‘व्हर्जिन’ शब्दाचा जन्म नक्की कसा झाला? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

व्हर्जिन हा शब्द आता काही नवीन नाही किंवा त्यात आश्चर्य वाटण्यासारखं देखील काहीच उरलेलं नाही कारण आता जमाना बदलला आहे. त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता आणि कोणतीही गोष्ट ऐकून समजून घेण्याची पद्धत वाढीस लागली आहे!!

त्यामुळे एकेकाळी टॅबू मानले जाणारे विषय जसे की व्हर्जिनीटी, सेक्स, प्रेफरन्स अशा सगळ्या गोष्टींवर अगदी खुलेपणे भाष्य केले जाते आणि ते झाले पाहिजेच!

 

virginity inmarathi
bustle

 

कारण या गोष्टींकडे वाईट पद्धतीने न बघता त्याकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघण गरजेच आहे, आणि जर यावर भाष्य नाही केले तर तरुण पिढीत किंवा आजकालच्या शाळकरी मुलांमध्ये प्रचंड गैरसमज पसरायची दाट शक्यता आहे!

त्यामुळे या विषयावर शाळेत किंवा मित्रांमध्ये किंवा कुटुंबात मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे!

तरच त्याचा काहीतरी फायदा होईल नाहीतर पुन्हा तो विषय टॅबू किंवा वाईट गोष्ट याच नजरेतून बघतील!

सध्याच्या काळात व्हर्जिनीटी किंवा कौमार्य गमावणे ही खूप सामान्य आणि क्षुल्लक गोष्ट मानली जाते, फार पूर्वी त्या गोष्टीला खूप महत्व असायचे! आजही कित्येक गावात स्त्रीयांच्या कौमार्य चाचण्या केल्या जातात! पण बऱ्याचशा शहरी भागात ही एक खूप कॉमन गोष्ट आहे याच नजरेतून बघितले जाते!

कॉलेज पासून ते ऑफिसच्या कॅन्टिन पर्यंत, जर आपल्यातील कुठली व्यक्ती ही लग्न झालेली नसेल तर तिला एक प्रश्न हा हमखास विचारला जातो. आणि तो म्हणजे, “तू व्हर्जिन आहे का?”

 

virgin meaning-inmarathi
Youtube.com

 

आणि जर एखादी व्यक्ति व्हर्जिन असेल तर तिची तेर खेचणे किंवा तिला डीवचणे चालू होते, हे सगळं आपल्या आजूबाजूला सुरू असतं! त्यातून निर्माण होणारे वाद, कलह, अबोला तसेच न्यूनगंड ही देखील आपल्याला ठाऊक असतात!

तरीही आपण टी गोष्टीकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीची आणखीन कशी जिरवता येईल याकडे आपला कल जास्त असतो!

 

college fun inmarathi
time of india

 

व्हर्जिन असणे म्हणजे पवित्र असणे, व्हर्जिन असणे म्हणजे सुशील संस्कारी असणे अशा सर्व व्याख्या आपल्याला माहीत आहेत.

पण तुम्ही विचार केला आहे का, की हा वर्जिन शब्द आला कुठून असेल? सेक्स न केलेल्या व्यक्तीलाच वर्जिन असे का म्हटले जात असेल?

याची सुरवात कधीपासून झाली असेल?

व्हर्जिन ह्या शब्दाचा शाब्दिक अर्थ पवित्र असा होतो. म्हणजे अगदी शुद्ध, पवित्र, पावन. इंग्रजी भाषेत हा शब्द पाहिल्यांदा १२०० साली ऐकण्यात आला. कॅम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजच्या मॅन्यस्क्रीप्ट मध्ये uirgines हा शब्द लिहिण्यात आला आहे.

Martirs and confessors and uirgines maked faier bode inne to women.

ह्या uirgines ला नंतर virgin म्हटले जाऊ लागले. ह्याव्यतिरिक्त वर्जिन ह्या शब्दाचा उल्लेख हा जास्तकरून ख्रिस्ती धर्माशी जुळलेला आहे. चर्चच्या फादरच्या लिखाणात वर्जिन शब्द आढळला.

ह्या व्यतिरिक्त वर्जिन शब्दाचा संबंध हा एखादि तरुण मुलगी ही धार्मिक मान्यतांनुसार पात्र आहे की नाही ह्या अर्थाने देखील घेतला जातो. म्हणजे जर कुठल्या मुलीला चर्चमध्ये यायचं आहे, तर ह्यासाठीच्या तिच्या पवित्रतेला वर्जिनीटी म्हटले जाते. ऑक्सफोर्ड डिक्शनरीत वर्जिन ह्या शब्दाच्या १८ परिभाषा आहे.

ही कहाणी चौथ्या-पाचव्या शतकातील असेल. तेव्हा एक राजकन्या होती अरसुला नावाची. ज्यांना आज संत अरसुला म्हणून ओळखले जाते.

अरसुला हिचे पिता ब्रिटनच्या एका भागाचे राजा होते. अरसुला हिने पित्याच्या म्हणण्यावर लग्न केले. आणि आपल्या पतीला भेटण्याकरिता ११ हजार वर्जिन हेल्पर्स सोबत जहाजाने त्याच्या दिशेने निघाली.

 

Ursula-inmarathi
1.bp.blogspot.com

 

पावसादरम्यान अचानक वादळ आले. तेव्हा अरसुलाने निश्चय केला की, मी आधी पोपला भेटून नंतर आपल्या पतीला भेटायला जाईन. पण त्यांना वाटेत हंस मिळाले.

हंस म्हणजे ते पक्षी हंस नाही. तर वेस्टर्न युरोपमध्ये राहणारा घुमंतू समूह. ह्या हंस लोकांनी अरसुला सोबतच त्या ११ हजार व्हर्जिन सेविकांची हत्या केली.

त्यामुळेच क्रिस्टोफर कोलंबस ने अमेरिकेच्या तिथल्या आयलंडचे नाव व्हर्जिन आयलंड असे ठेवले.

व्हर्जिन म्हणजेच पवित्र, शुद्ध. म्हणून सेक्स न केलेल्या व्यक्तीला व्हर्जिन म्हटले  जाते, म्हणजेच त्या व्यक्तीला पवित्र समजले जाते. अर्थात यात काहीच गैर नाही किंवा तुम्ही चुकीचे आहात असाही यामागचा उद्देश नाही!

सध्याच्या जमान्यात व्हर्जिन नसणं म्हणजेच आयुष्याची मजा घेणं ही जी व्याख्या बनली आहे ती सपशेल चुकीची आहे, कारण व्हर्जिन राहणं किंवा न राहणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे!

त्यामुळे या एका गोष्टीवरून समोरच्याला कमी लेखणं किंवा समोरच्या व्यक्तीची सतत टिंगल टवाळी करणं ही देखील योग्य नाही कारण हा पर्याय निवडायचा का नाही हे  व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?