' लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारं ह्या फोनचं ‘एक्स रे’ फीचर ठरतंय धोकादायक! – InMarathi

लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारं ह्या फोनचं ‘एक्स रे’ फीचर ठरतंय धोकादायक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फोटो काढणं हे कुठल्याही माणसाला आवडतंच. सध्यातरी मोबाईल मुळे वेगळा कॅमेराही घेऊन जाण्याची गरज नाही. आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचे फोटो लगेच काढू शकतो.

या डिजिटल क्रांतीमुळे माणसाचं जीवन अगदीच सुसह्य झालेलं आहे.अगदी फोटो काढण्याच्या तंत्रज्ञानातही बदल झाला आहे. माणसाला पहिल्यांदा फोटो काढता आला तेंव्हा त्याचं खूप अप्रूप होतं.

जुन्या काळातले पाहायचं झालं तर फोटो काढणं ही एक प्रोसेस असायची. फोटो काढणार्‍या व्यक्तीला प्रचंड मान दिला जायचा.

 

old photographers inmarathi

 

हळूहळू कॅमेरा लेंसेस यांच्यामध्ये सुधारणा होत गेली तसं फोटो काढायचं टेक्निकही बदलत गेलं.

सध्या नवीन प्रकारचे एस एल आर ,डीएस्एल्आर टेक्नॉलॉजीचे नवीन कॅमेरे आले आहेत.

त्यांच्या फोटोची क्लॅरिटी खूप असते पण तरीही तो कॅमेरा जवळ बाळगणे, फोटो काढायच्या वेळेस लेन्सेस बदलणे इत्यादी गोष्टी करणे भाग पडते.

या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्याच्या सुरक्षेसाठी नाजूकपणे, हळूवारपणे हाताळावी लागतात.

टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की आता,’ कर लो दुनिया मुठ्ठी में ‘ परिस्थिती आली आहे. एकविसाव्या शतकात मोबाईल फोन मध्ये जी क्रांती झाली आहे त्यामुळे सर्व सामान्य माणूस देखील आता मोबाईल फोन वापरतो.

मोबाईल कडे माणूस आकर्षिला जायचा आणखीन एक कारण म्हणजे त्यात असलेलं फोटो काढायचं फीचर. मोबाईल मधून अनेक फोटो सुद्धा काढता येतात.

त्यासाठी वेगळा कॅमेरा घ्यायची गरज नाही. मोबाईल मधलं कॅमेरा सेटिंग आता खूप अद्ययावत होत आहे. आपल्याला कशाप्रकारचे फोटो काढायचे आहेत तशा प्रकारचे फोटो काढणे शक्य आहे.

 

mobile cameras inmarathi

हे ही वाचा – एकदम स्वस्त तरीही मस्त! खिशाला सहज परवडणाऱ्या या ५ स्मार्टफोन्सविषयी जाणून घ्या

मोबाइल कंपन्यांमध्ये सध्या कॅमेरा फीचर यामध्ये देखील स्पर्धा सुरू असते. सुरुवातीला एक दोन MP असणारा कॅमेरा आता 108 MP पर्यंत गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री झिरो अल्ट्रा या फोनमध्ये 108 MP चा कॅमेरा आहे.

फोटोची क्वालिटी देखील खूपच क्लियर येत आहे यातलीच एक पुढची स्टेप म्हणजे सध्या फोटोमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी आणखीन काहीतरी नवीन संशोधन सुरू असते, आणि स्पर्धा देखील.

आघाडीच्या कंपन्या सॅमसंग, ऍपल आयफोन, शियोमी, वन प्लस यादेखील सहभागी असतात.

याच स्पर्धेत स्पर्धेतून आता वन प्लस 8 प्रो या मोबाईल मध्ये त्याच्या चायनीज व्हर्जन मध्ये कॅमेराला एक्स-रे फीचर देण्यात आले असून त्याला तसे फिल्टर लावण्यात आलेले आहेत.

यामुळे त्या फिचरचा वापर करून फोटो काढला, तर काही प्रकारच्या प्लास्टिक, आणि कपड्यांच्या आरपार ही काय आहे हे दिसत आहे.

 

oneplus 8 pro inmarathi

 

यावरूनच वापरकर्ते आणि लोकांमध्ये थोडेशी नाराजी आहे. कारण यामुळे त्यांच्या प्रायव्हसीचा विचका होऊ शकतो.

जगभरातून याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात टीकेची झोड उडाली!

आणि त्यानंतर कंपनीने अशा प्रकारच्या फोनवर बंदी घातली आहे हे डिक्लेअर केले आणि ज्या मोबाईल मध्ये हे फिचर दिसतं तेही आता डिसेबल करण्यात येणार आहे.

या मोबाईल मधून फोटो काढल्यास प्लास्टिकच्या आरपार काय आहे हे तर दिसतंच. म्हणजे एखाद्या रिमोट कंट्रोलमध्ये कोणते कंपोनंट वापरून बनला आहे आणि त्याचं सिस्टीम कशी आहे हे कळतं.

म्हणजे केवळ पातळ प्लास्टिक मधूनच नव्हे तर रिमोट कंट्रोल, मोबाईल यासारख्या गोष्टींमध्ये देखील काय आहे हे कळतंय.

इतकच नाही तर एखाद्या कपड्याच्या खाली काय ठेवलं आहे हेदेखील दिसत आहे.

