तुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जिथे देश आपल्या ४० जवानांना गमावल्यानंतर अश्रू ढाळत आहे, तिथेच या गोष्टीवर राजकारण होताना दिसून येत आहे. हल्ल्यामध्ये गमावलेल्या जवानांना शहीद म्हटलं जातंय, पण सरकारतर्फे तो दर्जा त्यांना देण्यात येत नाही असे दिसत आहे.

खरंतर सीआरपीएफ बीएसएफ आयटीबीपी किंवा ज्या फोर्सला पॅरामिलीट्री फोर्सेस असं म्हटलं जातं यातील जवान जर कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावले तर त्यांना अधिकृतपणे शहीद दर्जा मिळत नाही.

चला जाणून घेऊ या देशांमध्ये कोणाला शहीद दर्जा मिळतो आणि कोणाला नाही.

भारतीय सैन्यात ज्यांना अधिकृतपणे शहिदांचा दर्जा दिला जातो, भारतीय भूदल वायुदल किंवा नौसेना मधील जवान जर कर्तव्य बजावताना मृत्यू पावले तर त्यांना शहीद दर्जा दिला जातो, या तीनही सेना रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतात.

 

indian-army-inmarathi
indianexpress.com

परमिलीटरी फोर्सेसमध्ये मात्र अशा प्रकारची कुठलीही सुविधा दिली जात नाही. कारण पॅरामिलीट्री गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. यामुळेच, सुरक्षे दरम्यान जीव गमावणाऱ्या जवानांना शहीद दर्जा दिला जात नाही.

बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बी एस एफ)

१९६५ दरम्यान झालेल्या इंडो पाकिस्तान युद्धानंतर बीएसएफची स्थापना झाली. या फोर्सकडे भारताच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

 

BSF-marathipizza
indianexpress.com

या सैन्यात अडीच लाखाहून ही जास्त सैनिक तैनात आहेत. बीएसएफ ला भारताची पहिली संरक्षण भिंत असंही म्हटलं जाते.

सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (सी आय एस एफ )

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे एक अर्धसैनिक दल आहे. याचे मुख्य कार्य सरकारी कारखाने तसेच इतर सरकारी उपक्रमांना सुरक्षा प्रदान करणे आहे.

 

cisf-inmrathi
english.kolkata24x7.com

या दलाची स्थापना १९६९ मध्ये करण्यात आली होती सीआयएसएफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगलाही सुरक्षा देण्याचे काम करते. सध्या तीनशे हूनही अधिक इंडस्ट्रीला सुरक्षा देण्याचे काम करत आहे. दीड लाख सैनिक या सुरक्षा दलाचा भाग आहेत.

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (सी आर पी एफ)

केंद्रीय रिजर्व पुलिस दल केंद्रातील सशस्त्र पोलीस दलामध्ये सर्वात मोठे पोलीस दल मानले जाते. या दलाची स्थापना २७ जुलै १९३९ रोजी करण्यात आली होती.

 

rediff.com

सीआरपीएफची प्रार्थमिक भूमिका राज्य आणि संघशासित प्रदेशांमध्ये पोलिसांना सहाय्य करणे तसेच न्याय आणि व्यवस्था सांभाळणे असे आहे.

नक्षल विरोधी कारवाई असो किंवा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न असो सीआरपीएफ नेहमीच तत्पर असते. बीएसएफ स्थापन होण्याच्या आधी सीआरपीएफ इंडिया पाकिस्तान बॉर्डरची सुरक्षा करत असे.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आय टी बी पी)

भारतीय तिबेट सीमा पोलीस भारतीय अर्धसैनिक दल आहे. या दलाला १९६२ मध्ये इंडिया चीन युद्धादरम्यान बनवण्यात आले होते. या दलाची निर्मिती सीआरपीएफ अॅक्टनुसारच करण्यात आलेली आहे.

 

itpf-inmarathi
thehindu.com

नॉर्दन बॉर्डरची देखरेख आयटीबीपी करत असते. इल्लीगल इम्मिग्रेशन, ट्रांस बॉर्डर स्मगलिंग इत्यादी गोष्टी रोखण्यासाठी हे दल तैनात करण्यात आलेले आहे.

सुरवातीला अगदी चारच पलटण या दलामध्ये समाविष्ट होत्या पण आत्ता अनेक विशेष पलटणी या दलामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत.

नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एन एस जी)

 

nsg-marathipizza
indiatvnews.com

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एनएसजी हे दल तयार करण्यात आले होते. या दलातील जवानांना ब्लॅक कॅट्स असेही संबोधित करण्यात येते. या दलाचा मुख्यत्वे वापर आतंकवादविरोधी कारवाईसाठी केला गेलेला आहे. या दलाची स्थापना १९८६ मध्ये करण्यात आली होती.

