' मॉरीशसमध्ये भारतीय गुरुकुल, विद्यापीठ सुरु करण्याचा करार आणि काही आगळेवेगळे विक्रम! – InMarathi

मॉरीशसमध्ये भारतीय गुरुकुल, विद्यापीठ सुरु करण्याचा करार आणि काही आगळेवेगळे विक्रम!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बिडदी, बेंगळुरू येथे परमहंस श्री स्वामी नित्यानंद यांच्या नित्यानंद संघ आणि मॉरिशस सरकार यांच्यात MOU (memorandum of understanding) agreement झालं. त्यात नित्यानंद विद्यापीठ आणि नित्यानंद गुरुकुल यांचा extended कॅम्पस मॊरिशस मध्ये सुरु करण्याचा करार करण्यात आला. हा करार गुरु पौर्णिमा अर्थात ९ जुलै २०१७ रोजी करण्यात आला. यावेळी मॉरिशसचे भारतातील High Commissioner श्री जगदीश गोवर्धन हे उपस्थित होते!

photo-marathipizza01
यावेळी त्यांनी,

गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या गुरूंना भेटलो. मी सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

असे उदगार काढले!!
photo-marathipizza02

८ जुलै २०१७ रोजी २ आगळेवेगळे जागतिक विक्रम करण्यात आले. ३०० हुन अधिक व्यक्तींनी Remote Vision (बसल्या ठिकाणाहून दूरवर बघू शकणे), X Ray Vision, Blindfold Reading (डोळयांवर पट्टी बांधून वाचता येणे), Materialisation ( ऊर्जेचे घन अवस्थेत रूपांतरण करणे), Body Scanning अशा विविध शक्तींचे(!) प्रदर्शन करून उपस्थित असलेल्या लोकांना आणि मान्यवरांना आश्चर्यचकित केले!!! तसेच “मल्लखांब” एकाच वेळी १०८ व्यक्तींनी करून एक विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय योग दिवशी १०८ व्यक्तींनी शक्ती व्यक्त करून स्वत:चाच विक्रम गुरु पौर्णिमेला खंडित केला.

photo-marathipizza03
photo-marathipizza04

 

International Yoga Day अर्थात २१ जून २०१७ ह्यादिवशी घडलेला विक्रम बघण्यास पुढील मान्यवर उपस्थित होते –

India Book of Recordsच्या कोमल सिंग, रामानुज साम्राज्य सभेचे स्वामी गोविंद रामानुजर, पत्रकार आणि कलाकार मीना दास नारायण, विश्व हिंदू परिषदेचे श्री वेदांतम, BJP चे श्री प्रसाद, NIMHANS चे Reasearch Director मल्लिकार्जुन, BMS engeenering college चे मुख्याध्यापक मंजुनाथ, बजरंग सेनेचे नेते इत्यादी.
photo-marathipizza05

वर उल्लेख केलेल्या गुरुकुलात आणि विद्यापीठात भारतीय हिंदू शास्त्रे, योग यांचे ज्ञान विनामूल्य दिले जाते!

(टीप – परमहंस श्री स्वामी नित्यानंद हे महानिर्वाणी आखाड्याचे “महामंडलेश्वर” असून, नुकत्याच High Court of Madras ने दिलेल्या verdict नुसार स्वामी नित्यानंद हे दक्षिण भारतातील – श्री सोमनाथ स्वामी मंदिर आणि आदिनम, श्री अरुणाचल ज्ञानदेशीकर मंदिर, श्री शंकर स्वामी मठ, श्री पो का सथुकल, श्री पळसामी मठ ह्या मठांचे अधिपती आहेत.)

ज्या कोणा व्यक्तीला हिंदू तत्वज्ञानाविषयी जाणून घ्यायचे असेल किंवा त्याबद्दल संशोधन वा अभ्यास करायचा असेल तर, त्या व्यक्ती बिडदी आश्रमाला बिनदिक्कतपणे भेट देऊ शकतात.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?