रामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


योगगुरू रामदेव बाबांचा चेहराघेऊन ‘पतंजली’ कंपनी ने आयुर्वेदिक औषधींद्वारे बिझनेस विश्वात प्रवेश केला.

नंतर बिस्कीट, टूथपेस्ट आल्या आणि बघता बघता पतंजली ही भारतीय FMCG (Fast Moving Consumer Goods) घराघारांत पोहोचली.

 

patanjali-products-marathipizza

एक आश्चर्यजनक गोष्ट ही की – रामदेवबाबा हे पतंजली चा फक्त चेहरा आहेत…ही कंपनी त्यांची नाहीच!

पंतजलीचे ९४% शेअर्स (म्हणजे मालकी भाग) आचार्य बाळकृष्ण, ह्यांचे आहेत.


पतंजलीच्या यशाचं वारू चौफेर उधळत असताना CEO, आचार्य बाळकृष्ण देखील यशाचं शिखर पादाक्रांत करत आहेत.

कंपनीच्या नफ्यामुळे कंपनीचे मालक असलेले आचार्य भारतातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक झाले आहेत.

 

acharya-balakrishna-patanjali-swami-ramdev-baba-marathipizza

 

Hurun India Rich List ह्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत बाळकृष्ण २६ वे आले आहेत. ह्या यादीत एकूण ३३९ भारतीयांना त्यांच्या संपत्तीनुसार स्थान देण्यात आलं आहे.

आचार्य बाळकृष्ण तब्बल २५,६०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मालक आहेत.


त्यांची वैयक्तिक संपत्ती १,६०० कोटी रुपये एवढी आहे.

पतंजलीच्या कामांची केवळ दहा वर्षांपूर्वी सुरूवात करताना हा पसारा एवढा मोठं होईल अशी कल्पना त्यांनी स्वप्नात देखील केली नव्हती.

तेव्हाच्या त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलताना आचार्य म्हणतात :

त्याकाळी माझं बॅंकेत अकाऊन्ट देखील नव्हतं. पण ह्या कामासाठी मला ५०-६० कोटींचं कर्ज घ्यावं लागलं होतं.

रामदेव बाबांचे विश्वासू सहकारी असलेले आचार्य नेहेमी पांढऱ्या “धोती-कुर्ता” मधे दिसतात. ते कम्प्युटर वापरत नाहीत. त्यांना प्रिंट-आउट्स बघून काम करायला आवडतं.

पतंजली च्या डोळे दिपवणाऱ्या यशाच्या समोर दिसणारा, चेहरा जरी रामदेव बाबांचा असला तरी त्या मागची मेहनत आचार्य बालकृष ह्यांची आहे!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 215 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?