' “पतंजली जीन्स” : उद्योग विश्वात रामदेव बाबांची आणखी एक मोठी झेप – InMarathi

“पतंजली जीन्स” : उद्योग विश्वात रामदेव बाबांची आणखी एक मोठी झेप

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गेल्या काही वर्षात भारतीय उपभोक्ता बाजारात एक नाव अग्रक्रमाने पुढे आले आहे.

पतंजली आयुर्वेद लिमिटेड(PAL)

हिंदुस्थान युनिलीवर, प्रोक्टर & गँबल, आयटीसी सारख्या मोठ्या आणि विस्तारित आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या मागून येऊन पतंजलीने नुसतीच बरोबरी नव्हे तर अग्रेसर होण्याचा चंग बांधलेला दिसून येतो आहे. पतंजलीचे उत्पाद सध्या भारतात घराघरात वापरले जातात. त्यांची उत्कृष्ट गुणवत्ता आणि कमी दर हे यामागचं कारण असल्याचं आढळून येत आहे.

 

patanjali-products-marathipizza

 

पतंजलीचा चेहरा असणाऱ्या रामदेव बाबांनी नागपूरमध्ये झालेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की –

50 लाख कोटींची उलाढाल असणाऱ्या भारतीय बाजारपेठेत त्यांना सर्वात मोठा वाटा उचलायचं त्यांचं लक्ष्य आहे.

सध्या पतंजली आयुर्वेदमध्ये 20,000 कर्मचारी काम करतात. तसेच 10 सुसज्ज अशा प्रयोगशाळांमध्ये 200 वैज्ञानिक कार्यरत आहेत. पतंजलीची ‘दंतकांती’ टूथपेस्ट देशविदेशात लोकप्रिय असून पतंजली तर्फे सध्या रोज 25 लाख ट्युबसची निर्मित केली जाते. लवकरच हा आकडा 50 लाख प्रतिदिन होईल असे रामदेव बाबांकडून सांगण्यात आले. भारतीय बाजारपेठेत ‘दंतकांतीचा’ एकूण वाटा 5% आहे. लोकांचा आयुर्वेदाकडे एकूण असलेला कल पहाता, प्रोक्टर & गँबल, आयटीसीइत्यादी उद्योगसमूहांनी देखील आयुर्वेदिक टूथपेस्ट बाजारात आणल्या आहेत.

दि टेलिग्राफ ह्या इंग्रजी माध्यमाला देण्यात आलेल्या एका मुलाखतीत बाबा रामदेवांनी उल्लेख केला की त्यांनी योगसाधनेकरता लागणाऱ्या वेशभूषेनुसार कपडे बाजारात आणावेत अशी त्यांच्या अनुयायांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे. ह्यावरूनच बाबा रामदेवांना ‘पतंजली’ तर्फे कपड्यांची स्वतंत्र अशी रेंज बाजारात आणण्याची कल्पना सुचली. फक्त योगसाधनाच नव्हे तर स्त्री व पुरुषांना लागणारे, आवडणारे आधुनिक कपडे देखील पतंजली तर्फे ‘परिधान’ ह्या नावाखाली बाजारात आणण्याच्या हालचाली पतंजलीकडून सुरु झाल्या. आधुनिक कपड्यांमध्ये ‘जीन्स’ ह्या पाश्चात्य आणि सर्वात लोकप्रिय वेशभूषेचा देखील समावेश असेल.

जर आम्हाला देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याकरता लढा द्यायचा असेल तर कापडनिर्मिती उद्योगात उडी घ्यावीच लागेल असे रामदेव बाबांनी नमूद केले आहे.

बाबा रामदेव भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या लहानसहान वक्तव्याची देखील माध्यमातून दखल घेतली जाते. हे बाबा रामदेव देखील जाणून आहेत. म्हणूनच एखादी गोष्ट पतंजलीकडून निर्मित होण्या अगोदरच तिची भरपूर चर्चा माध्यमात होते आणि लोकप्रिय होऊन जाते. म्हणूनच पतंजलीसाठी ते सर्वोत्तम ‘ब्रँड अँबॅसेडर’ आहेत.

( वाचा: रामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक )

acharya-balakrishna-patanjali-swami-ramdev-baba-marathipizza

ह्यामुळेच इतर उद्योगसमूहांप्रमाणे पतंजलीला उत्पादांच्या जाहिरातीसाठी सिनेकलाकार किंवा खेळाडूंची गरज पडत नाही. ‘पतंजली जीन्स’हे एक उदाहरण.

‘डेनिम’ ह्या जीन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या कपड्याची आर्थिक उलाढाल 2020मध्येजवळपास 64 अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय डेनिम उद्योगाने आजवर सातत्याने ह्या क्षेत्रात प्रगती साधून 110 कोटी मीटर प्रतिवर्ष इतकी मजल मारली आहे. इतकं असून भारतीय डेनिम उद्योगाचा जागतिक वाटा केवळ 5%च्या जवळ पोचतो.

नेमकी हीच नस पकडून पतंजली ह्या उद्योगात उतरत असल्याचे दिसून येते.

ह्यासाठी पतंजली नागपूरमधल्या ‘मिहान’मध्ये 40 लक्ष चौरस फूट जागेवर उद्योगउभारणी करण्याच्या तयारीत आहे. ही परियोजना पतंजलीच्या हरिद्वारस्थित उद्योगापेक्षा मोठी असेल. ह्यासाठी पतंजली 1000 कोटींची गुंतवणूक करत असून 10 ते 15 हजार लोकांना ह्या परियोजनेत रोजगार मिळेल अशी शक्यता आहे.

 

patanjali_jeans_marathipizza

स्त्रोत

इतर उत्पादांप्रमाणेच जर कापडनिर्मितीत पतंजलीने उत्तम गुणवत्ता व दरांमध्ये आक्रमकता ठेवली तर पतंजली कापडउद्योगात देखील इतर उद्योग समूहांच्या तोंडचे पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. गरज आहे ती फक्त पुरवठा साखळ्या निर्माण करून दर नियंत्रणात ठेवण्याची.

कापड-उद्योगात नवे विक्रम स्थापन करण्यासाठी पतंजलीला शुभेच्छा…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 23 posts and counting.See all posts by suraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?