“मैथुनातील उत्कट आनंद” : सत्य की फसवा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मैथुन, हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याची ही नैसर्गिक पद्धत आहे. दुसरं म्हणजे शरीराची गरज म्हणून –

 इतर प्राण्यांप्रमाणे माणसाला नैसर्गिकरित्या “ती” इच्छा होत असतेच.

त्यामागे पुनरुत्पादनाची नैसर्गिक प्रेरणा देखील आहे.

शिवाय बॉसची कटकट, फ्युचरचं टेन्शन, अपेक्षा भंगाचं दुःख अश्या अनेक दैनंदिन अडचणींत एक स्ट्रेस बस्टर म्हणून माणसाच्या जीवनात मैथुन प्रचंड महत्वाचं आहेच.

 

sexual-pleasure-inmarathi
hindustantimes.com

पण ही नैसर्गिक इच्छा, मैथुनचा मनुष्याच्या दैनंदिन तणावावरील औषधाचा रोल – हे सर्व माणसाने कृत्रिमरीत्या फार जास्त महत्वपूर्ण करून ठेवलं आहे. एस इ एक्स हा विषय मला फार मोठी कॉन्स्पिरसी वाटत आला आहे. ही कॉन्स्पिरसी माणसानेच स्वतःविरुद्ध रचली आहे.

मनुष्याने मैथुनाला, त्यातून मिळणाऱ्या सुखाला नको तेवढं महत्व दिलं आहे. हे महत्व का दिलं गेलंय आणि त्यामुळे आपलं कसं नुकसान होत आहे – ह्याचा हा उहापोह.

कुठलीही तीव्र शारीरिक/मानसिक इच्छा भागवल्याने मिळणारा आनंद सुखावह असतो.

उन्हातान्हात खेळून, दमून घरी आल्यावर माठातलं थंडगार पाणी घश्यात ओतल्यावर मिळणारं सुख…

जबरदस्त भूक लागलेली असताना आपल्याला भयंकर आवडणाऱ्या पदार्थावर ताव मारताना मिळणारा स्वर्गीय आनंद…

खूप परिश्रमाने भाषणाची तयारी केलेली असताना – आपल्याला हव्या त्या “पंच”वर प्रेक्षकांची हवी तशी किंवा त्याहूनही अधिक जोरदार दाद दिल्यावर फुलून येणारी छाती…


मनापासून आवडणाऱ्या गाण्यावर पूर्ण तयारीनिशी स्टेज वर परफॉर्म करताना चढणारी अवर्णनीय झिंग

— अश्या कित्येक मार्गांतून मिळणारं शारीरिक आणि मानसिक सुख माणसाला हवंहवंसं वाटत असतं.

पण मैथुनातून मिळणारं सुख ह्या सर्वांपेक्षा जास्त आकर्षक आहे, असं नेहेमीच भासवलं जातं. जे फारसं खरं नाही.

 

sex-freuency-inmarathi
evanmarckatz.com

‘प्राण जाय पर शान ना जाय’ ह्या चित्रपटात एक सीन आहे.

दिवसभर राबराब राबणारी मोलकरीण रात्री नवऱ्याशी बोलतीये. तो दारू ढोसत बसलाय. ती तिच्या अडचणी, विवंचना व्यक्त करणार – एवढ्यात नवरा ओरडतो – आत्ता मूड खराब करू नकोस, झोपताना बोलू.

पुढच्या सीनमध्ये उताणी पडलेली मोलकरीण तिचं गाऱ्हाणं मांडत रहाते…आणि हा मर्द आपलं काम करत रहातो. तिचं बोलणं सुरूच असतं, ह्याचं काम संपतं, हा दारूच्या नशेत धुंद तसाच तिच्या अंगावर लवंडतो.


हा सीन कर्तुत्वशून्य लोकांच्या – विशेषतः पुरूषांच्या – सेक्सबद्दलच्या हव्यासाचा आरसा आहे.

