ह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

नेपाळमधील कोणते देवस्थान सर्वात प्रसिद्ध आहे असा प्रश्न केला, तर हमखास उत्तर येईल की पशुपतीनाथ मंदिर.

जगातील सर्वच हिंदू मंदिरांमध्ये ह्या मंदिराला मानाचे आणि वरचे स्थान आहे. आज आपण ह्याच मंदिराविषयी जाणून घेऊया.

 

pashupatinath-inmarathi01
wikimedia.org

हिंदूंच्या आठ पवित्र धार्मिक स्थळांपैकी पशुपतीनाथचाही समावेश होतो. हे मंदिर भारत आणि नेपाळ या दोन देशांना सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्‍ट्या जोडून ठेवते.

विशेष अशा बांधकाम आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्‍ये समावेश आहे.

राजधानी काठमांडू येथे असलेल्या पशूपतीनाथ मंदिराला पूर्वी कांतिपूर या नावाने ओळखले जात होते.

मंदिर बागमती नदीवर आहे. सुंदर पर्वतांमध्ये मंदिरात हिंदू भाविकांव्यतिरिक्त जगभरातील पर्यटकही येतात. मात्र बिगर हिंदूंना मंदिरात प्रवेश नाही. ते बाहेरुनच पाहू शकतात.

पशूपतीनाथ मंदिर पाच मीटर उंच ओट्यावर बांधण्‍यात आले आहे. मं‍दिराचा बहुतेक भाग लाकडाचा असून एकूण चार दरवाजे आहेत. कळसावर सिंहाची प्रतिकृती आहे.

मुख्‍य मंदिरात रेड्याच्या रुपात भगवान शिवाचे दर्शनी भाग आहे. गाभा-यात पंचमुखी शिवल‍िंगाचे एक विग्रह आहे. स्कंदपुराणात या पशुपतीनाथ मंदिराचा उल्लेख आहे.

 

pashupatinath-inmarathi02
googleusercontent.com

पशुपतीनाथ मंदिराचा उल्लेख अनेक भारतीय पुराणात आढळतो. परंतु ते किती जुने आहे, त्याचे बांधकाम केव्हा झाले होते यासं‍बंधित माहिती मिळत नाही.

नेपाळमध्‍ये या मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. पशुनाथ मंदिराची स्थापना इसवी सन पूर्व तिस-या शतकता सोमदेव राजवंशचे पशुप्रेक्ष नावाच्या राजाने केले होते, अशी एक आख्‍यायिका आहे.

मात्र याबाबत काही ऐतिहासिक रेकॉर्डनुसार मंदिर १३ व्या शतकात बांधण्‍यात आले होते.

नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिराबद्द्दल एक कथा प्रचलित आहे. पुराणान‍ुसार पशुपतीनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे. या मंदिराचा संबंध भारतातील मंदिरांशीही आहे.

नेपाळ माहात्म्य आणि हिमखंडानुसार, भगवान शिव एकदा वाराणसी सोडून बागमती नदीच्या किना-यावरील मृगस्थळी गेले. येथे येऊन भगवान शिवने येथे येऊन एका चिंका-याचे रुप घेतले आणि दीर्घ निद्रिस्त झाले.

जेव्हा भगवान शिव वाराणसीत इतर देवतांना दिसले नाही, त्यांना ते बागमती नदीच्या काठावर दिसले. देवता त्यांना वाराणसी घेऊन जायचा प्रयत्न करतात.

पण चिंका-याचे रुप घेतलेले शिव बागमती नदीच्या दुस-या काठावर उडी घेतात. उडी मारताना त्यांच्या शिंगाचे चार तुकड्यांमध्‍ये तुटते.

असे म्हणतात, तेव्हाच भगवान पशुप‍ती चतुर्मुख लिंगाच्या रुपात प्रकट होते.

 

pashupatinath-inmarathi03
starsai.com

पशुपतीनाथ मंदिराशी संबंधित कथा चार हजार वर्षे जुन्या महाभारतातील कथेशी जोडली जाते.

त्यानुसार पांडव स्वर्गाकडे जाण्‍यासाठी हिमालयाकडे जातात, त्याचवेळी आताच्या उत्तराखंडाच्या केदारनाथ येथील भगवान शंकराने रेड्याचे रुप घेऊन पांडवांना दर्शन दिले.

दर्शनानंतर रेड्याचे रुपातील शिव जमिनीच्या आत जाऊ लागले. हे पाहून भीमाने त्यांचे शेपूट धरले. धार्मिक मान्यतेनुसार हेच ठिकाण केदारनाथ या नावाने प्रसिध्‍द झाले.

नेपाळमध्ये भूकंप झाला होता तेव्हा ह्या मंदिराचा काही भाग कोसळला होता पण सुदैवाने मंदिराची फारशी हानी झाली नाही. कधी नेपाळला जाण्याची संधी मिळाली तर पशुपतीनाथाचे दर्शन नक्की घ्या !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?