' ४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण ! – InMarathi

४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

साधारण एक महिन्यापूर्वी – २४ जानेवारी रोजी Opportunity Rover ने मंगळावरील  आयुष्याचे १२ वर्ष पूर्ण केले.

खरं तर २००४ ला जेव्हा Opportunity Rover ने मंगळावर land केलं तेव्हा तो फक्त ४ महिने काम करेल असं planning होतं. परंतु ह्या robot ने सगळ्यांना आश्चर्यचकित करत मंगळावर चक्क १२ वर्ष यशस्वी पूर्ण केले आहेत.

जास्त काळ मंगळावर राहिल्यामुळे Opportunity Rover ने त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कामापेक्षा खूप जास्त प्रमाणात काम केलंय.

 

Opportunity-Marathi Pizza

Robot ला कार्यरत ठेवणं आणि त्याच्याकडून काम करून घेणं एक अत्यंत कठीण कार्य होतं. कारण मंगळ आणि पृथ्वी मधील प्रचंड अंतर बघता इथे बसून ह्या Robots ला control करणं ही एक कठीण गोष्ट आहे.

Opportunity च्या batteries सूर्यप्रकाशावर चालतात. मंगळावर थंडीचं वातावरण – गडद धुकं, अंधुक सूर्यप्रकाश – खूप दिवस असतं. त्यामुळे मंगळाच्या थंड वातावरणात एवढी वर्ष व्यवस्थीत charge होतायेत आणि अविरत काम करत आहेत ह्याबद्दल शास्त्रज्ञ प्रचंड खुश आहेत.

आश्चर्य म्हणजे हे solar panels तिथल्या वादळाने स्वच्छ होताहेत — ज्यामुळे त्या अजूनही दररोज ४६० watt-hours एवढी energy निर्माण करत आहेत.

opportunity-rover1-Marathi Pizza

 

Opportunity ने मंगळावर 26.5 miles एवढा प्रवास पूर्ण केला आहे. हा एक record आहे – आतापर्यंत कोणत्याच robot ने एवढा प्रवास कोणत्याच ग्रहावर केला नाहीये.

Opportunity चे ५ wheels अजूनही व्यवस्थित आहेत त्यामुळे Nasa ला विश्वास आहे कि तो मंगळावर असेलेली “Marathon Valley” या  वर्षी पूर्ण explore करेल.

कधी कधी मनुष्याने निर्माण केलेल्या गोष्टी त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा कितीतरी जास्त काम करतात आणि अविष्कार घडतात, हा Space Robot पण असाच एक अविष्कार आहे.

मानवी कर्तुत्व असंच वृद्धिंगत होत राहो…!

Image source: zmescience

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?