 

one plus x ray inmarathi

 

खरंतर ही टेक्नॉलॉजी तशी नवी नाही म्हणजे आपण पाहतो विमानतळावर बॅगांचं स्कॅनिंग होताना या टेक्निकचा वापर केला जातो.

रात्रीचे शूटिंग करायचं असेल तर तरीदेखील हीच टेक्नॉलॉजी उपयोगाला येते. रात्रीच्या अंधारात समोर काय आहे हे या कॅमेऱ्यामुळे कळते.

खरंतर याच पद्धतीचा कॅमेरा वापरून तो अग्निशामक दलाच्या लोकांनाही वापर करता येईल, हाही एक उद्देश होता.

कारण कुठेतरी आग लागल्यानंतर धुरामध्ये काही दिसत नाही. पण अशा प्रकारचा कॅमेरा असेल तर एखादी व्यक्ती कुठे अडकली आहे हे समजणे सोपे जाईल आणि त्या व्यक्तीला वाचवता येईल याचा मुद्दा मुख्य उद्देश होता.

पण आता याचा सार्वजनिक वापर सुरू झाला तर त्याचे अनेक दुष्परिणाम समाजात होऊ शकतात व्यक्तिस्वातंत्र्यावर हा घाला आहे.

लोकांच्या खाजगी आयुष्यात देखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात!

म्हणूनच त्यावर टीकेची झोड उठल्यावर कंपनीने सध्या ते फिचर बंद केले असून त्यावर वेगळ्या प्रकारचे संशोधन काही करता येईल का याचा विचार सुरू आहे.

 

one plus 8 x ray inmarathi

 

या फोनमधील फोटो क्रोम फीचर मुळे जाड प्लास्टिक मधून कपड्यामधून काही दिसणार नाही असा कंपनीचा दावा होता. परंतु जेव्हा फोन लोक वापरायला लागले तेव्हा ही गोष्ट लक्षात आली.

वन प्लस 8 प्रो या मोबाईल मधील कॅमेरा हा duel 48MP असून चा असून त्यात सोनी IMX586 सेन्सर आहे.

पहिला कॅमेरा हा 48-MP चा असून (f/1.78, 1.12-micron) दुसरा कॅमेरा 8-MP (f/2.44, 1.0-micron) 3X hybrid and 30X digital zoom

तिसरा कॅमेरा 48-megapixel (f/2.2) चौथा कॅमेरा 5-megapixel कलर फिल्टर विथ एलईडी फ्लॅश सहित (f/2.4) चा आहे.

याच त्याच्या कलर फिचरमुळे वस्तूच्या आरपार ही दिसत आहे. वापरकर्त्यांना फोटॉक्रोम मोड वर फोटो काढले तर वस्तूच्या आरपार दिसत आहे.

अगदी कम्प्युटर चा किबॉर्ड, ॲपल टीव्ही, रिमोट कंट्रोल या मध्ये कोणते कंपोनंट वापरले आहेत किंवा त्यातलं सर्किट बोर्ड काय प्रकारचा आहे हे स्पष्ट दिसत आहे.

 

x ray one plus 8 pro inmarathi

 

कंपनीचा दावा होता की अशाप्रकारे मोबाईल बनवण्यात आला आहे की फक्त पातळ प्लास्टिक मधूनच काही आरपार दिसेल.

इतकी चांगली टेक्नॉलॉजी वापरली आहे की जाड प्लास्टिक आणि कपड्यामधून काही दिसणार नाही.

म्हणून अनेक जणांनी वेगवेगळ्या वस्तूंचे फोटो काढून पाहिले तर त्यात हे दिसून आलं की प्रत्यक्षात जाड प्लास्टिक आणि कापडा मधूनही ही आरपार दिसत आहे.

या कॅमेरातून काय काय दिसू शकतं याची जगाला माहिती ती पहिल्यांदा करून दिली ती अमेरिकेतील बेन जस्किन यांनी.

ट्विटरवर त्याने पहिल्यांदा’ वन प्लस 8 प्रो’ यामधून काय दिसत आहे याबद्दल एक व्हिडिओ ट्विट केला.

 

oneplus 8 pro 2 inmarathi

हे ही वाचा – वाद चिघळवणाऱ्या ‘फोन टॅपिंंग’ बद्दलची ही माहिती तुम्ही नक्कीच वाचली नसेल

त्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या वस्तूंवरती याचे प्रयोग केले आणि विशेष म्हणजे अगदी कोकाकोला आणि वाईन वर देखील हे काम करत आहे असे दिसून आलं आहे.

खरंतर या फिचर मुळे या प्रकारच्या फोन मुळे, कॅमेऱ्यामुळे लोकांना काही त्रास असावा व्हावा असा उद्देश कंपनीचा नक्कीच नसेल!

परंतु त्यातील धोके आता लक्षात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी कंपनीकडून होत आहे. सध्या त्या फोनमधील ते फिचर काम करत नाही.

सध्यातरी काम चालू असून थोड्याच कालावधीत नवीन फेरफार सहित ते फिचर पुन्हा चालू होईल.

टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस सुधारित होत आहे अजून वेगवेगळे नवीन बदल त्यामध्ये होत राहतील फक्त त्या गोष्टींचा वापर कसा करायचा हे मात्र केवळ माणसाच्या हातात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?