सशस्त्र सीमा बल (एसएसबी)

याची स्थापना १९६३ मध्ये करण्यात आले होती. एसएसबी एक अर्धसैनिक दल आहे. हे दल इंडो नेपाळ आणि इंडो भुटान बॉर्डरवर सुरक्षा करते.

 

ssbcrack.com

या सीमेतून होणाऱ्या हत्यारांची तस्करी रोखण्यासाठी या दलाचा वापर केला जातो. २०१४ नंतर या दलामध्ये महिलांचाही समावेश केला गेला.

स्पेशल फ्रोंटीयर फॉर्स (एस एफ एफ)

स्पेशल फ्रंटएअर फॉर्स ची स्थापना १४ नोव्हेंबर १९६२ रोजी करण्यात आली होती. हे एक विशेष अर्धसैनिक दल म्हणून ओळखले जाते.

 

ssf-inmarathi
Bhavanajagat.com

या दलाचे मुख्य कार्य चीनविरोधी संघर्षाची पूर्वतयारी करणे हे होय. या दलाला गनिमी कावा युद्धपद्धतीसाठी तयार करण्यात आलेले होते. हे दल म्हणजे राँ ची एक शाखा आहे.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस पी जी)

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांना सुरक्षा देण्यासाठी करण्यात आलेली आहे. हे दल म्हणजे एक रिंग राऊंड टीम आहे.

 

spg-inmarathi
india.com

अनेक अन्य पद्धतीनेही हे दल त्यांची सुरक्षा करत असते. एसपीजीची स्थापना १९८१ साली करण्यात आली होती. या दलाचे कार्य म्हणजे पंतप्रधान जिथे कुठे जातील तिथे त्यांना सुरक्षा प्रदान करणे होय.

शहिदांच्या दर्जामध्ये केल्या गेलेल्या भेदभाव असो किंवा पेन्शनमध्ये केलेला भेदभाव असो, ज्या सुविधा जवानांना दिल्या जातात त्या सुविधा पॅरामिलिटरीला दिल्या जात नाहीत.

सीमेवरती जर सैन्यातील जवानाला गोळी लागते तर बीएसएफच्या जवानाला ही गोळीच लागते, जीव तर त्याचाही जातोच की. सैन्य जिथे बाहेरील शत्रूंपासून देशाचे संरक्षण करतो तिथे सीआरपीएफ ही अंतर्गत सुरक्षेसाठी कर्तव्य दक्ष असते.

 

crpf-in-kashmir-inmarathi
jagran.com

पॅरामिलीट्रीमधील जवान जर नक्षली किंवा दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडला तर त्याला शहीदाचा दर्जा का दिला जात नाही?

शहीद जवानांच्या परिवाराला राज्य सरकार मध्ये नोकरी साठी आरक्षण दिले जाते, अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या मुलांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जातात पँरामिल्ट्रीला मात्र या सुविधा उपलब्ध नाहीत.

एवढेच नव्हे तर या मिलिटरीच्या जवानांना पेन्शनची सुविधाही मिळत नाही, जेव्हापासून सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्यात आली तेव्हापासून सीआरपीएफ आणि बीएसएफ च्या जवानांची पेन्शनही बंद करण्यात आलेली आहे.

सैन्य मात्र या बंधनात का येत नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळो एवढीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “तुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील!

 • February 16, 2019 at 3:16 pm
  Permalink

  खूप खूप धन्यवाद.अत्यंत छान लेख आहे.

  Reply
 • February 17, 2019 at 10:35 am
  Permalink

  सैनिकांना मिळणार्या सुविधा अर्धसैनिकास ही मिळायला पाहीजेत !
  कार्य वेगवेगळ्या पद्धतीचं असु शकतं पण उद्देश तर देशांची सुरक्षा हेच आहे !!

  Reply
 • February 17, 2019 at 10:56 am
  Permalink

  He ekdam khare ahe sir

  Reply
 • February 17, 2019 at 1:35 pm
  Permalink

  मग मिडिया ला हे माहिती असुनही मोठं मोठ्या हेडलाईन्स मध्ये शहीद शहीद शहीद लिहून त्यांच्या जखमांवर मीठ का लावतात.जर त्यांना सिव्हीलचा दर्जा आहे फॅसिलिटी आहे हे सत्य का लपवले जाते.ते सैनिक नसतानाही त्यांना सैनिक का बोलता.

  Reply
 • February 17, 2019 at 1:46 pm
  Permalink

  मग मिडिया ला हे माहिती असुनही मोठं मोठ्या हेडलाईन्स मध्ये शहीद शहीद शहीद लिहून त्यांच्या जखमांवर मीठ का लावतात.जर त्यांना सिव्हीलचा दर्जा आहे फॅसिलिटी आहे हे सत्य का लपवले जाते.ते सैनिक नसतानाही त्यांना सैनिक का बोलता.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?