एक असा देश जिथे महिला पुरुषांना गुलामासारखं वागवतात !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पूर्वीसारखी गुलामगिरी आता जगात कोठेच उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात सर्वांना आपले कर्तुत्व दाखवण्याच्या समान संधी मिळत आहेत. पण मंडळी आज या समानतेच्या जगात एक ठिकाण असेही आहे जेथे स्त्रिया पुरुषांना गुलामासारख वागवतात. काय म्हणता…? असे होणे शक्य नाही. चला तर आज ह्या आधुनिक जगतातील गुलामगिरी बद्दल जाणून घ्याच!

owk-marathipizza01
hastingsonlinetimes.co.uk

हे ठिकाण म्हणजे एक छोटेखानी देश म्हणूनच ओळखला जातो. या देशाचे नाव आहे- ‘अदर वर्ल्ड किंगडम’! जेथे केवळ महिलाराज चालतो.

१९९६ साली चेक रिपब्लिक या युरोपीय देशापासून वेगळ होत या देशाने स्वत:चा वेगळा संसार थाटला. या देशाची राणी पॅट्रिसिया-1 आहे. तिचा येथे एकछत्री अंमल आहे. या देशाला इतर राष्ट्रांनी देशाचा दर्जा दिलेला नसला तरी या देशाची राजधानी आहे, तिचे नाव आहे ब्लॅक सिटी.

owk-marathipizza02
4.bp.blogspot.com

चेक रिपब्लिकमधील या देशाची स्वतंत्र ओळख आहे. त्यांचा स्वतःचा झेंडा, चलन, पासपोर्ट आणि पोलिस फोर्स आहे. येथील मुळ निवासी या महिलाच आहेत. येथे पुरुषांना जनावरांप्रमाणे वागवले जाते. पुरुषांना येथे गुलामापेक्षा जास्त महत्त्व दिले जात नाही. या देशाच्या निर्मीतीमध्ये २ मिलिअन डॉलर म्हणजे तब्बल १२ कोटी रुपये खर्च झाले होते.

owk-marathipizza03
toptenz.net

या आगळ्यावेगळ्या देशात दुसर्‍या देशातून आलेल्या पुरुषांना राणीसाठी खुर्ची बनावे लागते. त्यांच्यावर राणी विराजमान होते. येथील गुलामांना दारू प्यायची असेल तर ती त्याच्या मालकिनीच्या पायावर टाकली जाते आणि मग त्याला मिळते. महाराणी पॅट्रिसिया -1 हिलाच देशाच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. तिने या देशाचे नागरिकत्व हवे असलेल्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत.

owk-marathipizza04
wikimedia.org (देशाचा ध्वज)

या नियमांनुसार, अशी कोणतीही महिला जी स्वतःच्या संमतीने संबंध ठेवण्याची पात्रता ठेवते. तसेच तिचे किमान १८ वर्षे वय पूर्ण असावे. तिच्याकडे स्वतःचा एक तरी पुरुष गुलाम असला पाहिजे. अदर वर्ल्ड किंगडमच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. महिलेला कमीत कमी पाच दिवस महाराणीच्या महालात राहावे लागेल.

owk-marathipizza05
ajabgjab.com (देशाचे चलन)

या देशाचे क्षेत्रफळ तीन हेक्टर म्हणजे साधारण ७.४ एकर इतके असून या देशात अनेक इमारती आहेत. २५० मीटरचे ओव्हल ट्रॅक, लहानसे तळे आणि मैदान आहे. येथील मुख्य इमारत म्हणजे महाराणीचा महाल. येथूनच संपूर्ण देशाचे प्रशासन चालते. या महालात भोजनाचा मोठा हॉल, ग्रंथालय, दरबार, यातनागृह (जेथे गुलामांचा छळ केला जातो ती जागा), शाळा, जिम आणि कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंग, अंधार कोठडी आहे. त्याशिवाय स्विंमीग पूल, रेस्टॉरंट आणि नाइट क्लब देखील आहे.

owk-marathipizza06
googleapis.com

काय? कधी विचार केला होता का, की असंही काहीतरी अस्तित्वात असले म्हणून…?

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?