येथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर..?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधता पाहण्यास मिळते. सोबतच या राज्यांमध्ये धार्मिक फरक देखील प्रकर्षाने आढळून येतो.

आपल्या जनमानसावर या धार्मिक गोष्टींचा इतका पगडा आहे की, आजही कित्येक भारतीय लोक जादू-टोणा, चमत्कार, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवतात. शेवटी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग. “या चमत्कारिक सुरस गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत की नाही?” यावर मात्र ठोस भाष्य करणं कठीण..!

“देव, ही मानसिक गरज आहे की नाही?” हा खरंतर एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. याबाबतीत प्रत्येकाची स्वतंत्र मतं असतात. निश्चितच, देव ही संकल्पना आपल्या निराश मनाला उभारी देणारी आहे. आता ही शक्ति खरी की खोटी हा वेगळा मुद्दा झाला.

काही लोक देवाचे अस्तित्व आहे, असे मानतात तर काही देवाचे अस्तित्व नाही आहे असे मानतात, पण कधी कधी आपल्या डोळ्यांना अश्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याला खरंच या जगात दैवी शक्ती आहे यावर विचार करण्यास भाग पाडतात.

 

monodomo.com

 

भारतीय स्थापत्यशास्त्र हा अभ्यासण्याचा विषय आहे. पूर्वीचे बांधकाम बघून आजही थक्क व्हायला होतं. संशोधक जुन्या संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी विशेषकरून जुन्या बांधकामांचा अभ्यास करतात. यातून, लुप्त संस्कृतींशी ओळख होते.

संशोधकांच्या आवडीचा विषय म्हणजे मंदिरं.. भारतात अनेक राजांनी कोट्यावधी रुपये खर्च करून या मंदिरांची उभारणी केली आहे. ही मंदिरं दिसण्यास विलोभनीय आहेतच, पण त्यांच्या स्थापत्यशास्त्रात काहीतरी वेगळेपणा आहे.

जर तुम्ही देखील चमत्कार वगैरे मानत नसाल तर आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही.

 

Pachmatha Mandir.Inmarathi
panoramio.com

 

मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये असलेले पचमठा मंदिर कितीतरी गोष्टींमध्ये वेगळे आहे. या मंदिरामध्ये कितीतरी देवी – देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. येथे राधाकृष्णाचा विशेष उत्सव देखील साजरा केला जातो, पण या मंदिराची सर्वात विशेष गोष्ट असलेल्या देवी लक्ष्मीच्या प्राचीन मूर्तीविषयी येथे एक विचित्र कथा प्रचलित आहे.

या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचे आणि तेथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, येथे स्थित असलेली ही मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते. काही लोक फक्त याचाच अनुभव घेण्यासाठी पचमठा मंदिरामध्ये येतात. दर्शन घेणाऱ्या भक्तांनुसार, सकाळी ही मूर्ती पांढरी, दुपारी पिवळी आणि संध्याकाळी निळ्या रंगाची होते.

 

Pachmatha Mandir.Inmarathi1
patrika.com

 

तंत्र साधनेचे केंद्र

देवी लक्ष्मीचे हे अद्भुत मंदिर गोंडवाना शासनमध्ये राणी दुर्गावतीचे विशेष सेवापती राहिलेले दिवान आधार सिंगच्या नावावर बनवलेल्या अधारताल तलावामध्ये बनवले गेले होते.

या मंदिरात अमावस्येच्या रात्री भक्तांची रांग लागते. पचमठा नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर एकेकाळी संपूर्ण देशातील तांत्रिकांसाठी साधनेचे विशेष केंद्र होते. असे देखील म्हटले जाते की, या मंदिराच्या चारही बाजूंना श्रीयंत्राची विशेष रचना करण्यात आलेली आहे.

११०० वर्षापूर्वी बनले होते मंदिर

मंदिराच्या पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे मंदिर जवळपास अकराशे वर्षाआधी तयार करण्यात आले आहे. मंदिराच्या आतील भागामध्ये लावण्यात आलेल्या श्रीयंत्राची विचित्र संरचनेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. त्याचबरोबर अजून एक खास गोष्ट या मंदिराविषयी प्रचलित आहे, जिच्यानुसार आजही सूर्याची पहिली किरण देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या चरणावर पडते.

 

Pachmatha Mandir.Inmarathi2
thehook.news

 

शुक्रवारचे विशेष महत्त्व

या मंदिरामध्ये दर शुक्रवारी खूप गर्दी असते. असे म्हटले जाते की, सात शुक्रवार इथे येऊन देवी लक्ष्मीचे दर्शन केले तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. मंदिराचे दरवाजे हे फक्त रात्री बंद केले जातात, फक्त दिवाळीमध्ये असे होते जेव्हा रात्री देखील हे दरवाजे बंद केले जात नाहीत.

असे हे पचमठा मंदिर खूपच अद्भुत आणि इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मध्यप्रदेशला फिरायला जाल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?