यांच्या कामाची पोचपावती होती जणू !

अरारिया येथे ट्रान्स्फर झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला.

 

shivdeep-lande-marathipizza04

स्रोत

असा हा सर्वाना हवाहवासा वाटणारा सिंघम सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?