आपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रशिया मधील ओयीमायाकोन (Oymyakon) हे गाव जगातील सर्वात थंड गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव Pole Of Cold म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारण देखील तसचं आहे, पहिलं कारण म्हणजे या गावापासून आर्टिक्ट हिमखंड अगदी काहीच मैलांच्या अंतरावर आहे आणि दुसर कारण म्हणजे हिवाळ्यात या गावाचं सरासरी तापमान  उणे ५८ अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. फेब्रुवारी २०१३ मध्ये या गावाचं तापमान तब्बल उणे ७१ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलं होत आणि आजवरचे सर्वात निच्चांकी (lowest) तापमान म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. हिवाळ्यात ओयीमायाकोन गावामध्ये सूर्याचं दर्शन तसं दुर्मिळचं! दिवसभर सगळीकडे केवळ काळाकुकट्ट अंधार पहायला मिळतो.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza01

स्रोत

आपल्याकडे १० अंशाच्या खाली तापमान गेलं की आपले दात वाजायला लागतात, मग या गावात संपूर्ण शरीर गोठवणाऱ्या थंडीत मनुष्य राहूच कसा शकतो, हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. पण आता येथील लोकांना याची सवयच पडली आहे. प्रत्येक नवा दिवस त्यांच्यासाठी नव्या समस्या घेऊन येतो परंतु न डगमगता ते प्रत्येक दिवस हसत हसत घालवतात हे विशेष!

oymyakon-coldest-village-earth-marathipizza02

स्रोत

या गावात राहणे तसे एक प्रकारचे दिव्यच आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ५०० इतकीच ! गावात फक्त दोनच दुकाने आहेत एक म्हणजे दैनंदिन गोष्टी पुरवणारं किराणा मालाचं दुकान आणि दुसरं म्हणजे पेट्रोल पंप !! कमी तापमानामुळे विजेची समस्या तर रोजचीच आहे. येथे जेवढ्या लोकांकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या ठेवण्यासाठी खास प्रकारचं heated garage तयार केलं आहे, कारण अतिशय कमी तापमानामुळे गाडीचं इंजिन आणि बॅटरी गोठून निकामी होऊन जातं. जर गाडी बाहेरच पार्क केली असेल तर मात्र ती सतत सुरु ठेवण्यावाचून पर्याय नसतो.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza03

स्रोत

काहीबाही शक्कल लढवून घर सतत गरम ठेवणं भाग असतं, नाहीतर अख्ख घर गोठतं.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza04

स्रोत

जर कोणी व्यक्ती मेला तर त्याला काही दिवसांनंतर पुरले जाते. कारण ज्या ठिकाणी त्याला दफन करायचे असते ती जागा सहज खोदता येत नाही त्यासाठी जवळपास ३-४ दिवस त्या जागी मोठी आग करून बर्फ वितळायला लागतो. तेव्हा कुठे कबर खोदून मेलेल्या माणसावर अंत्यविधी केला जातो.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza05

स्रोत

येथे शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इकडचं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं. या लोकांचा मुख्य आहार आहे रेनडियरचं अथवा घोड्याचं मांस, मासे आणि पाळीव जनावरांकडून मिळणार दुध ! मासे पकडण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घातल्यावर जेवणाची सोय होते. काही लोकांचा मासेमारी हा मुख्य धंदा आहे, गोठवणाऱ्या तापमानात दिवसभर बाहेर राहून मासे विकण म्हणजे जीवावर बेतणारचं काम!

oymyakon-coldest-village-earth-marathipizza06

स्रोत

प्राण्यांच्या कातडीपासून आणि लोकरीपासून बनणारं स्वेटर दिवसाचे २४ तास अंगावर चढवलेले हवे, तेव्हा कुठे शरीर गरम राहतं. रेनडियरच्या कातडीपासून बनलेले बूट येथे फारच प्रसिद्ध आहेत.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza07

स्रोत

उन्हाळ्यात मात्र याच ओयीमायाकोन गावाचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. उन्हाळ्यात येथील तापमान सरासरी  उणे १० अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. ट्रेकिंग आणि टुरिस्ट डेस्टिनेश म्हणून सध्या या प्रदेशाचा नावलौकिक वाढतो आहे.

oymyakon-coldest-village-earth-marathipizza08

स्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?