प्रत्येक माणूस कर्तृत्व गाजवण्याचं सुख अनुभवू शकत नाही. स्टेजवर दिलेल्या भाषणातून, केलेल्या नाचातुन मिळणारं adrenaline rush मिळवू शकत नाही. प्रत्येक माणूस स्पोर्टसमन असू शकत नाही.

त्यामुळे “Living in the moment” चा, “I am the King” चा कैफ प्रत्येकाला चढण्याचे पर्याय कमी असतात.

त्या adrenaline rush सदृश आनंद मिळवण्याचा सर्वात सोपा, सहज मार्ग म्हणून हस्तमैथुन किंवा मैथुनाकडे मनुष्य आकर्षित होतो.

ही मानसिकता पराकोटीच्या अपयशी आणि कर्तुत्वशून्य मनुष्याच्या बाबतीत अधिक तीव्र होते.

प्राण जाय…मधल्या नवऱ्याने आपल्या बायकोवर केलेला अत्याचार – हे विकृत वृत्तीचं पहिलं चरण आहे.

स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची हाव जेव्हा विकृतीच्या पुढच्या टप्प्यावर जाते – तेव्हा बलात्कार घडतात.

बहुतांश वेळा बलात्कार घडतात ते शारीरिक सुखाच्या आशेने नव्हे – तर मालकी, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी. त्या स्त्रीला “नीच” सिद्ध करण्यासाठी. अश्यावेळी ती स्त्री “शिकार” असते.


 

rape-marathipizza

 

अर्थात, ही झाली अपयशी मनुष्याची कथा. पण हायली मोटिव्हेटेड, प्रचंड यशस्वी लोकसुद्धा ह्या मानसिकतेत अडकलेले असतातच.

माझ्या सर्वात आवडत्या टीव्ही सिरीज पैकी एक – हाऊस ऑफ कार्ड्समध्ये, त्या सिरीजच्या हिरो-कम-व्हिलन चा एक डायलॉग आहे. (खरंतर हे ऑस्कर वाईल्ड चं फार प्रसिद्ध वाक्य आहे.) –

Everything in the world is about sex, EXCEPT SEX!

सगळं जग सेक्सच्या भुकेपोटी धावत आहे – पण सेक्सची भूक सेक्समुळे नाहीये!

मग कश्यासाठी आहे?


Sex is about Power.

स्वतःला स्वतःसमोरच शक्तिशाली सिद्ध करण्यासाठी. मी पावरफुल आहे – हे स्वतःला पटवण्याची ही भूक आहे.

ही भूकसुद्धा मनुष्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलीच असते. असं म्हणतात की खूप चपळ, चुणचुणीत, active असणाऱ्या लोकांची सेक्स लाईफ चांगली असते. सकस, आनंददायी सेक्स लाईफ – मनुष्याला ऊर्जा देते.

पण – त्याच्या उलट — उत्तम सेक्स लाईफ असणारे लोक अधिक आनंदी असतात — असाही अनेक अभ्यासांचा निष्कर्ष आहे. अनेकांच्या बाबतीत सेक्स लाईफ समाधानकारक नसेल तर त्यांचं जीवन डिस्टर्ब होतं.

हा निष्कर्ष हेच दाखवतो की self validation कमी पडलं तर लोक चिडचिडे, दुःखी, कमी active होतात – इथेच आपण सेक्सला दिलेलं अवाजवी महत्व अधोरेखित होतं.

एक छोटीशी मानसिक गरज भागत नाहीये म्हणून आपलं जीवन डिस्टर्ब होणं अत्यंत चूक आहे. त्याने आपलंच नुकसान होतं.


 

Sex is Overrated-2-marathipizza
Spike Jordan । http://csceagle.com

अल्फा मेलने आपली मर्दुमकी गाजवण्यासाठी (किंवा स्त्रीने सुद्धा…! आजकाल “वर्चस्व” गाजवण्याची महत्वाकांक्षा फक्त पुरुषांनाच नसते!) सेक्सचा आनंद लुटणं ठीक आहे. पण ते फोर्सफुली करणं विकृती आहे.

