त्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मध्यंतरी मेक्सिकोचा प्रसिध्‍द अंमलीपदार्थांचा तस्कर अल चापोला तिस-यांदा तुरुंगातून पळून गेल्याची अफवा पसरली होती. मात्र हे खरे नव्हते. जवळजवळ दोन दशकापूर्वी जगभरात ड्रग लॉर्ड पाब्लो एमिलियो एस्कोबर गॅविरियाचे देखील असेच नाव घेतले जात होते.

तो जगातील सर्वात श्रीमंत व हिंसक ड्रम माफीया होता. त्याला २४ वर्षांपूर्वी एका चकमकीत मारण्‍यात आले होते.

 

Pablo-Escobar-marathipizza01
images.dailystar.co.uk

पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया एक कोलंबियन ड्रग माफीया होता. तो कोकिन या अंमलीपदार्थाचा व्यापार करत होता. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचे पुस्तक ‘ द अकाउंट्स स्टोरी’ नुसार, तो एका दिवशी १५ टन कोकिनची तस्करी करत होता.

१९८९ मध्‍ये फोर्ब्स मासिकाने एस्कोबारला जगातील ७ वा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान दिला होता.

त्याची खासगी अंदाजित संपत्ती ३० अब्ज डॉलर इतकी होती. त्याच्याकडे अनेक लक्झरी बंगले व गाड्या होत्या.

 

Pablo-Escobar-marathipizza02
businessinsider.com

पाब्लोचा भाऊ रॉबर्टोच्या म्हणण्यानुसार, पाब्लोचा वार्षिक नफा २६ हजार ९८८ कोटी रुपये इतका होता. त्यावेळी गोदामात ठेवलेल्या या रक्कमेतील १० टक्के भाग उंदरांनी खाल्ले होते.

पाणी किंवा इतर कारणांमुळे काही रक्कम तर अशीच कुजून जात होती.

रॉबर्टोनुसार, तो १ लाख ६७ हजार प्रत्येक महिन्याला नोटांचे बंडल बांधण्‍यासाठी रबर बँडवर खर्च करत होता.

१९८६ मध्‍ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात शिरकाव करण्‍याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने देशाला ५.४ अब्जांचे राष्‍ट्रीय कर्ज देण्‍याची इच्छा व्यक्त केली होती.

 

Pablo-Escobar-marathipizza03
qph.ec.quoracdn.net

१९७ मध्‍ये २६ व्या वर्षी पाब्लोने १५ वर्षांच्या मारिया व्हि‍क्टोरियाशी विवाह केला. त्यांना जुआन व मॅन्युएला असे दोन मुले झाली होती.

एस्कोबारने ५ हजार एकरात पसरलेले हैसियेंदा नॅपोलेस नावाचे एक आलिशान इस्टेट तयार केले होते. त्याचे कुटुंब यात राहत होते.

यासोबतच त्याने ग्रीक पध्‍दतीचा एक किल्ला बांधण्‍याचा संकल्प देखील केला होता.  किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले होते.

मात्र त्याचे काम कधीच पूर्ण झाले नाही.

त्याची शेती, प्राणीसंग्रहालय आणि किल्ल्याला सरकारने आपल्या ताब्यात घेतले व १९९० मध्‍ये एक कायदा करुन सामान्य लोकांना राहण्‍यासाठी देऊन टाकले.

ही मालमत्ता आता एका थीम पार्कच्या रुपात पाहायला मिळते.

 

https://www.inmarathi.com/wp-content/uploads/2017/10/Pablo-Escobar-marathipizza04.jpg
awesomestories.com

पाब्लोची संपूर्ण कथा चित्ररुपात पहायची असल्यास ‘नार्कोज’ ही टीव्ही सिरीज नक्की पहा! 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?