त्याच प्रकारे, हे हवंतसं घडत नाहीये म्हणून सैरभैर होऊन आपलं जीवन उद्धवस्त करू नये. ‘मैथुन स्ट्रेस बस्टर’ आहे हे जितकं खरं आहे, तितकंच “फक्त मैथुन हाच” एक स्ट्रेस बस्टर नाहीये — हे ही खरं आहे.

हे स्त्रियांसाठी तर अधिकच महत्वाचं आहे.

अनेक गृहिणी स्त्रियांचे पती सतत बिझनेस/जॉब च्या टेन्शनमध्ये असतात, सतत फिरती वर असतात. त्यांना पुरेशी आनंददायी सेक्स लाईफ एन्जॉय करता येत नाही.

मग त्यांची चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन येतं, रिकामं रिकामं वाटायला लागतं.


वाचन, संगीत, नृत्य, मैदानी खेळ, चित्रपट-नाटक ह्या गोष्टींचा आनंद घेण्याने माणूस ताणतणावापासुन मुक्त होऊ शकतो. आणखी पुढचं पाऊल टाकून – स्वतः लेखन सुरू केलं, गाणं-वाद्य-नृत्य शिकायचा प्रयत्न केला, मैदानी खेळ / जिम लावला…तर अधिक चांगला परिणाम साधला जातो.

ह्या संपूर्ण लेखात मैथुनाला पूर्णपणे “नकारात्मक” चितारलं आहे असं वाटू शकतं. त्यामुळे पहिल्याच परिच्छेदात जे लिहिलं आहे ते परत नमूद करायला हवं.

सेक्स ही “वाईट गोष्ट” अजिबात नाही. उलट मनुष्याच्या इतर शारीरिक आणि मानसिक गरजांप्रमाणेच ती एक महत्वपूर्ण गरज आहे. इथे मांडलेला विषय “सेक्स वाईट आहे” असा नसून “संपूर्ण मानवजातीने सेक्सला अवाजवी महत्व दिल्याने निर्माण होणाऱ्या समस्या” असा आहे.

 

sex-education-marathipizza03
indiatimes.com

हवी तशी सेक्स लाईफ नाहीये, म्हणून दैनंदिन ताण-तणाव वाढत असतील तर ते अत्यंत चूक आहे. तसंच – केवळ त्या काही क्षणांमध्ये किंगली फिलिंग येते म्हणून त्यातच अडकून खरं कर्तृत्व गाजवण्याच्या फंदातच नं पडणं आत्मघातकी आहे.

सेल्फ इस्टिम बूस्ट करण्यासाठी कित्येक आव्हानात्मक कामं करता येतात – ज्यातून आपला व आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा उत्कर्ष होतो.

रेल्वेप्लॅटफॉर्म वर, ब्रिज चढताना एखाद्या आजी-आजोबांना त्यांचं ओझं रिक्षा स्टँड पर्यंत नेण्यात मदत केली तर I am King वाटणार नाही, पण “I am SOMETHING.” हा विश्वास नक्कीच मिळेल.


कर्तृत्व त्याला म्हणतात. दारूच्या नशेत बायकोवर बलात्कार करण्यात कर्तृत्व नसतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 214 posts and counting.See all posts by omkar

4 thoughts on ““मैथुनातील उत्कट आनंद” : सत्य की फसवा?

 • June 17, 2017 at 12:09 am
  Permalink

  लेखकाला ज्यावेळी हवे तेव्हा हे सुख मिळत राहो ही सदिच्छा.

  Reply
 • March 12, 2018 at 10:04 am
  Permalink

  its true very nice article

  Reply
 • March 18, 2018 at 11:44 pm
  Permalink

  सेक्स हेच जीवन आहे. असे समजून चालणारी किती तरी विघातक माणसे आज जगात आहेत.

  Reply
 • November 27, 2018 at 1:08 am
  Permalink

  Sex is part of daily routine after marriage or before marriage. But everyone will have to know of how to express /represent himself ?

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?